आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक बाबा आढाव यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Baba Adhav यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

बाबा आढाव
बाबा आढाव जनआंदोलनातून साकारलेले नेतृत्व बाबा आढाव. महात्मा फुल्यांच्या विचारांशी असलेली बांधिलकी मानणारे आणि जपणारे सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे चालविणारे एक मनस्वी पुरोगामी व्यक्तिमत्त्व. १ जून, १९३० हा बाबांचा जन्मदिनांक. १ जून, २०१५ रोजी त्यांनी वयाची पंचाऐंशी वर्षे पुरी केली आहेत. एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते, लढाऊ वृत्तीचे समाजवादी आणि कृतिशील समाजसुधारक म्हणून आपण त्यांना ओळखतो. जनआंदोलनातून साकारलेले प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
महाराष्ट्रात आजवर झालेल्या विविध सामाजिक व राजकीय आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्याबद्दल त्यांनी अनेक वेळा तुरुंगवासाची शिक्षाही भोगली आहे. बाबा हे एक तळमळीचे समाजसेवक आहेत. बाबा आढाव यांच्यावर महात्मा फुले यांच्या विचारांचा तसेच समाजवादी विचारसरणीचा प्रभाव आहे. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीची समाजाला आजही गरज आहे, असे त्यांचे मत आहे.
आपली अतिशय परखडपणे मांडण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी आहे. त्यावरून या ठिकाणी काही वेळा वैचारिक वादळेही निर्माण झाली आहेत. महात्मा फुले यांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्या काही नेत्यांनीच फुल्यांच्या सत्यशोधक विचारांना आहे. तिलांजली दिली आहे; असे सांगून आपल्या राजकीय नेत्यांच्या ढोंगबाजीवर प्रकाश टाकण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.
सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी बाबा आढाव सतत प्रयत्नशील राहिले आहेत. त्याकरिता विधायक संघर्षाच्या मार्गाचा त्यांनी पुरस्कार केला आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी विविध प्रकारच्या जनआंदोलनांमध्ये त्यांनी वेळोवेळी भाग घेतला आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे म्हणून झालेली नामांतराची चळवळ, महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या धरणग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी झालेली आंदोलने, दलित, भटक्या व विमुक्त जाति – जमातींच्या न्याय्य हक्कांसाठी चाललेल्या चळवळी इत्यादी अनेक चळवळींत ते नेहमी अग्रभागी राहिले आहेत.
Baba Adhav Information in Marathi
सामाजिक सुधारणेच्या चळवळीतही Baba Adhav यांनी भाग घेतला आहे. आपल्या समाजातील जातिभेद व वर्णव्यवस्था यांस त्यांचा प्रखर विरोध आहे . स्त्रियांच्या समान हक्कांचे ते पुरस्कर्ते असून स्त्री – जातीवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध त्यांनी आवाज उठविला आहे. देवदासी प्रथा निर्मूलन व देवदासी पुनर्वसन, आदिवासी स्त्री – मुक्ती व कष्टकरी स्त्रियांचे आंदोलन, रोजगार हक्क परिषद इत्यादी चळवळींशी त्यांचा निकटचा संबंध आहे. विधवाविवाहाचे पुरस्कर्ते म्हणून ते ओळखले जातात. समान नागरी कायद्याचाही त्यांनी पुरस्कार केला आहे.
आपल्या समाजात धर्माच्या वाढत चाललेल्या प्रभावावर त्यांनी नेहमीच टीका केली आहे. समाजातील अनिष्ट प्रथा व अधश्रद्धा यांना आळा बसावयाचा असेल तर इहवादी – धर्मनिरपेक्षतावादी दृष्टिकोनाचा अंगीकार करण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांचे प्रतिपादन आहे. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या चळवळीशीही त्यांनी संबंध जोडला आहे.
याच कारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या कट्टरतावादी व धार्मिक संघटनांवर Baba Adhav यांनी सातत्याने टीका केली आहे . याशिवाय पंढरपूरच्या विठ्ठल – रखुमाईची शासकीय पूजा, वेळोवेळी होणारे सार्वजनिक यज्ञविधी , वैदिक ब्राह्मणांचा शासकीय सत्कार यांसारख्या गोष्टींविरुद्धही त्यांनी आवाज उठविला आहे. प्रस्थापितांचे आचार – विचार व मूल्ये यांवर त्यांनी कठोर प्रहार केले आहेत.
सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून बाबा आढावांनी ‘ एक गाव एक पाणवठा ‘ ही मोहीम चालविली होती. या मोहिमेबरोबरच मत मिळाले, पत कुठाय ? मनू पुतळा हटाव यांसारख्या अनेक मोहिमा त्यांनी राबविल्या. येथील दलित व उपेक्षित समाजघटकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळालेच पाहिजेत, याविषयी ते विशेष आग्रही आहेत.
जन्माधिष्ठित विषमता मानणाऱ्या आणि हजारो वर्षांची तशी परंपरा असलेल्या या देशात समतेसाठी सतत संघर्षाची भूमिका वठवीत राहणे, ही अतिशय कठीण गोष्ट आहे; म्हणूनच परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपल्या मतांचा आग्रहाने पाठपुरावा करण्याची गरज आहे, या दृष्टिकोनातून बाबा आढावांनी आपले सामाजिक कार्य चालविले आहे.
बाबा आढावांच्या वरील कार्याचा विचार करता महाराष्ट्रातील समाजपरिवर्तनाच्या चळवळीत त्यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे हे स्पष्ट होते. समता प्रतिष्ठानची स्थापना करून ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा त्यांनी पुढे चालविला आहे.
सक्रिय समाजवादी कार्यकर्ते
बाबा आढाव राजकीय कार्यकर्ते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. समाजवादी चळवळीतील ते एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. समाजातील असंघटित कष्टकरीवर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याला संघटित करण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत. हमाल पंचायत ही संघटना बांधून पाठीवर आणि डोक्यावर भरगच्च पोत्यांचे ओझे वाहणाऱ्या श्रमजीवींचे प्रश्न सोडविण्याचे कार्य बाबांनी केले आहे.
‘ नाही रे ‘ वर्गाशी जोडली गेलेली नाळ जपणारे बाबा केवळ हमालांची संघटना स्थापन करूनच विसावले नाहीत, तर त्यांनी रिक्षा पंचायत, अपंग कष्टकरी पंचायत, कागद – काच – पत्रा कष्टकरी पंचायत, बांधकाम कामगार पंचायत अशा अनेक संघटना स्थापन करून वेगवेगळ्या प्रकारच्या कष्टकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांना हात घातला आहे . बाबांनी पुण्यात हमालांसाठी ‘ हमाल भवन ‘ ही वास्तू उभारली असून ‘ ना नफा ना तोटा ‘ या तत्त्वावर ठिकठिकाणी ‘ कष्टाची भाकर ‘ केंद्रे उभी केली आहेत.
सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. सन १९७५ ते १९७७ या काळात आणीबाणीला विरोध केल्याबद्दल त्यांनी कारावास भोगला होता. समाजवादी व पुरोगामी विचारांच्या राजकीय पक्षांनी जातीयवादी पक्ष व संघटना यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत, अशी Baba Adhav यांची भूमिका आहे. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीस दिशा दाखवून देणाच्या ‘ पुरोगामी सत्यशोधक ‘ या त्रैमासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे.
हे सुद्धा वाचा –