मेनू बंद

आयुर्विमा म्हणजे काय | व्याख्या, मूलभूत तत्व, प्रकार व इतिहास

आयुर्विमा किंवा जीवन आगोप किंवा इंग्रजी मध्ये Life insurance हा विम्याच्या विविध स्वरूपापैकी अत्यंत महत्वाचा असून विम्याच्या क्षेत्रात यास बरेच महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आयुर्विम्याची सुरुवात बन्याच उशीरा झाली असली तरी आज त्याचा विस्तार आणि व्यवसाय बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होत आहे. जगातील सर्वच राष्ट्रातील विम्याच्या क्षेत्रात आयुर्विम्याचे स्थान बरेच वरचे असलेले आढळून येते. या लेखात आपण आयुर्विमा म्हणजे काय आणि Life insurance चे प्रकार व इतिहास काय आहे, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

आयुर्विमा म्हणजे काय

विमा व्यवसायाची सुरुवात लंडनमधल्या लाईट कॉफी हाऊसमधील व्यापाऱ्यांनी केली. या हाऊसमध्ये एकत्रित येणाऱ्या व्यापाऱ्यांनी जहाज वाहतुकीत असणारे धोके आणि मालाचे नुकसान यांवर भागीदारी करून कोणाचेही आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न केला.

जीवन विमा पॉलिसी (Life Insurance Policy) खरेदी करण्यासाठी व्यक्ती निरोगी असणे आवश्यक आहे. जीवन विम्याची आवश्यक रक्कम व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबाच्या गरजांवर अवलंबून असते. जीवन विम्यामध्ये विविध प्रकारच्या पॉलिसी असतात.

आयुर्विमा म्हणजे काय (What is Life Insurance)

आयुर्विमा (Life Insurance) ही एखाद्या संस्था किंवा व्यक्तीने कोणा एका व्यक्तीच्या मृत्युपश्चात आर्थिक भरपाई देण्याचा कायदेशीर करार आहे. विमा काढलेल्‍या व्यक्तीच्या मृत्यूमधुन उद्भवणारे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी हे संरक्षण म्हणून वापरले जाते. याने विमा काढलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास व्यक्तीच्या मृत्यूनंतर आर्थिक सहाय्य मिळते. आयुर्विमा अंतर्गत व्यक्ती विशिष्ट वर्षे जगेल असे वचन देण्यात येते व असे न झाल्यास म्‍हणजेच विमा केलेली व्यक्ती निर्दिष्‍ट वेळेच्या आत मरण पावल्यास मृत व्यक्तीच्या वारसास विशिष्‍ट रक्कम मिळते.

आयुर्विमा व्याख्या (Definition of Life Insurance)

1. “आयुर्विमा किंवा जीवन आगोप हा असा करार आहे, ज्या करारात एकत्रितपणे अथवा हप्तेवारीने दिलेल्या व्याजीच्या मोबदल्यात विमाकार वार्षिक वृत्ती अथवा विमेदाराच्या मृत्युनंतर अथवा ठराविक मुदतीनंतर ठराविक राशीचे शोधन करण्यास वचनबद्ध असतो.”

2. “आयुर्विम्याचा करार हा दीर्घ मुदतीचा करार असून विमेदाराच्या मृत्युनंतर होणारे शोधन हे त्याच्या वारसास करण्यात येते आणि विमेदाराच्या जिवंतपणीच रक्कम देय झाल्यास मात्र ही राशी विमेदारासच देण्यात येते. या ठिकाणी हे स्पष्ट करणे अधिक महत्वाचे आहे की, आयुर्विम्याचा करार हा क्षतिपूर्तीचा करार नसल्यामुळे विमाकारास संपूर्ण राशीचे शोधन करावे लागते.”

3. आयुर्विम्याची व्याख्या पुढील शब्दात करण्यात येते- “A life insurance contract may be defined as a contract where by the insurer, in consideration of a premium, paid either in lump sum or a periodical instalments, undertakes to pay an annality or a certain sum of money, either on the death of the insured or on the expiry of a certain number of years.”

इतिहास (History of Insurance)

भारतात विमा व्यवसायाची सुरुवात India Oriental Life Insurance Co. Ltd. या कंपनीने केली. पण भारताची पहिली विमा कंपनी 1870 मध्ये मुंबईत ‘Bombay Mutual Assurance Society Limited’ नावाने स्थापन झाली. त्यानंतर भारत इन्शुरन्स कंपनी 1896 मध्ये दिल्लीत इम्पेरीअल इंपेरीअर ऑफ इंडिया 1897 मध्ये मुंबईत, युनायटेड इंडिया चेन्नईत, नशनल इंडियन आणि हिंदुस्थान को – ऑपरेटिव्ह कलकत्ता आदि विमा कंपन्या आल्या. पुढे लाहोरमध्ये ‘को ऑपरेटिव्ह एश्युरन्स’ मुंबईत ‘बॉम्बे लाईफ’ ‘द इंडियन’ ‘न्यु इंडिया’ ‘द ज्युपिटर’ आणि दिल्लीत ‘द लक्ष्मी’ या कंपन्या आल्या.

