आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक चिंतामण विनायक जोशी यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Chintaman Vinayak Joshi यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

चिंतामण विनायक जोशी
चिंतामण विनायक जोशी हे मराठीतील एक महत्त्वाचे विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म १९ जानेवारी, १८९२ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालय व फर्गसन कॉलेजमध्ये झाले. १९१३ मध्ये ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले, तर १९१६ मध्ये त्यांनी एम. ए. ची पदवी संपादन केली. त्यांचा पाली भाषेचा विशेष व्यासंग होता.
आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर चिं. वि. जोशी यांनी काही काळ सरकारी खात्यात माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले. पुढे बडोदा कॉलेजात त्यांची पाली, इंग्रजी व मराठीचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. बडोदा संस्थानचे दप्तरदार म्हणूनही त्यांनी काम केले होते. बौद्ध धर्मासंबंधी त्यांनी काही लेखन केले आहे.
Chintaman Vinayak Joshi Information in Marathi
Chintaman Vinayak Joshi विनोदी लेखनाबद्दलच विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विनोदातून मानवी स्वभावातील आणि दैनंदिन व्यवहारातील विसंगतींचे दर्शन होते. त्यांनी विनोदनिर्मितीसाठी उपहास व कोटीबाजपणा यांऐवजी नेहमीच्या जीवनातील प्रसंग आणि मानवी स्वभाव यांतील विसंगतींचा प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे.
चिमणराव व गुंड्याभाऊ ही त्यांची मानसपुत्रांची जोडगोळी मराठी साहित्यात कायमचे स्थान मिळवून बसली आहे. विशुद्ध किंवा निर्मळ विनोद हे चिं. वि. जोशींच्या विनोदाचे एक प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. आपल्या साहित्यातून मध्यमवर्गीयांचे विश्व त्यांनी साकार केले आहे . त्यांनी कथेवर ‘ सरकारी पाहुणे ‘ हा चित्रपट निघाला होता. चिंतामण विनायक जोशी यांचा मृत्यू २१ नोव्हेंबर, १९६३ रोजी झाला. त्यांचे एरंडाचे गुन्हाळ, चिमणरावाचे चन्हाट, वायफळाचा मळा, ओसाडवाडीचे देव, गुंड्याभाऊ, रहाटगाडगं, लंकावैभव, हास्यचितामणी, बोरीबाभळी इत्यादी साहित्य लिहिले.
हे सुद्धा वाचा –