मेनू बंद

डॉ. बाबा आमटे – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक डॉ. बाबा आमटे (१९१४-२००८) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Dr. Baba Amte यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

डॉ. बाबा आमटे - Dr. Baba Amte

मुरलीधर देविदास आमटे, ज्यांना बाबा आमटे म्हणून ओळखले जाते, ते एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते होते जे विशेषत: कुष्ठरोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात. त्यांना पद्मविभूषण, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, गांधी शांतता पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, टेम्पलटन पुरस्कार आणि जमनालाल बजाज पुरस्कार यासह अनेक पुरस्कार आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना भारताचे आधुनिक गांधी म्हणूनही ओळखले जाते.

बाबा आमटे मराठी माहिती

थोर समाजसेवक बाबांचे पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे. बाबांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. त्यांनी कुष्ठरोग निर्मूलन आणि कुष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य केले. सुरुवातीला बाबा आमटे हे पेशाने वकील होते; पण ऐन उमेदीत आपला वकिलीचा व्यवसाय सोडून त्यांनी व त्यांच्या पत्नी साधनाताई यांनी महारोग्यांच्या सेवाकार्याला वाहून घेतले. त्यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा या गावाजवळ ‘ आनंदवन ‘ या नावाने एक वसाहत स्थापन केली. या वसाहतीत महारोग्यांच्या पुनर्वसनाच्या कार्याला प्रारंभ केला.

महारोग हा एक भयानक रोग समजला जातो. एखाद्याला या रोगाचा उपसर्ग झाला तर तो दुर्दैवी जीव माणसातूनच उठतो. समाजातील इतर लोकच नव्हे तर अगदी जवळचे नातेवाईकही त्या व्यक्तीला थारा देण्यास तयार नसतात. अशा दुर्दैवी जिवांना आश्रय देऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना मायेचा हात देण्यासाठी व त्यांच्या जीवनात नव्याने उभारी आणण्यासाठी बाबा आमटे यांनी ‘ आनंदवना ‘ ची स्थापना केली.

डॉ. बाबा आमटे यांचे कार्य

बाबा आमटे यांच्या कार्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, कुष्ठरोग्यांवर केवळ उपचार करण्यापुरतीच आपल्या कार्याची व्याप्ती मर्यादित न ठेवता त्यांनी कुष्ठरोग्यांना मानसिक आधार मिळवून देण्याचे, त्यांच्यातील आत्मविश्वास जागविण्याचे, त्यांना कामाची संधी उपलब्ध करून देऊन आत्मनिर्भर बनविण्याचे आणि या मार्गाने त्यांचे पुनर्वसन घडवून आणण्याचे उद्दिष्ट मनाशी बाळगले आहे. बाबांनी आनंदवनात मूळच्या खडकाळ जमिनीवर शेतीचे विविध प्रयोग सुरू केले. ही शेती पिकविण्याचे काम येथील कुष्ठरोगीच करतात.

शेतीतील शारीरिक कष्टाची व अन्य स्वरूपाची सर्व कामे या वसाहतीमधील रहिवासी करताना दिसतात. त्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचा भाजीपाला, फळे व अन्नधान्य यांचे उत्पन्न काढले जाते. शेतीच्या जोडीनेच इतर काही हस्तव्यवसायही तेथे चालविले जात आहेत. बाबा आमटे यांनी या कार्यासाठी कोणाकडूनही देणगी न घेता स्वावलंबनावरच सर्व भिस्त ठेवली आहे. * दान घेतले की कार्याचा नाश होतो ‘ असा त्यांचा सिध्दान्त आहे.

