आपण या आर्टिकल मध्ये भारतातील भौतिकीविज्ञ,गणितज्ञ व वैज्ञानिक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Dr. Jayant Narlikar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

डॉ. जयंत विष्णू नारळीकर माहिती मराठी
डॉ.जयंत नारळीकर यांचे पूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर आहे. त्यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापुरात झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे रँग्लर होते. बनारस हिंदू विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठात ते गणिताचे प्राध्यापक होते. त्यामुळे जयंत नारळीकर यांना वडिलांकडून गणिताचा वारसा मिळाला होता. जयंत नारळीकर यांनी 1957 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून B.Sc पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले.
तेथे केंब्रिज विद्यापीठाची गणिताची ट्रायपास परीक्षा उत्तीर्ण केली आणि रँग्लरची पदवी मिळवली. याशिवाय त्यांनी प्रत्यक्षात Ph.D आणि D.Sc या पदव्याही संपादित केल्या गेल्या. डॉ. नारळीकर रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीचे 1963 पासून फेलो आहेत.
त्यांनी केंब्रिज विद्यापीठात अध्यापन आणि संशोधनही केले आहे. डॉ. जयंत नारळीकर हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे 1972 पासून खगोलशास्त्रीय भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते 1974 मध्ये इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो झाले आणि 1976 मध्ये इंडियन नॅशनल सायन्सेस अकादमीची फेलोशिप त्यांना मिळाली.
Dr. Jayant Narlikar Information in Marathi
फ्रेड हॉईल या वैज्ञानिकासमवेत नारळीकरांनी खगोलशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधनकार्य केले आहे. फ्रेड हॉईल व Dr. Jayant Narlikar यांनी संशोधनाद्वारे गुरुत्वाकर्षणाविषयीचा नवा सिद्धान्त मांडला . त्यामध्ये त्यांनी अर्स्ट मारव यांच्या तत्त्वाला गणितीय रूप देऊन आइनस्टाइन यांच्या गुरुत्वाकर्षण सिद्धान्तांशी त्याची सांगड घातली. त्याचप्रमाणे त्यांनी विश्वातील द्रव्याच्या निर्मितीसंबंधी गणितीय विवरण केले.
जडत्व हा वस्तूचा मौलिक गुणधर्म नसून त्याचा विश्वरचनेशी संबंध आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले. डॉ. जयंत नारळीकर व त्यांचे एक सहकारी के. एम. व्ही. अप्पाराव यांनी असे मत मांडले आहे, की विश्वात कृष्ण विवरांप्रमाणेच श्वेत विवरेही अस्तित्वात आहेत आणि ती प्रत्यक्षात विवरे नसून द्रव्य व ऊर्जा यांची उगम आहेत. डॉ. नारळीकरांनी विश्वोत्पत्तिशास्त्रातील स्थिर अवस्था उपपत्तीच्या संदर्भातही महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.
जयंत नारळीकर पुरस्कार
डॉ. नारळीकर यांनी केलेल्या संशोधनकार्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाली आहेत. केंब्रिज विद्यापीठाने त्यांना टायसन पदक (सन १९६०), स्मिथ पारितोषिक (सन १९६२) व अॅडम्स पारितोषिक (सन १९६७) देऊन त्यांचा सन्मान केला आहे. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने त्यांना सुवर्णपदक बहाल केले आहे. ‘ सोसायटी ऑस्ट्रॉनॉमी डे फ्रान्स ‘ या फ्रान्समधील खगोल शास्त्रविषयक संशोधन संस्थेने सन २००४ चा ‘ प्रिन्स – जान्सेन पुरस्कार ‘ देऊन त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त केला आहे.
भारत सरकारने सन १९६५ मध्ये त्यांना ‘ पद्मभूषण ‘, सन २००४ मध्ये ‘ पद्मविभूषण ‘ तर महाराष्ट्र शासनाने सन २०१० चा ‘ महाराष्ट्रभूषण ‘ हे सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. सन २०१४ मध्ये त्यांना त्यांच्या ‘ चार नगरातले माझे विश्व ‘ या आत्मचरित्रपर पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. डॉ. नारळीकर हे केवळ संशोधक – शास्त्रज्ञ नाहीत तर अखिल भारतीय समाजाचाच दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ व्हावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे द्रष्टे विचारवंतही आहेत.
महाराष्ट्रीयत्वाचा अभिमान असणारा हा शास्त्रज्ञ सातत्याने मराठीत लेखन करीत आला आहे आणि मराठी वाचकांना ते भावत आले आहे. आजही नारळीकरांचे संशोधनकार्य अविरत सुरू आहे. नारळीकरांनी पाया घातलेल्या पुण्यातील ‘ आयुका ‘ या विज्ञान संस्थेच्या माध्यमातून आज देशातील भावी संशोधक – शास्त्रज्ञांची जडणघडण होत आहे.
डॉ. जयंत नारळीकर यांची पुस्तके मराठी
जयंत नारळीकर यांनी लिहिलेल्या काही मराठी पुस्तकांचा समावेश ‘Structure of the Universe’; ‘Astrophysics’, ‘Davidson’, ‘Taylor and Ruderman’ यांनी सह-लेखक; फ्रेड हॉयल यांनी लिहिलेल्या ‘Action at a Distance in Physics and Cosmology’ या पुस्तकासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी खगोलशास्त्रीय भौतिकशास्त्र, गुरुत्वाकर्षण आणि विश्वविज्ञान यावर विपुल लेखन केले आहे. महाराष्ट्रीयन अभ्यासकांना जगाची ओळख करून देणाऱ्या त्यांच्या ‘आकाशी जडले नाते’ या पुस्तकाला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे.
हे सुद्धा वाचा –