
बहावा एक सुंदर व आकर्षक वृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे. बहावाचे शास्त्रीय नाव ‘Cassia fistula’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. फिस्टुला म्हणजे पोकळ नळी. या दंडगोलाकार लांबलचक शेंगेतला गाभुळलेल्या चिंचेसारखा गर माकडे, कोल्हे, अस्वले, पोपट आवडीने खातात. बहावा ला मराठीत कर्णिकार देखील नाव आहे. बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो. पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.
बहाव्याच्या अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष ‘Golden shower tree’ म्हणून ओळखला जातो. बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात. फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात दडलेली एक बी असते.
भारतात हे झाड सर्वच राज्यांमध्ये आढळते. खोडाचा घेर तीन ते पाच पायऱ्यांचा असतो, पण झाडे फारशी उंच नसतात. उन्हात (एप्रिल, मे) संपूर्ण झाड पिवळ्या फुलांच्या लांब गुच्छांनी भरलेले असते. आणि असे मानले जाते की फुले फुलल्यानंतर 45 दिवसांत पाऊस पडतो. या कारणास्तव याला गोल्डन शॉवर ट्री आणि इंडियन रेन इंडिकेटर ट्री असेही म्हणतात.
हिवाळ्यात लांब, दंडगोलाकार काळ्या रंगाच्या विशाल शेंगा त्यात पिकतात. या शेंगाच्या आत अनेक भाग असतात, ज्यात काळे, चिकट, पदार्थ भरलेले आहेत. झाडाच्या फांद्या सोलून काढल्याने त्यातूनही लाल रस निघतो, जो डिंकासारखा बनतो. शेंगांपासून गोड, गंधयुक्त, पिवळसर पिवळ्या रंगाचे वाष्पशील तेल मिळते.

बहावा वृक्षचा उपयोग:
आयुर्वेदात या झाडाचे सर्व भाग औषधासाठी वापरले जातात. याच्या पानांमुळे मल मोकळा होतो आणि कफ दूर होतो असे म्हणतात. फुले कफ आणि पित्त यांचा नाश करतात. शेंगा आणि त्याचा लगदा जंतुनाशक, कफनाशक, रेचक आणि वातनाशक आहे. शिंगाच्या लगद्याचा पोटावर सौम्य प्रभाव पडतो, त्यामुळे दुर्बल व्यक्ती आणि गरोदर महिलांना तो विरेचक औषधी म्हणून दिला जाऊ शकतो.
तसेच काही उपयोग खलीलप्रमाणे:
- बहावाच्या मोठ्या खोडापासून इमारती लाकूड मिळते.
- बहाव्याची साल कातडे कमावण्याच्या उपयोगी आहे.
- शेंगेतला गर सारक औषध म्हणून उपयोगी आहे, तसेच तंबाखूला स्वाद आणण्यासाठी गर वापरतात.
- जास्त पिवळेपणा असलेल्या काविळीत आधी दोन-तीन दिवस रोज सकाळी १५ ते २० मिलिलिटर तूप देऊन तिसऱ्या दिवशी रात्री जेवणानंतर आरग्वध (बहावा/ अमलताश) – मगज १५ ते २० ग्रॅम पाण्याबरोबर देतात. आरग्वधाचा मगज हा पदार्थ गाभुळेल्या चिंचेसारखा असतो. त्याच्या सेवनामुळे सौम्य जुलाब होऊन अन्नमार्गातले पित्त पडून जाते.
हे सुद्धा वाचा –