Baba Amte Information in Marathi

कुष्ठरोग्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा व कुष्ठरोग्यांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त व्हावे , असाही बाबांचा प्रयत्न आहे. ते स्वतः कुष्ठरोग्यांची सेवा म्हणजे ईश्वरसेवाच होय, या भावनेने कार्य करीत आले आहेत. बाबांची ही भावना त्यांच्या एका वचनातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. ते म्हणतात, ” मी देवाच्या शोधात गेलो. देव मला सापडला नाही. मी आत्म्याच्या शोधात गेलो. आत्मा मला सापडला नाही. मग मी माझ्या भावांच्या – कुष्ठरोग्यांच्या सेवेला गेलो, तेथे मला देवही दिसला नि आत्माही मिळाला. ”

Baba Amte यांनी ‘ महारोगी सेवा समिती स्थापन केली आहे. तिच्या वतीने आनंदवनाखेरीज अशोकवन नागपूर , सोमनाथ – मूल , नागेपल्ली – हेमलकसा हे प्रकल्पही चालविले जातात. याच समितीच्या वतीने लोकबिरादरी हेमलकसा येथे आदिवासींच्या विकासाचा प्रकल्पही चालविला जातो. त्यामार्फत आदिवासींच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत.

बाबा आमटे हे राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. भारतीय जनतेच्या मनात राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी, या उद्देशाने त्यांनी १९८५-८६ मध्ये शंभर दिवसांचे ‘ भारत जोडो ‘ अभियान पार पाडले. हे अभियान म्हणजे देशातील जनतेला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी त्यांनी योजलेली भारत यात्राच होती.

पंजाबच्या प्रश्नाचा गुंता सोडविण्यासाठी तेथील शीख जनतेच्या भावनांवर फुंकर घालून तिच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण केला पाहिजे आणि त्यायोगे तिला परत राष्ट्रीय प्रवाहात सहभागी करून घेतले पाहिजे, असे त्यांचे मत होते. ही गोष्ट साध्य करता यावी म्हणून पंजाबात अशांत परिस्थिती असतानादेखील त्यांनी पंजाबला भेट दिली आणि शिखांच्या प्रमुख नेत्यांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रीय एकात्मतेच्या या कट्टर पुरस्कर्त्याचा प्रांतवाद , भाषावाद व संकुचित प्रादेशिक दृष्टिकोनास तीव्र विरोध आहे. साहजिकच, अलीकडील काळात वारंवार पुढे येणाऱ्या ‘ स्वतंत्र विदर्भा ‘ च्या मागणीसाठी त्यांचा विरोध आहे.

सामाजिक न्याय व पर्यावरणरक्षण हे प्रश्नही बाबांच्या विशेष जिव्हाळ्याचे विषय आहेत. नर्मदा नदीवर मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांत ‘ नर्मदा सागर ‘ आणि ‘ सरदार सरोवर ‘ ही दोन मोठी धरणे बांधण्याची योजना सरकारने आखली आहे; परंतु या प्रकल्पांमुळे तेथील गरीब आदिवासी जनता आणि सामान्य शेतकरी मोठ्या संख्येने विस्थापित होण्याचा धोका आहे.

या विस्थापितांचे योग्य पुनर्वसन करण्यासंबंधी मध्य प्रदेश , गुजरात व महाराष्ट्र या तीनही राज्यांच्या सरकारांनी पुरेशी काळजी घेतलेली नाही. तसेच वरील प्रकल्पांमुळे वरील राज्यांतील जंगलांचे फार मोठे क्षेत्र पाण्याखाली जाऊन नैसर्गिक पर्यावरणाचा तोल ढळण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. म्हणून या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनतेने श्रीमती मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘ नर्मदा बचाव ‘ आंदोलन उभारले. डॉ. बाबा आमटे यांचा मृत्यू ९ फेब्रुवारी, २००८ ला झाला.

पुरस्कार – सन्मान

समाजातील उपेक्षित घटक व कुष्ठरोगी यांच्यासाठी बाबा आमटे यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बहुमान प्राप्त झाले आहेत.

  1. १९८५ – रॅमन मॅगसेसे
  2. १९८६ – पद्मविभूषण
  3. १९८८ – मानवी हक्क पुरस्कार
  4. १९९० – टेंपल्टन पुरस्कार
  5. १९९१ -राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड
  6. १९९९ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
  7. १९९९ – आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार
  8. २००४ – महाराष्ट्र – भूषण
  1. काव्यसंग्रह: ज्वाला आणि फुले उज्ज्वल उद्यासाठी
  2. पुस्तक: माती जागवील त्याला मत

हे सुद्धा वाचा –

Related Posts