आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक डॉ. अभय बंग आणि डॉ. रानी बंग यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Dr. Abhay Bang and Rani Bang यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

डॉ.अभय बंग आपल्या देशातील आदिवासींना समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अभय बंग आणि त्यांच्या पत्नी राणी बंग यांची नावे प्रमुख आहेत. आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात, महाराष्ट्रातील सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक, बंग दाम्पत्याने गरीब आणि निरक्षर आदिवासींच्या आरोग्य आणि इतर समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
डॉ.राणी बंग डॉ.अभय बंग हे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण जनतेला मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी तसेच परिसरातील सार्वजनिक आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी गेली तीन दशके अथक परिश्रम घेत आहेत. मात्र, त्यांच्या कार्यात त्यांची पत्नी राणी बंगा यांनीही तितकेच मोलाचे योगदान दिले आहे. खरं तर, पती-पत्नीच्या कामाचे स्वरूपच असे आहे की आपण दोघांचा एकमेकांपासून वेगळा विचार करू शकत नाही.
डॉ अभय बंग
अभय बंग यांचा जन्म १९५० मध्ये वर्धा येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव ठाकूरदास बंग व आईचे नाव सुमन बंग असे होते. अभय यांचे संपूर्ण बालपण वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात गेले. त्यांचे शिक्षण ‘ नयी तालीम ‘ शिक्षण पद्धतीत झाले. त्या ठिकाणी त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांच्या पुढील आयुष्यास वळण देण्यास कारणीभूत ठरले. अभय बंग यांच्यावर महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा विशेष प्रभाव आहे. नयी तालीममध्ये शिक्षण घेत असतानाच गांधीजींच्या विचारप्रणालीकडे ते आकर्षित झाले होते. त्यांच्यावरील हा प्रभाव पुढेही कायम राहिला.
गडचिरोलीसारख्या मागासलेल्या आदिवासी विभागात सेवाभावी वृत्तीने कार्य करण्याबाबत त्यांनी घेतलेल्या निर्णयात गांधीवादी विचारांच्या प्रभावाचा महत्त्वाचा भाग होता. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी आचार्य विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता. अभय बंग यांनी नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. ची पदवी संपादन केली. त्यानंतर चंडिगढच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमधून ‘ मेडिसीन ‘ या विषयात एम. डी. केले. सन १९७७ मध्ये त्यांचा राणी चारी यांच्याशी विवाह झाला.
अभय व राणी या दोघांनाही सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नात विशेष रस होता. समाजातील गरीब माणसे व दुर्बल घटक यांना अल्प खर्चात औषधोपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या आरोग्याच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी कार्य करावयाचे असे त्यांनी टरविले. त्याकरिता त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अभय बंग यांना सन १९८३ मध्ये फोर्ड फाऊंडेशनच्या अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यानुसार ते अमेरिकेला गेले आणि बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून ‘ मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ ‘ ची पदवी संपादन केली. ‘
डॉ. राणी बंग
समाजातील दुर्बल घटकांच्या आरोग्यसेवेसारख्या मानवतावादी कार्याची धुरा दोघेही संयुक्तपणे वाहत आहेत. राणी बंग यांचा जन्म चंद्रपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव डॉ. के. व्ही. चारी व आईचे नाव वसुमती चारी असे होते. त्यांचे वडील चंद्रपूर येथे डॉक्टर होते. त्यामुळे राणी यांनीही डॉक्टर होण्याची मनीषा बाळगली होती. नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम. बी. बी. एस. ची पदवी संपादन केली. पुढे स्त्री रोगशास्त्र या विषयात त्यांनी एम. डी. केले. सन १९७७ मध्ये त्यांचा अभय बंग यांच्याशी विवाह झाला.
आपल्या पतीविषयी त्यांनी एके ठिकाणी असे लिहिले आहे की, ‘ अभय हा माझा केवळ नवरा नसून माझा मित्र व माझा गुरू आहे. अभयसारखा गुरू लाभल्यामुळेच सामाजिक कामात, सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात पाऊल टाकू शकले. आधी मी फार वेगळ्या वातावरणात वाढले होते. अभयशी लग्न केल्यामुळे जीवनाच्या साच्या दिशा बदलून गेल्या. राणी बंग व अभय बंग या दोघांनाही फोर्ड फाऊंडेशनकडून अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यानुसार ते दोघे अमेरिकेला गेले आणि त्यांनी बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ ‘ ची पदवी संपादन केली.
