मेनू बंद

दया पवार – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक दया पवार यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Daya Pawar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

दया पवार

दया पवार कोण होते

दया पवार किंवा दगडू मारुती पवार (Dagdu Maruti Pawar) हे भारतीय मराठी भाषेतील लेखक आणि कवी होते जे दलित साहित्यातील योगदानासाठी ओळखले जातात ज्यात हिंदू जातिव्यवस्थेतील दलित किंवा अस्पृश्यांवर होणाऱ्या अत्याचारांचा सामना केला जातो. ते धर्माने बौद्ध होते. दया पवार यांचा जन्म १५ सप्टेंबर, १९३५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव या ठिकाणी झाला.

अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीत ते जन्माला आले असल्याने अगदी बालपणापासून त्यांनी अस्पृश्यतेचे चटके सोसले होते. अस्पृश्यांच्या व्यथावेदना त्यांनी स्वतः अनुभवल्या होत्या. घरच्या दारिद्र्यामुळे प्रतिकूल परिस्थितीशी सतत संघर्ष करीतच आपल्या आयुष्याचा मार्ग त्यांना चोखाळावा लागला. वसतिगृहात राहून त्यांनी आपले शिक्षण घेतले.

Daya Pawar Information in Marathi

Daya Pawar हे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. तथापि, ‘ बलुतं ‘ हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक साहित्यविश्वात विशेष गाजले. त्यांच्या या पुस्तकाला अनेक मानसन्मान मिळाले. ‘ बलुतं ‘ या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, त्यामध्ये एका वेगळ्याच अनुभवविश्वाचे लेखकाने घडविलेले दर्शन, निवेदनातील परखडपणा आणि कसलाही आडपडदा न ठेवता आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे केलेले वास्तव चित्रण !

‘बलुतं’ हे आत्मकथनपर पुस्तक असले तरी त्यामध्ये लेखकाने येथील समाजजीवनाचादेखील वेध घेण्याचा प्रयत्न केला असल्याने या पुस्तकाला एक वेगळाच संदर्भ प्राप्त झाला. ‘ बलुतं ‘ ने दलित साहित्यात आत्मकथनपर निवेदनात्मक पुस्तकांचा एक नवा प्रवाहच निर्माण केला. ‘ बलुतं ‘ चे हिंदी व इतर काही भारतीय भाषांत अनुवाद झाले. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला.

आपल्या काव्यातून Daya Pawar यांनी दलितांच्या व्यथा – वेदना बोलक्या केल्या. दलितांवर वर्षानुवर्षे होत आलेला अन्याय , त्यांचे चाललेले शोषण आणि या सर्वांमुळे त्यांची आजवर झालेली मानसिक घुसमट यांना पवारांनी प्रभावी शब्दांत वाचा फोडली. आपल्या ‘ कोंडवाडा ‘ या कवितेत ते म्हणतात –

“आज विशाद वाटतो कशा वागविल्या मणामणाच्या बेड्या
गाळात हत्तीचा कळप रुतावा तशा ध्येय आकांक्षा रुतलेल्या
शिळेखाली हात होता तरी नाही फोडला हंबरडा
किती जन्माची कैद कुणी निर्मिला हा कोंडवाडा.”

दया पवार यांना फोर्ड फॅडिशनची शिष्यवृत्ती व पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने ‘ पद्मश्री ‘ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता . २० सप्टेंबर, १९९६ रोजी त्यांचे अकाली निधन झाले.

दया पवार यांचे पुस्तक, ग्रंथ व साहित्य

  • बलुतं – आत्मनिवेदनपर पुस्तक
  • कोंडवाडा – कवितासंग्रह
  • चावडी – लेखसंग्रह

हे सुद्धा वाचा –

Related Posts