मेनू बंद

भारतातील सहकारी पतसोसायट्या (Cooperative Credit Societies in India)

Cooperative Credit Societies in India: भारतातील शेतीक्षेत्रास वित्तपुरवठा म्हणजेच पतपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेत सहकारी पतसोसायट्या यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील सहकारी पतसोसायट्यांमध्ये पुढील संस्थांचा समावेश होतो-

भारतातील सहकारी पतसोसायट्या (Cooperative Credit Societies in India)
  1. ग्रामीण भागातील सर्वसाधारणपणे अल्प मुदतीचे कर्ज देणाऱ्या प्राथमिक सहकारी पतसोसायटया (प्रा. स. पतसोसायट्या) 2. जिल्हा पातळीवरील मध्यवर्ती सहकारी पतसोसायट्या किंवा बँका (जि.म.स. बँका)
  2. राज्य पातळीवरील राज्य सहकारी बँक म्हणजेच ‘शिखर बँक’ (The State Co-operative Bank or The Apex Bank)

प्राथमिक सहकारी पतसोसायट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न असतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी सोसायट्या शिवाय बँका त्या-त्या राज्यातील राज्य सहकारी बँकेशी म्हणजेच शिखर बँकेशी संलग्न असतात. अशा प्रकारे सर्वसाधारणपणे भारतातील सहकारी पतसोसायट्यांची त्रिस्तरीय यंत्रणा असते.

सर्वसाधारणपणे वर उल्लेखिलेल्या सहकारी पतसोसायट्या भारतातील शेतीक्षेत्राला प्रामुख्याने अल्प मुदतीची व काही प्रसंगी मध्यम मुदतीची कर्जे देतात. दीर्घ मुदतीचा पतपुरवठा पुढील सहकारी संस्थांमार्फत केला जातो-

(1) प्राथमिक सहकारी भूविकास बँका (Primary Cooperative Land Development Banks)
(2) मध्यवर्ती सहकारी भूविकास बँका (Central Cooperative Land Development Banks)

1. प्राथमिक सहकारी भूविकास बँका (Primary Co-operative Land Development Banks)

त्या-त्या राज्यातील मध्यवर्ती भूविकास बँकेशी संलग्न असतात. काही घटकराज्यांत जेथे प्राथमिक भूविकास बँका येऊ शकल्या नाहीत तेथे मध्यवर्ती भूविकास बँकेने आपल्या शाखा स्थापन केल्या आहेत. भूविकास बँका भारतातील शेतीक्षेत्रास दीर्घ मुदतीची कर्जे देतात.

प्राथमिक सहकारी पतसोसायट्या प्राथमिक सहकारी पतसोसायट्यांचे खेळते भांडवल (Primary Co-operative Credit Societies Working capital of Primary Co-operative Credit Societies)

प्राथमिक सहकारी पतसोसायट्यांचे खेळते भांडवल पुढील मार्गांनी उभारले जाते-

(a) सोसायटीचे स्वतःचे भांडवल (Own capital of the society) : सभासदांना विकलेले भागभांडवल, सभासद फी आणि नफ्यातून निर्माण केला गेलेला राखीव निधी.

(ब) सभासद व इतरांच्या ठेवी सभासदांकडून व बिगर सभासदांकडून येणाऱ्या ठेवी. (Deposits of members and others Deposits from members and non-members)

जेवढ्या या ठेवी अधिक तेवढी सोसायटीकडे अधिक वित्तीय साधनसामग्री व कर्ज देण्याची कुवत अधिक. याशिवाय सोसायटीचे ठेवीदार सोसायटीचा कारभार योग्य रीतीने चालतो की नाही यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवतात. पण असे आढळून येते की, प्राथमिक सहकारी पतसोसायट्यांनी ठेवी गोळा करण्याची कामगिरी योग्य प्रकारे पार पाडलेली नाही.

सर्वसाधारण शेतकरी सभासद गरीब असतो व त्याला सोसायटीकडून कर्ज पाहिजे असते म्हणून तो किमान भागभांडवल विकत घेतो. खेडेगावात जे थोडे श्रीमंत शेतकरी असतात तेही सोसायट्यांकडून कर्ज काढतात. त्यासाठी आवश्यक असलेले किमान भागभांडवल विकत घेतात.

पण, आपली बचत मात्र हे श्रीमंत शेतकरी व्यापारी बँकांच्या शाखांत ठेवतात, कारण तेथे त्यांना सोसायटीपेक्षा आपल्या ठेवीवर अधिक व्याजदार मिळतो. प्राथमिक सहकारी सोसायट्या खेड्यांतील बचत मोठ्या प्रमाणावर गोळा करून ग्रामीण लोकांना बचतीची सवय लावतील हे उद्दिष्ट साध्य करून घेण्यात अयशस्वी झाल्या आहेत हे निश्चित.

(c) जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज (Loan from District Central Bank)

प्राथमिक सहकारी सोसायट्या वित्तीय सामग्रीसाठी फार मोठ्या प्रमाणावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी सोसायट्यांवर अवलंबून असल्याचे आढळते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आपली वित्तीय साधनसामग्री मुख्यतः राज्य सहकारी बँकेकडून कर्जाद्वारे मिळवितात व राज्य सहकारी बँका मोठ्या प्रमाणावर आपली वित्तीय साधनसामग्री नाबार्डकडून मिळवितात. याचाच अर्थ, प्राथमिक सहकारी पतसोसायट्या मध्यस्थाचे काम करतात.

वरील स्तरावरील सोसायट्यांकडून कर्ज काढून ते शेतकरी सभासदांना कर्जे देतात. सहकारी तत्त्वाच्या मूळ उद्देशाशी हे विसंगत आहे. सहकाराचा मूळ उद्देश सभासद शेतकऱ्यांनी एकमेकांस वित्तीय साहाय्य करून सर्व शेतकऱ्यांनी जीवनमान सुधारण्यास एकमेकांस मदत करावी असे होते.

हे सुद्धा वाचा-

Related Posts