हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक दिवसातील एक विशिष्ट वेळ अत्यंत शुभ मानली जाते. यावेळी कोणतेही काम केल्यास त्याला यश प्राप्त होतो. कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी मुहूर्त काढताना दिवस, तिथी, नक्षत्र, योग आणि दिनमान इत्यादी महत्वाचे असतात, असे ज्योतिषी सांगतात. ‘Abhijit Muhurta‘ प्रत्येक दिवसात अशा वेळी येतो ज्यामध्ये जवळपास सर्व शुभ कार्ये करता येतात. या लेखात आपण, अभिजीत मुहूर्त म्हणजे काय, हे जाणून घेणार आहोत.

अभिजीत मुहूर्त म्हणजे काय
साधारणपणे वर्षातील सर्व 365 दिवसांतील 11.45 ते 12.45 या कालावधीला अभिजीत मुहूर्त असे म्हटल्या जाते. प्रत्येक दिवसाच्या मधला भाग (दुपारचे 12 वाजता) अभिजीत मुहूर्त मानला जातो. सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा मध्य 12 वाजता मानला जातो. या वेळेच्या अगोदर 15 मिनिट आणि नंतर 45 मिनिट हा मुहूर्त समजला जातो.
शास्त्रानुसार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एका दिवसात 30 विविध प्रकारचे मुहूर्त असतात. यापैकी अभिजीत मुहूर्त हा सर्वात शुभ आणि फलदायी मानला जातो. यामध्ये अभिजीत म्हणजे विजेता आणि मुहूर्त म्हणजे वेळ. म्हणजेच अभिजीत मुहूर्तामध्ये केलेले प्रत्येक काम शुभ फळ देते, अशी धार्मिक मान्यता आहे.
यामुळेच हिंदू सनातन धर्मात अभिजीत मुहूर्तावर सर्व प्रकारचे धार्मिक विधी आणि कार्ये केली जातात, कारण त्याचे परिणाम नेहमीच सकारात्मक होईल असे मानतात. या मुहूर्तामध्ये धार्मिक विधी आणि उपासना करणे, नवीन नोकरी सुरू करणे, व्यवसाय सुरू करणे इत्यादी सर्वोत्तम मानले जातात.
मांगलिक कार्य आणि ग्रह प्रवेश यांसारख्या प्रमुख कामांसाठी अभिजीत मुहूर्तासह आणखी योग पहावे, असे तज्ञ सांगतात. या मुहूर्तामध्ये दक्षिण दिशेला प्रवास करणे टाळावे असे ज्योतिषी सांगतात. याशिवाय बुधवारी अभिजीत मुहूर्तावर कोणतेही शुभ कार्य करू नये, असेही हे लोक सांगतात.
हे सुद्धा नक्की वाचा-