मेनू बंद

Balance of Payments किंवा शोधनशेष म्हणजे काय?

Balance of Payments किंवा देण्या-घेण्याचा आढावा किंवा शोधनशेष ची संकल्पना व्यापाराच्या आढाव्याच्या संकल्पनेपेक्षा अधिक व्यापक आहे. व्यापाराच्या आढाव्यात फक्त देशाच्या दृश्य आयाती-निर्यातीचाच समावेश करण्यात येतो. परंतु देण्या-घेण्याच्या आढाव्यात देशाच्या संपूर्ण दृश्य तसेच अदृश्य आयाती-निर्यातीचा समावेश केला जातो. या आर्टिकल मध्ये आपण, Balance of Payments किंवा शोधन शेष म्हणजे काय, जाणून घेणार आहोत.

Balance of Payments किंवा शोधनशेष म्हणजे काय?

Balance of Payments म्हणजे काय

1. बेनहॅमने शोधन शेष ची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे – “एखाद्या देशाच्या Balance of Payments म्हणजे एका निश्चित कालखंडात त्याच्या जगातील इतर राष्ट्रांबरोबरच्या मौद्रिक सौद्यांचा अभिलेख होय.” (“Balance of payments of a country is a record of its monetary transactions over a period, with the rest of the world.” -Benham)

2. एल्सवर्थच्या च्या मते- “Balance of Payments म्हणजे एखाद्या देशाचे निवासी आणि बाकी जग ह्यांच्या दरम्यान केल्या गेलेल्या संपूर्ण देण्या-घेण्याचे लिखित विवरण होय. हे एखाद्या विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे साधारणपणे एका वर्षासाठी असते.” (“Balance of payments is a written statement of total payments made between the residents of a country and the rest of the world. It is for a specific period of time, usually one year.”)

वरील व्याख्येवरून स्पष्ट होते की, Balance of Payments मध्ये एखाद्या कालखंडातील देशाच्या संपूर्ण मौद्रिक व्यवहारांचा हिशोब असतो. हा कालखंड प्रत्येक देशांत एक वर्षाचा असतो आणि देशाच्या संपूर्ण दृश्य आणि अदृश्य आयाती-निर्यातीचा समावेश देण्या- घेण्याच्या आढाव्यात करण्यात आलेला असतो.

वस्तूंच्या आयातीव्यतिरिक्त सेवांची आयात- निर्यात, भांडवलाची आयात-निर्यात, कर्ज देणे-घेणे, देशी प्रवाशांचा विदेशातील खर्च, विदेशी प्रवाशांचा देशातील खर्च ह्या सर्व बाबींचा Balance of Payments मध्ये समावेश केला जातो. थोडक्यात Balance of Payments म्हणजे एखाद्या देशाचा एखाद्या वर्षातील संपूर्ण दृश्य आणि अदृश्य आयाती-निर्यातीचा होय.

शोधनशेष ची वैशिष्ट्ये – Features of Balance of Payments

  1. Balance of Payments एखाद्या विशिष्ट वर्षाशी संबंधित असतो.
  2. शोधन शेष त्या विशिष्ट वर्षातील संपूर्ण दृश्य आणि अदृश्य आयाती-निर्यातीचा समावेश असतो.
  3. शोधन शेष मध्ये डाव्या बाजूला देशाच्या संपूर्ण देण्याचा हिशोब व उजव्या बाजूला देशाच्या संपूर्ण घेण्याचा हिशोब दर्शविला जातो.
  4. Balance of Payments नेहमी संतुलित असतो. म्हणजे Balance of Payments मध्ये देशाची एकूण विदेशी देणी ही विदेशी घेण्याबरोबर दर्शविली जातात.
  5. Balance of Payments मध्ये सरकारी आणि गैरसरकारी अशा दोन्ही प्रकारच्या बाबींचा समावेश असतो.

अनुकूल आणि प्रतिकूल शोधन शेष (Favorable and Unfavorable Balance of Payments)

एखाद्या वर्षात देशाच्या एकूण दृश्य आणि अदृश्य निर्यातीचे एकूण मूल्य जर त्या वर्षातील दृश्य आणि अदृश्य आयातीच्या मूल्यांपेक्षा अधिक असेल तर शोधन शेष अनुकूल (Favorable Balance of Payments) असतो. दुसऱ्या शब्दात, जर एखाद्या वर्षात देशाची एकंदर देशी घेणी विदेशी देण्यापेक्षा अधिक असतील तर देशाचा शोधन शेष अनुकूल असतो. Favorable Balance of Payments देशासाठी चांगला असतो.

उदा. समजा एका वर्षात देशाची एकंदर विदेशी देणी 50,000 कोटी डॉलर्सची व विदेशी देणी 40,000 कोटी डॉलर्सची आहेत. म्हणजेच देण्यापेक्षा घेणी जास्त आहेत. ह्याचा अर्थ असा होतो की, त्या देशाचा Balance of Payments अनुकूल आहे.

ह्याउलट एखाद्या वर्षांत देशाची एकंदर विदेशी देणी जर एकंदर विदेशी घेण्यापेक्षा जास्त असतील तर देशाचा देण्या-घेण्याचा आढावा प्रतिकूल (Unfavorable Balance of Payments) असतो.

उदा. समजा एका वर्षात देशाची एकंदर विदेशी देणी 50,000 कोटी डॉलर्सची असून एकंदर विदेशी घेणी 40,000 कोटी डॉलर्सची आहेत. म्हणजेच घेण्यापेक्षा देणी जास्त आहेत. ह्याचा अर्थ असा होतो की, देशाचा Balance of Payments प्रतिकूल आहे.

हे सुद्धा वाचा-

Related Posts