मेनू बंद

चावडी म्हणजे काय? चावडीचे महत्व

आज आधुनिक काळात जातपंचायतीचे अधिकार नाहीसे झाले असले तरीही जातीच्या हिताचे रक्षण करण्याच्या गरजेनुसार आणि जातीय भावनेला अनुसरून काही गावांमध्ये जातपंचायत आणि जात चावडी अजूनही अस्तित्वात आहेत. अलीकडे सार्वजनिक चावडीस पंचायत कचेरी हे नाव प्राप्त झाले आहे. जर तुम्हाला चावडी म्हणजे काय याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर सोप्या शब्दात ही संकल्पना आम्ही येथे मांडली आहे.

चावडी म्हणजे काय

चावडी म्हणजे काय

भारतीय ग्रामीण जीवनात, ‘चावडी’ नावाची संस्था म्हणजे गावातील शासकीय कामकाजाचे केंद्र किंवा ग्रामपंचायत होय. ‘चावडी’ हा शब्द ‘चौहट’ या संस्कृत शब्दावरून आला असावा, असा अंदाज आहे. गावातील शासनप्रमुख असलेल्या पाटील किंवा कोतवाल यांचे कार्यालय ही चावडी भरत असे. देऊळ आणि धर्मशाळेप्रमाणेच चावडीही लहान-मोठे सर्वच गावात दिसत असे.

चावडीचे महत्व

चावडी येथे लोक एकत्र जमून गावगाड्याच्या प्रश्नांवर चर्चा करत, गावातील गावांच्या प्रश्नावर निकाल लावत. त्याबाबतच्या तक्रारीही चावडी येथे नोंदविण्यात येत होत्या. कर वसुलीसाठी आलेले कारकून, पोलीस, रामोशी, पंथस्थ वगैरे चावडी येथे मुक्काम करत असत. करमणूक, गप्पा, भजन-कीर्तनासाठी गावकरी चावडी येथे जमत असायचे. एकूणच गावातील कोणतेही विशेष काम किंवा त्यावर चर्चा चावडीत होत असे.

अलीकडे, समाजमंदिर, बस-स्टँड इत्यादी समाज केंद्रे अस्तित्वात आल्यामुळे चावडीचे महत्त्व कमी झाले आहे. ग्रामपंचायतीसारख्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणून जातपंचायतीचेही पूर्वीचे महत्त्व होते. त्यामुळे प्रत्येक जातीच्या वेगवेगळ्या जाती त्या त्या जातचावडीत दिसत होत्या.

यह भी पढे –

Related Posts