मेनू बंद

कॅबिनेट मंत्री म्हणजे नक्की काय

या लोकतांत्रिक युगात आधुनिक सरकारमध्ये मंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे. भारतात केंद्रीय मंत्रिमंडळ कार्यकारी अधिकार वापरतात. त्यात Cabinet Minister असतात, ज्याचे नेतृत्व पंतप्रधान करतात. प्राचीन भारतात, राजाला विविध विषयांवर सल्ला देण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीला देखील मंत्री म्हटला जात असे. या लेखात आपण, कॅबिनेट मंत्री म्हणजे काय, हे जाणून घेणार आहोत.

कॅबिनेट मंत्री म्हणजे नक्की काय?

कॅबिनेट मंत्री म्हणजे काय

सरकारच्या उच्चस्तरीय नेत्यांचा गट म्हणजे कॅबिनेट मंत्री होय. सामान्यतः हे संसदेच्या लोकसभेत किंवा राज्याच्या विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या सदस्यांमधून किंवा पक्षांच्या गटातून निवडून आलेल्या राजकारण्यांचा एक गट असतो. कॅबिनेट मंत्री सभागृहाद्वारे निवडले जात नाही, तर ते पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केले जातात.

लोकमत लोकसभेद्वारे (किंवा विधानसभा) सरकारवर नियंत्रण ठेवते आणि लोकसभा (किंवा विधानसभा) त्यांच्या बहुमताद्वारे सरकारवर नियंत्रित ठेवते. मंत्रिमंडळ हा महत्त्वाच्या मंत्र्यांचा तुलनेने छोटा गट किंवा समूह असतो, जो देशाच्या (किंवा राज्य) शासनाच्या सर्व महत्त्वाच्या बाबींवर धोरण ठरवतो. त्याचा आकार सरकारच्या विविध विभागांच्या कार्यभारानुसार वाढतो आणि कमी होतो आणि देशानुसार बदलतो.

एकत्रितपणे काम करणे अपेक्षित

कॅबिनेट मंत्र्यांनी एकत्रितपणे काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत परस्पर मतभेद गुपचूप मिटवले जातात. सर्व सदस्यांनी मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय, भाषण आणि मतदानाद्वारे, आवश्यक असल्यास मंजूर करणे अपेक्षित आहे.

पदच्युत करण्याचा अधिकार

भारतीय राज्यघटनेच्या कलम 74 नुसार पंतप्रधान त्यांच्या मंत्र्यांची नियुक्ती करतो. मंत्रिमंडळाची जबाबदारी सामूहिक मानली जाते, जर एखादा मंत्री स्वतंत्रपणे काम करतो, त्याच्या सहकाऱ्यांच्या मताकडे दुर्लक्ष करतो, तर त्याला काढून टाकले जाते आणि राजीनामा देण्यास भाग पाडले जाते. मंत्रिमंडळाच्या ऐक्याचे प्रतीक आणि वैधानिक प्रमुख म्हणून, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री कोणत्याही सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा आणि मंत्रिमंडळाची एकता टिकवून ठेवण्याचा अधिकार त्यांना आहे.

हे सुद्धा वाचा-

Related Posts