1956 मध्ये विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण होऊन 1 सप्टेंबर, 1956 रोजी ‘Life Insurance Cooperation of India’ (LIC) स्थापन झाले. परंतु 31 ऑगस्ट 2007 पासून 16 नवीन कंपन्यांना विमा व्यवसायाची परवानगी देण्यात आली. कार्याच्या दृष्टीकोनातून विमा संभाव्यतेच्या सिद्धांतावर आधारलेली अशी सहकारी व्यवस्था आहे की ज्यामध्ये सर्वांच्या सहयोगाने नुकसान भरपाई निमित्ताने एक धनसंचय निर्माण केला जातो आणि अनेक व्यक्तींच्या जोखमीचे वितरण सर्व समुदायामध्ये केले जाते.

आयुर्विमाची मूलभूत तत्वे कोणती आहेत

आयुर्विम्याचा करार प्रामुख्याने आत्यंतिक विश्वासाचे तत्व आणि विमायोग्य हिताचे तत्व या दोन तत्वांवर अवलंबून असतो. क्षतिपूर्ती आणि प्रतिस्थापनेचे तत्व त्याचप्रमाणे अंशदानाचे तत्व या ठिकाणी लागू पडत नाही.

1. आत्यंतिक विश्वासाचे तत्व : आयुर्विम्याचे करार हे संपूर्णतः या तत्वावर अवलंबून असतात. कोणतेही वास्तविक तथ्य लपवून न ठेवणे ही या कराराची मूलभूत अट असते. विमेदारास एक प्रस्तावपत्र (Proposal From) भरून द्यावे लागते, ज्यात अनेक प्रश्न विचारण्यात आलेले असतात. या सर्व प्रश्नांची सत्य उत्तरे देण्यात यावीत. कोणतीही माहिती चूकीची दिली आहे असे आढळून आल्यास विमाकाराचा विमा रद्द करू शकतो. विमाकाराने या बाबींचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केल्यामुळे भारतीय विमा अधिनियमात कलम 45 मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की, सतत काही वर्षे विमापत्र वैधानिक समजले गेल्यास त्यानंतर ते रद्द करता येत नाही. हा नियम वयाबाबत मात्र लागू होत नाही.

2. विमायोग्य हिताचे तत्व: आयुर्विम्यास लागू होणारे हे महत्वाचे दुसरे मूलभूत तत्व होय. विमापत्रास वैध स्वरूप प्राप्त होण्याकरिता विमायोग्य हित असणे आवश्यक आहे. आयुर्विम्याबाबत एखाद्याच्या जीवनात विमायोग्य हित असण्याकरिता त्यांचे आपसातील नाते पुढीलप्रमाणे असावे.

एखाद्या व्यक्तीस आपल्या स्वतः च्या जीवनात विमायोग्य हित असते आणि हे हित कोणत्याही मर्यादित बांधता येत नाही. आपल्या जीवनाचा विमा कितीही मोठ्या रक्कमेचा असू शकतो. व्यवहार प्रव्याजी (Premium) देण्याची क्षमता यावरून विम्याची राशी निश्चित करण्यात येते. पत्नी आपल्या पतीचा विमा उतरवू शकते. कारण वैधानिक दृष्टीने तो तिचा आधार समजला जातो आणि म्हणून पतीच्या सतत वास्तव्यात पत्नीचे हित असते. विवाहित महिलांच्या संपत्तीविषयक अधिनियमात (Married Women’s Property Act, 1882) देखील या हितास मान्यता देण्यात आली आहे.

एखादी व्यक्ती कायद्याने मान्य केलेले संबंध असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा संभाव्य आर्थिक हानीच्या मर्यादेपर्यंत विमा उतरवू शकते. उदा. उत्तमर्ण आपल्या अधमर्णाच्या जीवनाचा घेणे असलेल्या ऋणाएवढ्या रकमेचा विमा उतरवू शकतो.

विमायोग्य हित केव्हा असावे असा प्रश्न देखील या संदर्भात अत्यंत महत्वाचा ठरतो. Dalby v. The. India and London Life Assurance Company (1854) यांच्या विवादातील निर्णयात असे स्पष्ट करण्यात आले की, विमा करार पूर्ण होते वेळी विमायोग्य हित असणे आवश्यक आहे. क्षती होते वेळी विभायोग्य हित असले पाहिजे हे आवश्यक समजले जात नाही.

आयुर्विमा चे प्रकार (Types of Life Insurance)

1) मुदती विमा (Term Insurance in Marathi)

मुदत विमा (Term Insurance) हा जीवन विम्याचा सर्वात सोपा आणि सरळ प्रकार आहे. मुदत विमा घेतल्यास आपल्या कुटुंबाला सर्वात स्वस्त दरात आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होते. मुदत विम्या घेतल्यास, तुम्ही तुलनेने कमी प्रीमियम दराने मोठ्या प्रमाणावर जीवन विमा (विमा रक्कम) मिळवू शकता.

