आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक दामोदर हरी चापेकर (१८६९ -१८९८) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Damodar Hari Chapekar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

दामोदर हरी चापेकर – संपूर्ण माहिती मराठी
दामोदर हरी चापेकर भारतातील इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध शस्त्र उचलणाऱ्या भारतीय देशभक्तांमध्ये पुण्याच्या चापेकर बंधूंनी मानाचे स्थान मिळवले आहे. या चापेकर बंधूंपैकी एकाचे नाव दामोदर हरी चापेकर आणि दुसऱ्याचे नाव बाळकृष्ण हरी चापेकर होते. दामोदर हरी चापेकर यांचा जन्म २५ जून १८६९ रोजी झाला.
लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादी विचारसरणीचा त्यांच्यावर सुरुवातीपासूनच प्रभाव होता. साहजिकच त्यांच्या मनात इंग्रजी सत्तेविरुद्ध तीव्र चीड होती. परकीय सत्तेच्या गुलामगिरीत तुम्हाला लाजिरवाणे जीवन जगावे लागत आहे, याची त्यांना चीड होती. त्यामुळे परकीय नोकरशाहीने स्थानिक जनतेवर केलेल्या अत्याचारात भर पडली. चापेकर बंधूंनी जुलमी ब्रिटीश अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्यावर प्रथमपासूनच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव होता. साहजिकच, इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांच्या मनात तीव्र असंतोष खदखदत होता. आपणास परकीय सत्तेच्या गुलामगिरीत लाजिरवाणे जिणे जगावे लागत आहे, याची त्यांना अतिशय चीड होती. त्यातच परकीय नोकरशाहीने स्थानिक जनतेविरुद्ध चालविलेल्या जुलूम – जबरदस्तीची भर पडली. त्यातून जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकविण्याचा निश्चय चापेकर बंधूंनी केला.
Damodar Hari Chapekar Information in Marathi
परकीय नोकरशाहीला मुळातच भारतीय जनतेच्या सुखदुःखाचे फारसे सोयरसुतक नव्हते. विशेषतः सर्वसामान्य जनतेविषयीची तिची वृत्ती अतिशय बेफिकीरपणाची होती; त्यामुळे सामान्य जनतेच्या अडीअडचणीच्या व संकटाच्या काळातही सहानुभूतिशून्य वृत्ती धारण करून आपल्या अधिकारांचे उन्मत्तपणे प्रदर्शन करण्याकडेच तिचा कल असे. नोकरशाहीच्या या वृत्तीचा अनुभव दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारतीय जनतेला अनेकदा आ होता. त्याची पुनरावृत्ती प्लेगच्या साथीच्या काळातही घडून आली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. त्यासंबंधी उपाययोजना करण्यासाठी सरकारने एका प्लेग कमिशनरची नियुक्ती केली. प्लेगच्या साथीला आळा घालण्यासाठी प्लेग कमिशनर पुण्यातील घराघरांत जाऊन प्लेगची लागण झालेली माणसे शोधून काढण्याची आणि त्यांना इतर लोकांपासून बाजूला करण्याची योजना आखली.
प्लेगच्या साथीचे निवारण करण्याच्या दृष्टीने रैंड याची वरील योजना योग्य व आवश्यकच होती; परंतु दुर्दैवाने रैंडने या योजनेची कार्यवाही अतिशय धसमुसळेपणाने व दहशतीच्या मार्गाने केली. त्याने या कामासाठी लष्कराची वापर केला. लष्कराच्या जवानांनी रांगडेपणाने पुण्याच्या घराघरांत शिरून बायकामुलांची पर्वा न करता प्लेगच्या रोग्यांचा शोध सुरू केला. यासंबंधी लोकांनी केलेल्या तक्रारींची रँडने जराही दखल घेतली नाही; त्यामुळे प्लेगच्या जोडीने लष्कराच्या अत्याचारांनाही तोंड देण्याचा प्रसंग पुण्याच्या लोकांवर आला. साहजिकच, लोकांमध्ये रँड अतिशय अप्रिय झाला.
सामान्य लोकांवर होऊ लागलेल्या या अत्याचाराने संतापून जाऊन दामोदर हरी चापेकर व बाळकृष्ण हरी चापेकर या चापेकर बंधूंनी रँडला त्याच्या कृत्याबद्दल धडा शिकविण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या हीरकमहोत्सवी समारंभाचा दिवस मुकरर केला. या हीरकमहोत्सवानिमित्त पुण्याच्या राजभवनात २२ जून , १८९७ रोजी एक समारंभ आयोजित केला होता.
या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या रँड व आयर्स्ट या दोन अधिकाऱ्यांचा चापेकर बंधूंनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गणेशखिंडीत अतिशय साहसाने वध केला. त्यानंतर लगेच पोलिसांच्या चौकशीची चक्रे फिरू लागली. फितुरीमुळे चापेकर बंधू पकडले गेले. पुढे या कटाची माहिती पोलिसांना पुरविणाऱ्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या फितूर बंधूंना ८ फेब्रुवारी, १८९९ रोजी वासुदेव हरी चापेकर व म. वि. रानडे या दोघांनी ठार केले.
या प्रकरणी दामोदर चापेकर (१८ एप्रिल, १८९८), बाळकृष्ण चापेकर (१२ मे, १८९९), वासुदेव चापेकर (८ मे, १८९९) आणि म. वि. रानडे (१० मे, १८९९) या चौघाही क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा देण्यात आली; परंतु चापेकर बंधूंचे हे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांच्या बलिदानातून अनेक भारतीय क्रांतिकारकांना स्वदेशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची प्रेरणा मिळाली.
हे सुद्धा वाचा –