आपण या आर्टिकल मध्ये देशातील व विशेषतः महाराष्ट्रातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजय रामचंद्र गाडगीळ (१९०१-१९७१) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Dhananjay Ramchandra Gadgil यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

धनंजय रामचंद्र गाडगीळ हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, संस्था निर्माते आणि भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. ते गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणेचे संस्थापक संचालक आणि भारताच्या चौथ्या आणि पाचव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राज्यांना केंद्रीय सहाय्य वाटपासाठी आधार म्हणून काम करणाऱ्या गाडगीळ सूत्राचे लेखक होते. महाराष्ट्रातील शेतकरी सहकारी चळवळीच्या विकासातील योगदानाचे श्रेय त्यांना जाते.
धनंजय रामचंद्र गाडगीळ माहिती मराठी
धनंजयराव गाडगीळ हे देशातील एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होत. धनंजय रामचंद्र गाडगीळ हे त्यांचे संपूर्ण नाव. धनंजयरावांचा जन्म १० एप्रिल, १९०१ रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे शिक्षणही नागपूर येथेच झाले. पुढे उच्च संपादन केल्या. शिक्षणासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. तेथे त्यांनी केंब्रिजच्या क्वीन्स कॉलेजातून एम. ए. व डी. लिट. या पदव्या इंग्लंडहून भारतात परतल्यावर धनंजयराव गाडगीळ यांनी मुंबई सरकारच्या अर्थखात्यात नोकरी धरली.
सुरतेच्या एम. टी. बी. कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. पुढे सन १९३० मध्ये त्यांची पुण्याच्या ‘ गोखले अर्थशास्त्र आहे. संशोधन केंद्रा’चे संचालक म्हणून नियुक्ती झाली. ही संस्था नावारूपाला आणण्यात गाडगिळांचा महत्त्वाचा वाटा आहे. भारताच्या अर्थकारणाचा गाडगिळांचा विशेष अभ्यास होता. विशेषतः भारतीय शेतीप्रश्नाचे एक तज्ज्ञ म्हणून त्यांचा निर्देश केला जातो.
सहकारी चळवळीच्या माध्यमातून भारतीय शेती उद्योगाच्या प्रगतीला चालना देता येऊ शकेल, असा त्यांचा विश्वास होता. म्हणून येथे सहकारी चळवळीचा पाया घालण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
भारतातील सहकारी चळवळीचे एक ‘ आद्य प्रणेते ‘ म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीशी तर त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध होता. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका व इतर सहकारी संस्था यांच्या विकासातील धनंजयरावांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. या ठिकाणच्या सहकारी चळवळीतील अनेक लहानमोठ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला होता.
धनंजयराव गाडगीळ यांचे पुस्तक
धनंजयराव गाडगिळांनी विविध विषयांवर पंचवीसहून अधिक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांतील काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे सांगता येतील— इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इन इंडिया, फेडरल प्रॉब्लेम्स इन इंडिया, रेग्युलेशन ऑफ वेजेस, प्लॅनिंग इन इंडिया अँड इकॉनॉमिक पॉलिसी इत्यादी.
धनंजयराव गाडगीळ यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली होती. प्रवरानगर (जि. अहमदनगर) येथील सहकारी साखर कारखान्याचे ते पहिले अध्यक्ष होत. भारताच्या रिझर्व्ह बँकेचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. ते काही काळ राज्यसभेचे सभासद होते. ३ मार्च, १९६६ रोजी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची नियुक्ती झाली.
1967 ते 1971 या काळात त्यांनी भारतीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. पदावर असताना त्यांनी देशाच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना राबवण्यात पुढाकार घेतला. आर्थिक विकास हा लोकाभिमुख असायला हवा, असा त्यांचा आग्रह होता. भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, गाडगीळ यांनी भारताच्या पंचवार्षिक योजनांमध्ये राज्यांना केंद्रीय सहाय्य वाटपाच्या धर्तीवर अभ्यास केला.
1969 मध्ये, त्यांनी या उद्देशासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच विकसित केला, ज्याला गाडगीळ फॉर्म्युला म्हणून ओळखले जाते, ज्याने भारताच्या चौथ्या आणि पाचव्या पंचवार्षिक योजनांमध्ये राज्यांना केंद्रीय मदतीचा आधार दिला.धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे ३ मे १९७१ रोजी निधन झाले.
हे सुद्धा वाचा –