मेनू बंद

बहिणाबाई चौधरी – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक बहिणाबाई चौधरी यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Bahinabai Chaudhari बद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

बहिणाबाई चौधरी माहिती मराठी - Bahinabai Chaudhari Information in Marathi

बहिणाबाई चौधरी कोण होत्या

बहिणाबाई चौधरी महाराष्ट्रातील एक निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री होत्या. बहिणाबाईंचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावी १८८० मध्ये झाला. त्या महाजन आडनावाच्या एका शेतकरी कुटुंबातील होत्या. या निसर्गदत्त प्रतिभेच्या बळावर त्यांच्या काव्यरचना आधारित आहेत. बहिणाबाई चौधरी या शेतात काबाडकष्ट करणाऱ्या गृहिणी होत्या. शेतात काम करताना, जात्यावर दळण दळताना आणि चूल फुंकताना त्यांच्या तोंडातून आपोआप ओव्या बाहेर पडत.

नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले.

बहिणाबाई चौधरीचे साहित्यिक कार्य

बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही कविता पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. शेती आणि घरकाम करताना ते उत्स्फूर्तपणे ‘लेवा गणबोली’ मध्ये कविता आणि गाणी रचायचे.

सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक नातेवाईक एकत्र आल्यावर वेळोवेळी कविता उतरवून तिथे ठेवल्या जायच्या. त्यांच्या जवळपासचे कोणीतरी त्या लिहून घेत. अशा प्रकारे त्यांच्या कविता जन्माला आल्या. सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र होत.

एकदा सोपानदेवांनी आपल्या आईच्या कविता आचार्य अत्रे यांना दाखविल्या. अत्र्यांना त्या इतक्या आवडल्या की, त्यांनी त्या प्रसिद्ध करण्याचा आग्रहच धरला. अशा प्रकारे बहिणाबाईंच्या कविता प्रकाशझोतात आल्या.

बहिणाबाई चौधरी यांनी खानदेशी बोलीत अत्यंत अर्थगर्भ, रसाळ व प्रासादिक काव्यरचना केल्या आहेत. ‘निसर्गकन्या‘ म्हणून त्यांना गौरविले जाते. त्यांच्या सर्व कविता वऱ्हाडी खानदेशी बोलीत आहेत. त्यांच्या कवितांमधून त्यांनी आपला जीवनानुभव व्यक्त केला आहे.

आपल्या शेतीच्या जीवनातील तसेच घरकामातील अनेक प्रसंग त्यांनी कवितेच्या माध्यमातून पुढे मांडले आहेत. तथापि, या प्रसंगांतूनच त्यांनी मानवी जीवनाचे सुरेख चित्रण केले आहे. त्यांची रचना अतिशय साधी असली तरी निरनिराळी सुभाषिते, तात्त्विक बोल आणि व्यावहारिक दृष्टान्त त्यांच्या कवितांत ठायी ठायी आढळून येतात.

बहिणाबाई चौधरी कविता संग्रह

महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले.  

ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, “अहो हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे”, आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. 

“ अरे संसार संसार। जसा तवा चुल्ह्यावर।

आंधी हाताले चटके। तव्हां मियते भाकर। ”

अशा अतिशय साध्या शब्दांत त्या जणू जीवनविषयक तत्त्वज्ञानच आपणापुढे मांडतात. आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कवितांविषयी असे म्हटले आहे की, ” मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्तिमित करून टाकील असा भाषेचा, विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशीग ओथंबलेला आहे.” ‘बहिणाबाईंची गाणी’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. बहिणाबाई चौधरी यांचा मृत्यू ३ डिसेंबर, १९५१ रोजी झाला.

हे सुद्धा वाचा –

Related Posts