आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक भाऊ दाजी लाड (१८२४-१८७४) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Bhau Daji Lad यांच्या बद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

भाऊ दाजी लाड हे भारतीय वैद्य, संस्कृत विद्वान आणि पुरातन वास्तूशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील राजकीय घडामोडींमध्ये खूप आणि सक्रिय रस घेतला. बॉम्बे असोसिएशन आणि ईस्ट इंडियन असोसिएशनची बॉम्बे शाखा त्यांचे अस्तित्व त्यांच्या कर्तृत्वाला आणि परिश्रमाला कारणीभूत आहे.
इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेतील विविध वैज्ञानिक संस्थांनी त्यांना सदस्यत्व बहाल केले. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या बॉम्बे शाखेच्या जर्नलमध्ये त्यांनी अनेक पेपर्सचे योगदान दिले. 1975 मध्ये मुंबई व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाचे नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात आले आणि कला आणि वारसा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची साक्ष आहे.
भाऊ दाजी लाड माहिती मराठी
लाड यांचा जन्म ७ सप्टेंबर, १८२४ रोजी गोव्यातील मांद्रीम येथे गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. एका इंग्रजाने, बुद्धिबळातील त्याचे कौशल्य पाहून त्याच्या वडिलांना मुलाला इंग्रजी शिक्षण देण्यास पटवले. भाऊ मुंबईत आले आणि त्यांनी एल्फिन्स्टन संस्थेत शालेय शिक्षण पूर्ण केले. याच सुमारास त्यांना भ्रूणहत्येवर निबंध लिहिल्याबद्दल बक्षीस मिळाले आणि एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले. ते 1850 च्या वर्गातला होते, जे कॉलेजची पहिली पदवीधर बॅच होती.
भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव रामकृष्ण विठ्ठल लाड असे होते; पण भाऊ दाजी लाड या नावानेच ते विशेष परिचित आहेत. भाऊ दार्जीचे वडील मूळचे गोव्यातील पेडणे तालुक्यातील पार्से या गावचे रहिवासी होते; परंतु पुढे ते आपला गाव सोडून कामधंद्याच्या शोधात मुंबईला आले आणि तेथेच ते कायमचे स्थायिक झाले.
भाऊ दाजींचे सर्व शिक्षण मुंबईतच झाले. विद्यार्थिदशेत ते एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. प्रत्येक परीक्षेत त्यांनी उच्च यश संपादन केले होते. त्यामुळे अनेक पारितोषिकांचे ते मानकरी ठरले होते. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भाऊ दाजींनी सन १८४३ ते १८४५ अशी दोन वर्षे मुंबईच्या एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केले .
पुढे १८४५ मध्ये मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तेव्हा भाऊ दाजींनी आपली शिक्षकाची नोकरी सोडून दिली आणि ग्रँट मेडिकल कॉलेजात विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. याच कॉलेजातून त्यांनी १८५१ मध्ये जी. जी. एम. सी. ही वैद्यकीय पदवी संपादन केली. त्यानंतर मेडिकल कॉलेजात त्यांनी काही काळ सब असिस्टंट सर्जन व दुय्यम अध्यापक म्हणून नोकरी केली. पण पुढे त्यांनी नोकरीचा त्याग केला आणि आपला स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय चालू केला.
वैद्यकीय व्यवसायात भाऊ दाजींनी चांगलाच नावलौकिक कमविला. त्या काळात मुंबईतील एक विख्यात धन्वन्तरी म्हणून ते ओळखले जात होते; परंतु त्यांनी या व्यवसायाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता ते एक समाजसेवेचे माध्यम मानले. समाजातील गरीब व निराधार लोकांवर त्यांनी मोफत औषधोपचार केले. आपल्या काही मित्रांच्या सहकार्याने त्यांनी गोरगरिबांसाठी धर्मादाय दवाखाना चालू केला. भाऊ दाजी लाड यांचा मृत्यू ३१ मे, १८७४ रोजी झाला.