सर्च’ची स्थापना व गडचिरोलीस प्रयाण अभय बंग यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्यात संपादन केलेली पदवी केवळ गुणवत्तावाढीसाठी किंवा मोठेपणा दाखविण्यासाठी नव्हती. त्यांना खरोखरच सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नात कार्य करावयाचे होते. त्यादृष्टीने त्यांनी व त्यांच्या पत्नी राणी बंग यांनी ‘ सर्च ‘ (Society for education, action and research in public Health) या संस्थेची स्थापना केली. सन १९८६ मध्ये दोघे पती – पत्नी गडचिरोली येथे वास्तव्यास गेले आणि तेथील आदिवासींना व खेडेगावातील गोरगरीब लोकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. ‘
Dr Abhay and Rani Bang Information in Marathi
गडचिरोलीत स्थानिक लोकांसाठी कार्य करण्यास सुरुवात केल्यानंतर Dr Abhay आणि Rani Bang यांनी तेथे ‘ शोधग्राम ची उभारणी केली. शोधग्राम म्हणजे एक प्रकारचे आदिवासी गावच. आदिवासी भागात कार्य करावयाचे तर आदिवासींच्या जीवनाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या जाणिवेतून आदिवासींना परकेपणा किंवा नवखेपणा वाटणार नाही, अशा पद्धतीचे आरोग्यकेंद्र व गरजेच्या अन्य इमारती यांची रचना केली पाहिजे, असा विचार बंग पती पत्नींनी केला. त्यातून साकार झालेले गाव म्हणजे ‘ शोधग्राम ‘ होय. अशा प्रकारच्या आगळ्या – वेगळ्या उपक्रमांतून त्यांनी आदिवासींचा विश्वास संपादन केला. त्यामुळे आदिवासींशी संवाद साधणे आणि त्यांच्या आरोग्यविषयक गरजांकडे लक्ष पुरविणे बंग पती – पत्नींना सहज शक्य झाले.
सर्च’ च्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी जनतेला आरोग्यसेवा उपलब्ध करून देत असतानाच अभय व राणी बंग यांनी तेथील जनतेच्या आरोग्यासंबंधीच्या विविध प्रश्नांवर संशोधनाचे कार्यही हाती घेतले. गडचिरोलीच्या परिसरातील लोकांचे विशेषतः आदिवासींचे आरोग्यासंबंधीचे काही वेगळे असे प्रश्न होते. त्याबाबत बंग पती पत्नींनी अत्यंत महत्त्वपूर्ण असे संशोधन केले. त्यांचे हे संशोधन ‘ लॅन्सेट ‘ या जगप्रसिद्ध वैद्यकीय विषयावरील जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
गडचिरोली विभागातील आरोग्यासंबंधीची एक अतिशय गंभीर समस्या बालमृत्यूचे मोठे प्रमाण ही होती. म्हणून Dr Abhay Bang यांनी बालमृत्यूच्या समस्येकडे विशेष लक्ष पुरविले. आदिवासी विभागातील बालमृत्यूची न्यूमोनिया व कुपोषण ही प्रमुख कारणे होती. डॉ. बंग यांनी बालकांमधील न्यूमोनिया आजारावर मात करण्यासाठी घरोघरी जाऊन नवजात बालकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यावर भर दिला. त्यासाठी बंग पती – पत्नींनी आरोग्यदूतांची कल्पना राबविली.
या आरोग्यदूतांमार्फत प्रत्येक आजारी बालकाला आरोग्यसेवा व औषधोपचार उपलब्ध करून मोठी घट झाली आहे. दिले जातील याची काळजी घेतली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गडचिरोली विभागातील बालमृत्यूच्या प्रमाणात आता अभय बंग यांनी गडचिरोलीत आपल्या कार्याला सुरुवात केल्यावर तेथील लोकांमधील, विशेषत : आदिवासींमधील आणखी एका गंभीर समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. ती म्हणजे त्यांची व्यसनाधीनता. गडचिरोलीच्या परिसरातील आदिवासींमध्ये दारू पिण्याचे तसेच अन्य व्यसनांचे प्रमाण खूप मोठे होते.
दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या आरोग्यावर तर विपरीत परिणाम होत होताच; त्याखेरीज त्यांच्या कौटुंबिक जीवनाचीही वाताहत होत होती. म्हणून Dr Bang यांनी गडचिरोली भागात दारूबंदी व्हावी यासाठी आंदोलन केले. त्याचप्रमाणे त्या प्रश्नावर स्थानिक जनतेत जागृती घडवून आणण्यावरही भर दिला. व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी शिबिरे आयोजित केली. डॉ. बंग यांनी हाती घेतलेल्या या प्रयत्नांना अखेरीस अपेक्षित यश मिळाले. महाराष्ट्र शासनाने सन १९९० मध्ये गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली.
Dr Abhay Bang यांना त्यांच्या समाजसेवेच्या कार्यात पत्नी Dr Rani Bang यांची समर्थ साथ मिळाली. किंबहुना अभय व राणी बंग या दोघा पती – पत्नींनी मिळून समाजसेवेचे व आदिवासींना सबल बनविण्याचे हे कार्य एकत्रि चालविले आहे, या शब्दांत त्यांच्या कार्याचे वर्णन करणे अधिक उचित ठरेल. ”
सन्मान व पुरस्कार
डॉ . अभय बंग यांच्या कार्याचा विविध संस्था व संघटनांनी गौरव केला आहे. त्यांना अनेक पुरस्कार आहेत.
- महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र – भूषण पुरस्कार
- यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ग्रामीण विकास पारितोषिक
- विदर्भ साहित्य संघ पुरस्कार
- आदिशक्ती जीवनगौरव पुरस्कार
- टाईम मॅगॅझिनचा अभय व राणी बंग यांना कपल ऑफ द ईयर पुरस्कार, २००५
- मॅक्ऑर्थर पुरस्कार
- सीएनएन – आयबीएनच्यावतीने लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड
लेखन
डॉ. अभय बंग हे चांगले लेखकही आहेत. कोवळी पानगळ (आदिवासी भागात कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूसंदर्भातील संशोधनपर व अभ्यासपूर्ण लेखन) आणि माझा साक्षात्कारी हृदयरोग ही त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत.
हे सुद्धा वाचा –