टर्म इन्शुरन्समध्ये ठरलेल्या मुदतीपर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे असतात. पॉलिसीच्या कालावधीत विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नामांकित (nominee) व्यक्तीला लाभाची रक्कम दिली जाते. थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे. पण, मुदतीनंतर तुम्ही जिवंत असाल तर मात्र तुम्हाला लाभ मिळत नाही. हाच इतर आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्स मधील मुख्य फरक आहे.

सर्व विमा योजनांत्‌ शुद्ध असलेलि मुदती विमा (Term Plan) ही जोखमीला विमाछत्र देते आणि जोखिम म्‍हणजे मृत्यू. येथे एकरकमी अदायगी ही केवळ निवडलेल्‍या कालावधीत मृत्‍यू झाल्‍यास देय असते. इन्‍शुअर व्यक्ती निवडलेल्‍या कालावधीच्या समाप्‍तीपर्यंत जिवंत राहिल्‍यास, काहीही देय बनत नाही. या प्रकाराच्या योजनांमध्ये फक्त संरक्षण हा घटक असतो आणि पॉलिसीबरोबर मुदतपूर्तीनंतर फायदा मिळत नाही.

उदाहरणार्थ, विशिष्ट घटना घडल्यासच (मृत्यू) योजनाधारकाला या योजनेखाली पैसे दिले जातात. दुर्दैवाने, अशी वेळ आली तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाना मोठे आर्थिक संरक्षण मिळते. टर्म इशुरन्स योजना सामान्यपणे कमी खर्चाच्या असतात. ऑनलाइन खरेदी केल्यास टर्म इन्शुरन्स योजना आणखी कमी खर्चात मिळतात.

2) एन्‍डॉमेंट विमा (Endowment Insurance)

मुदतीदरम्यान मृत्यू झाल्‍यास किंवा मुदतीच्या मुदतपूर्तीनंतर विमा केलेल्‍या व्‍यक्तीस एकरकमी रक्कम मिळते.

3) होल लाइफ विमा (Whole Life Insurance)

इन्‍शुअर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, होल लाइफ इन्‍शुरन्‍स जोखमीमध्ये त्याला विमाछत्र मिळते, मग तो कधीही होवो. याचा ‍अर्थ जीवनभर चालणाऱ्या लाइफ इन्‍शुरन्‍स अंतर्गत कोणतीही निश्चित मुदत नसते. बहुतांश पॉलिसी, पॉलिसी धारकास लाभांश प्रदान करतात ज्याची सेवानिवृत्तीसाठी मदत होते.

जीवनभर चालणाऱ्या इन्‍शुरन्‍स उत्पादनांमध्‍ये दोन फरक आहेत:

  1. होल लाइफ प्युअर विमा (Whole Life Pure Insurance)– जेथे प्रीमियम इन्‍शुअर झालेल्‍या व्यक्तीच्या जीवनभरादरम्यान मृत्यूपर्यंत निरंतर देय असतात. ‍जोखिम कव्हरेज जीवनाच्या संपूर्ण कालावधीसाठी असते आणि लाइफ इन्‍शुअर रक्कम इन्‍शुअर झालेल्या व्यक्तीचा मृत्यू कोणत्याही वेळी झाल्‍यास दिली जाते.
  2. लिमिटेड पेमेंट होल लाइफ विमा (Limited Payment Whole Life Insurance) – जिथे प्रीमियम मर्यादित आणि कमी कालावधीसाठी भरला जाते आणि इन्‍शुअरचा पर्याय मृत्यूपर्यंत किंवा तत्पूर्वीचा असतो. तथापि जोखिम कव्हरेज इन्‍शुअर झालेल्‍या व्‍यक्तीच्या जीवनभर असते.

मनी बॅक पॉलिसी (Money Back Policy)

पॉलिसीच्या मुदतीदरम्यान, इन्‍शुअर व्यक्तीस नियमीत कालखंडानंतर विमाछत्राचा निश्चित भाग (टक्केवारी) प्राप्त होते. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान प्राप्त झालेले हे पैसे कर-मुक्त असतात. पॉलिसीची मुदत पूर्ण केल्यानंतर किंवा मुदतपूर्तीनंतर, इन्‍शुअर व्यक्तीस विमाराशी तसेच पॉलिसीच्या मुदतीसाठीचा बोनस प्राप्त होतो.

इन्‍शुअर केलेल्‍या व्‍यक्तीच्या मृत्यूनंतर, नॉमिनीस विमाराशी अधिक पॉलिसी सुरू असलेल्‍या वर्षांच्या संख्‍येसाठी बोनस प्राप्त होतो. मनी बॅक पॉलिसी नफा पॉलिसीसह एन्‍डॉमेंट असलेल्‍या पॉलिसीपेक्षा जास्‍त खर्चिक असतात. अनेक लोक प्राप्त होणारे पैसे सुट्टी घालविण्‍यासाठी वापण्‍याकरिता, घरांचे फर्निचर करण्‍याकर‍िता किंवा‍ ‍तीच रक्कम पुन्हा गुंतवण्‍यासाठीही वापरतात.

हे सुद्धा वाचा –

Related Posts