Bhau Daji Lad Information in Marathi
Bhau Daji Lad यांनी भारतीय समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा यांना विरोध करून समाजसुधारणेचा आग्रह धरला होता. सामाजिक प्रश्नांबाबत त्यांचा दृष्टिकोन अत्यंत पुरोगामी होता. त्यांनी विधवाविवाहाचे उघड समर्थन केले. आपल्या समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा यांचा त्याग केल्याखेरीज आपल्या लोकांच्या सध्याच्या परिस्थितीत सुधारणा होणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले आणि या रूढी व परंपरा बंद व्हाव्यात म्हणून आपल्या परीने प्रयत्नही केले.
समाजातील गरीब व गरजू लोकांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला. या कामी त्यांना त्यांचा व्यवसाय बराच उपयोगी ठरला. इ. स. १८५५ च्या अँग्लो – अफगाण युद्धात मृत्युमुखी पडलेल्या हिंदी सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी त्या वेळी मुंबईत एक निधी जमविण्यात आला होता. या कार्यात भाऊ दाजींचा पुढाकार होता. मादक पदार्थांच्या सेवनाविरुद्ध मोहीम उघडण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. भाऊ दाजी स्त्री – शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. मुंबईत मुलींसाठी शाळा काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.
Bhau Daji Lad इंग्रजी राजवटीचे समर्थक होते. अर्थात, त्या वेळच्या परिस्थितीला अनुरूप अशीच त्यांची यासंबंधीची भूमिका होती. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात या ठिकाणी होऊन गेलेल्या बहुतेक समाजसुधारकांनी इंग्रजी सत्तेचे समर्थन केले होते; कारण इंग्रजी सत्तेमुळेच आपल्या लोकांना प्रगतीची द्वारे खुली झाली आहेत, असे त्यांचे प्रामाणिक मत होते.
इंग्रजी सत्तेचा पुरेपूर लाभ घेऊन आपण आपल्या समाजात सुधारणा घडवून आणाव्यात व येथील सर्वसामान्य जनतेचे कल्याण साधावे, असे त्यांचे प्रतिपादन होते. भाऊ दाजी हेदेखील अशा विचारवंतांपैकीच एक होते. तथापि, इंग्रजी सत्तेचे समर्थन करीत असताना भाऊ दाजींनी भारतीय जनतेच्या हिताकडे मात्र दुर्लक्ष होऊ दिले नाही.
उलट, येथील लोकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळाले पाहिजेत, असा आग्रह धरून त्यांनी त्यासाठी प्रयत्नही केले होते. इंग्रजी राजवटीत हिंदी लोकांबाबत बराच पक्षपात चालत असे. प्रशासनात वर्णभेदी धोरणाचा उपसर्ग पोहोचत असे. अशा वेळी हिंदी लोकांची गान्हाणी सरकार दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांमध्ये भाऊ दाजी लाड यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते.
बॉम्बे असोसिएशनची स्थापना
बॉम्बे असोसिएशनची स्थापना 26 ऑगस्ट 1852 रोजी हिंदी लोकांवर होणारा अन्याय दूर करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून करण्यात आली. हिंदी लोकांवरील अन्याय दूर करून त्यांच्या तक्रारी सरकारच्या निदर्शनास आणून देणे हा या संघटनेच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश होता. त्याची स्थापना दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी लाड या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.
भाऊ दाजी यांनी या संस्थेचे सचिव म्हणून काम पाहिले. ब्रिटिश राजवटीच्या स्थापनेनंतर भारतातील पहिली राजकीय संघटना म्हणून बॉम्बे असोसिएशनचा उल्लेख केला जातो. या संघटनेच्या वतीने भारतीय जनतेचे कारण अनेकदा ब्रिटिश संसदेसमोर मांडण्यात आले.
