आपण या आर्टिकल मध्ये भारतीय सौंदर्यवादी कवी बा. भ. बोरकर यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Balakrishna Bhagwant Borkar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

Ba Bha Borkar Information in Marathi
बा. भ. बोरकर हे गोव्यातील सौंदर्यवादी कवी होते. त्यांचे पूर्ण नाव बाळकृष्ण भगवंत बोरकर असे होते. त्यांचा जन्म गोव्यातील कुडचडे या गावी ३० नोव्हेंबर, १९१० रोजी झाला. बोरकरांचे शिक्षण गोव्यात आणि धारवाड येथे झाले. मॅट्रिक झाल्यानंतर गोव्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून ते काम करू लागले. त्यांनी लहान वयातच कविता लिहायला सुरुवात केली.
बोरकर 1950 च्या दशकात गोवा स्वातंत्र्य संग्रामात सामील झाले आणि पुण्याला गेले, जिथे त्यांनी रेडिओ स्टेशनसाठी काम केले. त्यांचे बहुतेक साहित्य मराठीत लिहिलेले असले तरी त्यांची कोकणी निर्मितीही लक्षणीय आहे. बोरकरांच्या मृत्यूनंतर पुल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी बोरकरांच्या कवितांचे सार्वजनिक वाचन केले. मराठीतील ‘आमचा गोमंतक’ आणि कोकणीतील ‘ पोर्जेचो आवाज’चे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
बा भ बोरकर कविता संग्रह
‘ प्रतिभा ‘ हा बोरकरांचा पहिला काव्यसंग्रह होय. त्यानंतर कविता संग्रह मध्ये त्यांचे जीवनसंगीत, आनंदभैरवी, चित्रवीणा, चैत्रपुनव, गितार, दूधसागर, कांचनसंध्या इत्यादि काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या काही काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली होती. निसर्ग आणि स्त्रीसौंदर्य यासंबंधीच्या विविध अनुभवांचा प्रत्ययकारी आविष्कार यांच्या कवितांमधून घडतो. काव्याप्रमाणेच कादंबऱ्या आणि लघुकथाही त्यांनी लिहिल्या होत्या.
कोकणी भाषा हा बोरकरांच्या अस्मितेचा आणखी एक विषय होता. त्यांनी कोकणी भाषेतूनही लेखन केले होते. कोकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळावा, असा त्यांचा आग्रह होता. भारत सरकारने ‘ पद्मश्री ‘ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना ताम्रपट मिळाला होता. बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा मृत्यू ८ जुलै १९८४ रोजी झाला.
बा भ बोरकर यांच्या कविता
बोरकर यांच्या कविता व काव्यसंग्रह – प्रतिभा, जीवनसंगीत, आनंदभैरवी, चित्रवीणा, चैत्रपुनव, गितार, दूधसागर, कांचनसंध्या.
भावीण, प्रियकामा या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.
हे सुद्धा वाचा –