मेनू बंद

Balance of Trade किंवा व्यापारशेष म्हणजे काय?

Balance of Trade किंवा व्यापाराचा आढावा किंवा व्यापारशेष ची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येते. “एखाद्या देशाच्या, एखाद्या वर्षातील, संपूर्ण दृश्य आयात-निर्यातीचा हिशोब म्हणजे व्यापाराचा आढावा होय.” (Balance of trade is a calculation of total visual import-export of a country in a year.) या आर्टिकल मध्ये आपण, Balance of Trade किंवा व्यापारशेष म्हणजे काय, सविस्तर जाणून घेणार आहोत.

Balance of Trade किंवा व्यापारशेष म्हणजे काय?

Balance of Trade किंवा व्यापारशेष म्हणजे काय

Balance of Trade किंवा व्यापारशेष म्हणजे फक्त दृश्य आयात-निर्यातीचा हिशोब होय. व्यापाराचा आढावा विशिष्ट वर्षाला अनुसरून असतो. म्हणजेच एखाद्या विशिष्ट वर्षातील वस्तूंच्या आयातीचे एकूण मूल्य तसेच वस्तूंच्या निर्यातीचे एकूण मूल्य व्यापाराच्या आढाव्यात दर्शविले जाते.

व्यापाराच्या आढाव्यात दोन बाजू असतात. डाव्या बाजूला वस्तूंच्या आयातींच्या वेगवेगळ्या बाबी व त्यांचे मूल्य दर्शविले जाते. म्हणजेच डाव्या बाजूला वस्तूंच्या आयातीमुळे निर्माण होणारी एकूण देणी दर्शविली जातात. उजव्या बाजूला निर्यातीच्या वेगवेगळ्या बाबी, त्यांचे मूल्य दर्शविले जाते. अशाप्रकारे उजव्या बाजूला वस्तूंच्या निर्यातीमुळे निर्माण होणाऱ्या एकूण घेणी दर्शविली जातात.

संतुलित, अनुकूल आणि प्रतिकूल व्यापारशेष – Balanced, Favorable and Unfavorable Balance of Trade

देशाच्या दृश्य आयातीचे एकूण मूल्य दृश्य निर्यातीच्या एकूण मूल्याबरोबर असेल, तर त्या एखाद्या वर्षातील देशाचा त्या वर्षातील Balance of Trade संतुलित आहे असे म्हणता येईल.

उदा. समजा एका देशाची एका विशिष्ट वर्षातील एकूण दृश्य आयात 10,000 कोटीची व निर्यात देखील 10,000 कोटीचीच आहे. म्हणजेच देशाच्या दृष्य आयातीचे आणि निर्यातीचे मूल्य समान आहे. म्हणजेच देशाचा Balance of Trade संतुलित आहे.

जर एखाद्या वर्षातील देशाच्या दृश्य आयातीच्या एकूण मूल्यापेक्षा दृश्य निर्यातीचे एकूण मूल्य जास्त असेल तर Balance of Trade अनुकूल म्हणता येईल.

उदा. समजा एखाद्या वर्षात देशाची दृश्य आयात 10,000 कोटीची आहे. परंतु त्या वर्षातील दृश्य निर्यात जर 12,000 कोटीची म्हणजेच आयातीपेक्षा जास्त आहे तर अशा परिस्थितीत त्या वर्षाचा Balance of Trade अनुकूल आहे असे म्हणता येईल.

ह्याउलट जर एखाद्या वर्षातील देशाच्या दृश्य आयातीचे एकूण मूल्य दृश्य निर्यातीच्या एकूण मूल्यापेक्षा जास्त असेल तर Balance of Trade प्रतिकूल आहे असे म्हणता येईल.

उदा. एखाद्या वर्षात देशाची एकूण दृश्य आयात 12,000 कोटीची असून दृश्य निर्यात 10,000 कोटीची असेल तर त्या देशाचा Balance of Trade प्रतिकूल आहे असे म्हणता येते.

हे सुद्धा वाचा-

Related Posts