मेनू बंद

डॉ. होमी जहांगीर भाभा – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महान भारतीय अणुवैज्ञानिक डॉ. होमी भाभा यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Dr. Homi Jehangir Bhabha यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

डॉ. होमी जहांगीर भाभा (Dr. Homi Jehangir Bhabha) - संपूर्ण माहिती मराठी

होमी जहांगीर भाभा हे भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ, संस्थापक संचालक आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) मधील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. “भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे भाभा हे अणुऊर्जा आस्थापना, ट्रॉम्बे (AEET) चे संस्थापक संचालक देखील होते, ज्याला त्यांच्या सन्मानार्थ भाभा अणु संशोधन केंद्र असे नाव देण्यात आले आहे.

होमी जहांगीर भाभा माहिती मराठी

डॉ. होमी भाभा हे जागतिक कीर्ती संपादन केलेले थोर भारतीय अणुवैज्ञानिक होत. भारताच्या अणुशक्ती विकास कार्यक्रमाचे खरेखुरे शिल्पकार म्हणून त्यांचेच नाव घेतले जाते. डॉ. भाभा यांचे संपूर्ण नाव होमी जहांगीर भाभा असे होते. ३० ऑक्टोबर, १९०९ रोजी मुंबईतील एका संपन्न पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांमधून झाले. लहानपणापासूनच एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ते ओळखले जात होते.

पुढे सन १९२७ मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी डॉ. भाभा इंग्लंडला रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांनी प्रथम केंब्रिज विद्यापीठातून सन १९३० मध्ये विज्ञानाची पदवी (मेकॅनिकल सायन्सेस ट्रायपास) संपादन केली. १९३४ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पीएच. डी. ही पदवी मिळविली. १९४२ मध्ये ते अॅडम्स पारितोषिकाचे मानकरी ठरले. त्यानंतर १९४२ ते १९४५ या काळात बंगळूरच्या ‘ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ‘ या संस्थेमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.

डॉ. होमी भाभा यांना परदेशातील अनेक नामवंत संस्थांमध्ये संशोधनकार्य आणि अन्य बाबतींत खूपच संधी उपलब्ध होत्या. तथापि, केवळ राष्ट्रसेवेच्या भावनेतून त्यांनी त्या सर्व संधी नाकारून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी आपले संशोधनकार्य पुढे चालू ठेवले. मुंबई येथील ‘ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च – TIFR ‘ या संस्थेच्या उभारणीत (सन १९४५) डॉ. भाभांचा महत्त्वाचा सहभाग होता. ते या संस्थेचे पहिले संचालक होते .अवकाश व कण सिद्धान्तावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले.

डॉ. होमी जहांगीर भाभा – भारताच्या अणुविज्ञानाचे जनक

‘ भारताच्या अणुविज्ञानाचे जनक ‘ हा मान डॉ. भाभा यांच्याकडेच जातो. भारतातील पहिले अणुशक्ती संशोधन केंद्र ‘ मुंबईजवळील तुर्भे या ठिकाणी उभारण्यात आले. या केंद्राची उभारणी करण्यासाठी डॉ. भाभांनी फार मोठे परिश्रम घेतले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच तुर्भे येथे ‘ अप्सरा ‘ ही अणुभट्टी बसविण्यात आली. भारतात अणुशक्ती संशोधनाला चालना मिळावी अशी त्यांची इच्छा होती. या बाबतीत भारत सरकारने अनुकूल भूमिका घ्यावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते.

अणुशक्ती संशोधनाच्या क्षेत्रात डॉ. भाभांनी केलेल्या योगदानाची स्मृती म्हणून तुर्भे येथील अणुशक्ती केंद्राला आता ‘ डॉ. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र ‘ असे नाव देण्यात आले आहे. भारतात अवकाश संशोधन कार्यक्रम सुरू करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. डॉ. भाभा हे भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.

जेव्हा भाभा यांच्या लक्षात आले की अणुऊर्जा कार्यक्रमासाठी तंत्रज्ञानाचा विकास यापुढे टीआयएफआरमध्ये करता येणार नाही, तेव्हा त्यांनी सरकारला या उद्देशासाठी पूर्णपणे समर्पित नवीन प्रयोगशाळा बांधण्याचा प्रस्ताव दिला. यासाठी ट्रॉम्बे येथे 1200 एकर जमीन मुंबई सरकारकडून संपादित करण्यात आली. अशाप्रकारे अणुऊर्जा प्रतिष्ठान ट्रॉम्बे (AEET) 1954 मध्ये कार्य करू लागले. त्याच वर्षी अणुऊर्जा विभाग (DAE) देखील स्थापन करण्यात आला.

त्यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा मंचांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 1955 मध्ये स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरावरील संयुक्त राष्ट्र परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते 1958 मध्ये अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे परदेशी मानद सदस्य म्हणून निवडले गेले.

होमी भाभा यांना अॅडम्स पुरस्कार (1942) आणि पद्मभूषण (1954) ने सन्मानित करण्यात आले. 1951 आणि 1953-1956 मध्ये भौतिकशास्त्राच्या नोबेल पारितोषिकासाठीही त्यांची नामांकन करण्यात आली होती. २४ जानेवारी, १९६६ रोजी जीनिव्हाजवळ झालेल्या एका विमान अपघातात या थोर शास्त्रज्ञाचा दुर्दैवी अंत झाला.

हे सुद्धा वाचा –

Related Posts