मेनू बंद

आजन्म कारावास म्हणजे काय

गंभीर गुन्ह्यांसाठी आजन्म कारावास (Life imprisonment) म्हणजेच जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. भारतीय दंड संहिता (IPC) 1860 गुन्ह्यांच्या शिक्षेचा तपशीलवार वर्णन करते. भारतीय दंड संहितेच्या कलम 53 मध्ये शिक्षेच्या प्रकारांचे वर्णन केले आहे. या लेखात आपण आजन्म कारावास म्हणजे काय हे बघणार आहोत.

आजन्म कारावास म्हणजे काय

आजन्म कारावास म्हणजे काय

आजन्म कारावास ही एक अशी शिक्षा आहे ज्यामध्ये गुन्हेगाराला त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तुरुंगात राहावे लागते. ही शिक्षा काही गंभीर गुन्ह्यांसाठी दिली जाते जसे की खून, गंभीर बाललैंगिक गुन्हे, बलात्कार, हेरगिरी, देशद्रोह, अंमली पदार्थांचा व्यापार, मानवी तस्करी, खोटेपणाचे गंभीर प्रकरण, मोठी चोरी / डकैती इत्यादी.

सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, जन्मठेप म्हणजे दोषीचे आयुष्य संपेपर्यंत तुरुंगात राहणे आणि याचा अर्थ केवळ 14 किंवा 20 वर्षे तुरुंगात घालवणे असा होत नाही, ही कल्पना चुकीची आहे. आजन्म कारावास ची शिक्षा झालेल्या कैद्याला 14 वर्षे किंवा 20 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर सुटका करण्याचा अधिकार आहे, असा गैरसमज असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती के एस राधाकृष्णन आणि मदन बी लोकूर यांच्या खंडपीठाने सांगितले की, “आजीवन कारावासाची शिक्षा झालेल्या कैद्याला शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगातच राहावे लागते, जर त्याला योग्य अधिकाराच्या कोणत्याही सरकारने सूट दिली नसेल.”

सर्वोच्च न्यायालयाने ‘सणसुदिं’च्या निमित्ताने वेगवेगळ्या सरकारांद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येने कैद्यांची सुटका करण्याच्या प्रथेलाही आळा घातला आणि सांगितले की, सुटकेशी संबंधित प्रत्येक प्रकरणाची प्रत्येक प्रकरणाची चौकशी आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा –

Related Posts