मेनू बंद

Balance of Trade व Balance of Payments यातील अंतर काय?

व्यापार आढावा म्हणजे Balance of Trade व देण्या-घेण्याचा आढावा म्हणजे Balance of Payments या व्यावसायिक संज्ञा आहेत. एखाद्या देशाच्या, एखाद्या वर्षातील, संपूर्ण दृश्य आयात-निर्यातीचा हिशोब म्हणजे Balance of Trade होय. तर, एखाद्या देशाच्या Balance of Payments म्हणजे एका निश्चित कालखंडात त्याच्या जगातील इतर राष्ट्रांबरोबरच्या मौद्रिक सौद्यांचा अभिलेख होय. या लेखात आपण, Balance of Trade व Balance of Payments यातील अंतर काय, जाणून घेणार आहोत.

Balance of Trade व Balance of Payments यातील अंतर काय?

Balance of Trade व Balance of Payments यातील अंतर

Balance of Trade व Balance of Payments ह्यात पुढे दर्शविल्याप्रमाणे फरक आहेत-

1. Balance of Trade मध्ये फक्त दृश्य आयाती-निर्यातीचा समावेश असतो आणि Balance of Payments मध्ये देशाच्या दृश्य आणि अदृश्य म्हणजेच सर्व प्रकारच्या आयाती- निर्यातीचा समावेश असतो.

2. ह्या अर्थाने Balance of Trade ची संकल्पना संकुचित आहे, परंतु Balance of Payments ची संकल्पना एक व्यापक संघटना आहे.

3. Balance of Trade, Balance of Payments मध्ये संपूर्णपणे समाविष्ट झालेला असतो, परंतु Balance of Payments, Balance of Trade मध्ये संपूर्णपणे समाविष्ट होत नाही.

4. Balance of Trade चा अर्थ अंतर असा होतो. कारण कोणताही देश वस्तूंची आयात आणि निर्यात समान ठेवू शकत नाही. ह्याउलट, Balance of Payments चा अर्थ देण्या- घेण्यामधील समानता असा होतो. म्हणजेच Balance of Payments नेहमी संतुलित असतो.

जर देशाचा Balance of Payments प्रतिकूल असेल तर देश परदेशातून कर्ज प्राप्त करण्याचा किंवा विदेशी गुंतवण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. ज्या देशाचा Balance of Payments अनुकूल असतो, त्याच्याकडून त्या देशाला कर्ज प्राप्त होऊ शकते. अशाप्रकारे देश Balance of Payments मधील प्रतिकूलता दूर करून तो संतुलित बनवितो. थोडक्यात, देशाच्या Balance of Trade प्रतिकूल असूनही Balance of Payments संतुलित असतो.

5. Balance of Payments चा उपयोग आर्थिक विश्लेषणात तसेच आर्थिक निर्णय घेण्यासाठी केला जातो. परंतु Balance of Trade वरून आर्थिक विश्लेषण करता येत नाही व देशाला आर्थिक निर्णय घेता येत नाही.

6. Balance of Payments अनुकूल असणे हे सुदृढ अर्थव्यवस्थेचे लक्षण असते. परंतु Balance of Trade अनुकूल असूनही अर्थव्यवस्था सुदृढ असेलच असे नाही.

7. Balance of Payments वरून विनिमय दराचे निर्धारण होते, कारण Balance of Payments विदेशी चलनाच्या एकूण मागणी पुरवठ्याचा हिशोब असतो. Balance of Trade विनिमय दराला प्रभावित करू शकतो, पण तो विनिमय दराचे निर्धारण करू शकत नाही.

हे सुद्धा वाचा-

Related Posts