आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी लेखक बा. सी. मर्ढेकर यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Ba Si Mardhekar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

बा सी मर्ढेकर माहिती मराठी
बाळ सीताराम मर्ढेकर हे मराठी लेखक होते ज्यांनी मराठी कवितेत संवेदनशीलतेचा आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांचा जन्म १ डिसेंबर, १९०९ रोजी महाराष्ट्रातील खानदेश भागातील फैजपूर या गावात झाला. बा. सी. मर्ढेकर हे मराठीतील ‘ नवकवितेचे आद्य प्रवर्तक ‘ म्हणून ओळखले जातात. केशवसुतांनंतरचे मराठीतील एक ‘ युगप्रवर्तक कवी ‘ म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे संपूर्ण नाव बाळ सीताराम मर्ढेकर असे होते. सातारा जिल्ह्यातील मर्ढे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण धुळे येथे झाले.
त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्याच्या फर्गसन कॉलेजात दाखल झाले. याच कॉलेजातून ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. मर्ढेकरांनी काही काळ ‘ टाईम्स ऑफ इंडिया ‘ या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले होते. पुढे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले होते. १९३८ मध्ये आकाशवाणी केंद्राचे अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
Ba Si Mardhekar Information in Marathi
Ba Si Mardhekar यांनी मराठी कवितेत आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले. आधुनिक काळातील बदलत्या परिस्थितीतून समाजजीवनात निर्माण झालेल्या ताणतणावांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत पडले आहे. यंत्रयुगामुळे मानवी जीवनाला आलेली तीव्र गतिमानता आणि जीवघेणी स्पर्धा यांच्या परिणामी मानव जीवनाला आलेली अवकळा व वैफल्य; तसेच सर्वसामान्य माणसाची अगतिकता यांचे प्रत्ययकारी चित्रण आपल्या कवितांमधून त्यांनी केले आहे.
यंत्रयुगातील गतिमानतेत माणुसकी हरपत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. मर्ढेकरांनी नवकाव्याबरोबरच काही कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. समीक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मराठ नवटीकेचा प्रारंभ त्यांनीच केला. त्यांचे समीक्षा ग्रंथ अतिशय महत्त्वाचे समजले जातात. बाळ सीताराम मर्ढेकर यांचा मृत्यू २० मार्च १९५६ ला झाला.
बा सी मर्ढेकर यांच्या कविता
- मर्ढेकरांची कविता – कविता संग्रह
- रात्रीचा दिवस – कादंबरी
- पाणी – कादंबरी
- तांबडी माती – कादंबरी
- सौंदर्य आणि साहित्य – समीक्षा ग्रंथ
- वाड्मयीन महात्मता – समीक्षा ग्रंथ
हे सुद्धा वाचा –