मेनू बंद

दत्तो वामन पोतदार – संपूर्ण मराठी माहिती

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (१८९०-१९७९) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Datto Vaman Potdar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

दत्तो वामन पोतदार (Datto Vaman Potdar) - संपूर्ण मराठी माहिती

दत्तात्रय वामन पोतदार हे भारतीय इतिहासकार, लेखक आणि वक्ते होते. 1961 – 1964 या काळात ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. ब्रिटीश वसाहतवादी भारत सरकारने 1946 मध्ये पोतदार यांना महामहोपाध्याय या पदवीने सन्मानित केले होते. त्यांना भारत सरकारने 1967 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या अफाट ज्ञानामुळे ते. त्यांना कधी-कधी डॉ. जॉन्सन ऑफ महाराष्ट्र किंवा जिवंत विश्वकोश म्हटले जायचे. पोतदार हे इतिहासकार विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचे शिष्य होते.

दत्तो वामन पोतदार मराठी माहिती

दत्तो वामन पोतदार यांचा जन्म ५ ऑगस्ट, १८९० रोजी रायगड जिल्ह्यातील महाडजवळील बिरवाडी या गावी झाला. बी. ए. पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीस प्रारंभ केला. पुढे ते पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. पुणे येथील ‘ शिक्षण प्रसारक मंडळी ‘ या शिक्षणसंस्थेचे ते आजीव सदस्य होते. नंतर त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली होती.

दत्तो वामन पोतदार हे इतिहास संशोधक म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाचा अभ्यास आणि इतिहास संशोधन करण्याची प्रेरणा त्यांना इतिहासकार राजवाडे यांच्याकडून मिळाली. पुण्याच्या ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या नावाने प्रा. पोतदार महत्वाचे होते. सुमारे पंचवीस वर्षे त्यांनी या मंडळाचे सचिव म्हणून काम पाहिले होते.

मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांचा गाढा व्यासंग होता व त्यासंबंधी त्यांनी मौलिक संशोधनही केले होते. प्रा. पोतदारांचा या विषयातील अधिकार लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर छत्रपती शिवाजीमहाराजांचे चरित्र लिहिण्याची जबाबदारी सोपविली होती; परंतु कार्यबाहुल्य व वार्धक्य यांमुळे त्यांना ही जबाबदारी पार पाडता आली नाही.

Datto Vaman Potdar यांचे कार्य

दत्तो वामन पोतदार साहित्यिक म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांचे लिखाण मोजकेच असले तरी गुणवत्तेच्या बाबतीत ते अतिशय उच्च दर्जाचे समजले जाते. मराठी भाषेचे ते अत्यंत अभिमानी होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कामकाजात त्यांचा अनेक वर्षे सक्रिय सहभाग होता. मराठीतील एक अस्खलित वक्ते म्हणूनही ते ओळखले जात होते.

दत्तो वामन पोतदारांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले होते. त्यांनी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल पुणे विद्यापीठ आणि वाराणसी विद्यापीठ या विद्यापीठांनी त्यांना डी. लिट. ही सन्मानदर्शक पदवी बहाल केली होती. सरकारने ‘ महामहोपाध्याय ‘ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. पुण्याच्या टिळक विद्यापीठाचे तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

पोतदार यांच्या साहित्य सेवेचा गौरव म्हणून १९३९ मध्ये अहमदनगर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. याशिवाय त्यांच्या कार्याचा भारत सरकारने 1948 मध्ये ‘पद्मभूषण’ किताबाने गौरव केला होता. दत्तो वामन पोतदार यांचे ६ ऑक्टोबर १९७९ रोजी निधन झाले.

हे सुद्धा वाचा –

Related Posts