बॉम्बे असोसिएशनप्रमाणेच हिंदी जनतेच्या हितासाठी सनदशीर मार्गाने कार्य करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली संघटना म्हणजे ‘ ईस्ट इंडिया असोसिएशन ‘ होय. या संघटनेच्या कार्यातही भाऊ दाजी लाड यांचा सहभाग होता. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी १८६६ मध्ये लंडन येथे केली होती. हिंदी लोकांच्या आर्थिक समस्यांचा विचार करणे आणि त्या प्रश्नावर इंग्लंडमधील लोकमत आपणास अनुकूल करून घेणे, हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. २२ मे, १८६९ रोजी ईस्ट इंडिया असोसिएशनची एक शाखा मुंबईत सुरू करण्यात होती.
या शाखेचे अध्यक्ष डॉ. भाऊ दाजी हेच होते. लायसन्स बिलास विरोध भाऊ दाजी इंग्रजी सत्तेचे समर्थक असले तरी ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या भारतीय हिताविरुद्धच्या कृतींना विरोध करण्यास मात्र त्यांनी कधी मागे – पुढे पाहिले नाही. याचे ठळक उदाहरण म्हणजे त्यांनी लायसन्स बिलाला जाहीररीत्या केलेला विरोध होय.
१८५९ मध्ये ब्रिटिश सरकारने भारतातील व्यापार व उद्योगधंदे यांवर कर बसविणारे एक विधेयक तयार केले, ते ‘लायसन्स बिल‘ या नावाने ओळखले जाते. या विधेयकामुळे भारतीय व्यापार व उद्योगावर अनिष्ट परिणाम होणार होता. साहजिकच, भारतात सर्वत्र लायसन्स बिलाविरोधी तीव्र प्रतिक्रिया उमटली. या विधेयकाचा निषेध करण्यासाठी मुंबईत एक सभा बोलाविण्यात आली होती. या सभेत भाऊ दाजींनी भाषण करून, सरकारने हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी केली.
सन १८४८ मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी ‘ ज्ञानप्रसारक सभा ‘ नावाची संस्था स्थापन केली होती. आपल्या देशबांधवांत आधुनिक ज्ञानाचा प्रसार करून त्यायोगे सामाजिक जागृती घडवून आणणे, हे तिचे मुख्य उद्दिष्ट होते. ज्ञानप्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून दादोबा पांडुरंग यांनी काम पाहिले होते.
पुढे डॉ. भाऊ दाजी लाड, रावसाहेब नारायण, विश्वनाथ मंडलिक इत्यादी व्यक्तींनी या संस्थेच्या कार्यात भाग घेऊन तिला चांगलेच नावारूपाला आणले. आपल्या लोकांनी आधुनिक विचारांचा स्वीकार करावा, त्यांच्यातील अज्ञान दूर होऊन त्यांनी डोळसपणे भोवतालच्या जगाकडे पाहावे, अशी भाऊ दाजींची तळमळ होती; त्यामुळे वरील उद्दिष्टाला पूरक ठरू शकणाऱ्या प्रत्येक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे.
डॉ. भाऊ दाजींचा शिक्षणक्षेत्राशीही निकटचा संबंध होता. मुंबई इलाख्यातील शिक्षणाचे नियंत्रण करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. मुंबई विद्याप फेलो म्हणूनही सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. इतिहाससंशोधक म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यांनी भारतातील अनेक शिलालेखांचे वाचन करून त्यासंबंधी आपले स्वतंत्र विचार मांडले होते.
इंग्रजी इतिहासकारांनी केलेल्या काही चुका त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. इतिहास संशोधनावरील त्यांचे लेख रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईत ग्रँट मेडिकल सोसायटीची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्या संस्थेचे ते काही काळ उपाध्यक्ष होते.
मुंबईच्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता. त्यामुळे मुंबईतील अनेक सार्वजनिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. थोडक्यात, महाराष्ट्रात इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळात डॉ.दाजी लाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हे सुद्धा वाचा –