आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील मराठी कवी, लघुनिबंधकार आणि पत्रकार अनंत काणेकर यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Anant Kanekar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

अनंत काणेकर
अनंत काणेकर हे महाराष्ट्रातील मराठी कवी, लघुनिबंधकार आणि पत्रकार होते. अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठातर्फे व्याख्यानमाला चालवली जाते. महाराष्ट्र सरकार अनंत काणेकर यांना ललित लेखनाच्या पुस्तकासाठी पुरस्कार देते.
अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी मुंबईत झाला. त्यांचे B.A. LL.B. पर्यंतचे सर्व शिक्षण मुंबईत झाले. वकिलीची पदवी मिळवूनही वकील होण्यापेक्षा त्यांनी शिक्षण क्षेत्रात उतरणे पसंत केले. त्यांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले होते. त्यांनी काही काळ ‘चित्रा’ साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही काम केले.
Anant Kanekar Information in Marathi
काणेकर हे सर्वप्रथम कवी या नात्याने मराठी रसिकांपुढे आले. ‘ चांदरात आणि इतर कविता ‘ या त्यांच्या काव्यसंग्रहाने एक प्रतिभासंपन्न कवी म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य असे की, ती पूर्णपणे स्वतंत्र होती. तिच्यावर अन्य कोणत्याही पूर्वसुरीची छाप नव्हती . पुढील काळात काणेकर लघुनिबंधाच्या प्रांताकडे वळले आणि तो प्रांत त्यांनी जवळजवळ काबीजच केला.
कवी म्हणून काणेकर पहिल्यांदा मराठी रसिकांच्या नजरेस आले. त्यांच्या ‘ चांदरात आणि इतर कविता ‘ या कवितासंग्रहाने ते प्रतिभावान कवी म्हणून प्रसिद्ध झाले. १९३४ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘ पिकली पाने ‘ हा त्यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह. त्यानंतर त्यांच्या लघुनिबंधांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झाले. आदर्श लघुनिबंधाची सर्व गुणवैशिष्ट्ये आपणास काणेकरांच्या लघुनिबंधात पाहावयास मिळतात. वाचकांना अंतर्मुख बनविण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखनात आहे. त्यांच्या जीवनवादी दृष्टिकोनाने तर त्यांच्या लेखनाला अधिकच प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
काणेकरांचे लघुनिबंध मराठी भाषेचे भूषण बनून राहिले आहेत. अनंत पुरोगामी लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव होता. त्यांच्या पुरोगामी दृष्टिकोनाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात पडणे स्वाभाविकच होते; म्हणूनच त्यांच्या सर्व लेखनात सामान्य माणसाविषयी त्यांना वाटत असलेला जिव्हाळा व आपलेपणा प्रत्ययास येतो. काणेकरांनी लघुकथा व प्रवासवर्णनेही लिहिली आहेत. ‘ धुक्यातून लाल ताऱ्याकडे ‘ हे त्यांचे प्रवासवर्णन खूपच गाजले होते याशिवाय आणखीही काही प्रवासवर्णनपर ग्रंथ त्यांच्या खात्यावर जमा आहेत.
अनंत काणेकर यांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. ते या अकादमीचे सदस्यही होते. 1957 मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 1965 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री किताबाने सन्मानित केले. अनंत काणेकर यांचे ४ मे १९८० रोजी निधन झाले.
अनंत काणेकर यांची पुस्तके
- चांदरात आणि इतर कविता – काव्यसंग्रह .
- पिकली पाने
- शिंपले आणि मोती
- तुटलेले तारे
- उघड्या खिडक्या
- राखेतले निखारे
- बोलका ढलपा -लघुनिबंधसंग्रह
- दिव्यावरती अंधेर – लघुकथासंग्रह .
- धुक्यातून लाल ताऱ्याकडे
- आमची माती आमचे आकाश
- निळे डोंगर तांबडी माती
हे सुद्धा वाचा –