आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक डॉ. मंदाकिनी आमटे यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Dr. Mandakini Amte यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

मंदाकिनी आमटे मंदा आमटे या नावाने ओळखल्या जाणार्या या महाराष्ट्रातील वैद्यकीय डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि विशेषतः महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंडांमध्ये लोक बिरादरी प्रकल्पाच्या रूपात परोपकारी कार्य केल्याबद्दल त्यांना पती प्रकाश आमटे यांच्यासह 2008 मध्ये ‘कम्युनिटी लीडरशिप’साठी मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मंदाकिनी आमटे या बाबा आमटे यांच्या सून आहेत.
डॉ. मंदाकिनी आमटे माहिती मराठी
मंदाकिनी आमटे ह्या महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पात चाळीस वर्षांहून अधिक काळ अथक परिश्रम घेतलेल्या माडिया-गोंड लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या पत्नी आहेत. मात्र, डॉ.प्रकाश आमटे यांची पत्नी ही त्यांची जितकी ओळख आहे, तितकीच डॉ. मंदाकिनी यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. मंदाकिनी आमटे यांनी आपल्या कामातून आपली स्वतंत्र किंवा वेगळी ओळख नक्कीच निर्माण केली आहे.
लोक बिरादरी प्रकल्पाच्या उभारणीत प्रकाश आमटे यांच्यासह मंदाकिनी यांचा मोलाचा वाटा आहे. मंदाकिनी आमटे यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून M.B.B.S. ची पदवी संपादित केली. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये अनेस्थेशिया विभागात हाऊस जॉब केला. प्रकाश आमटे यांनीही याच महाविद्यालयातील शस्त्रक्रिया विभागात हाऊस जॉबसाठी प्रवेश घेतला होता. तिथेच दोघांची भेट झाली. दोघांचा स्वभाव एकमेकांशी सुसंगत असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
हे सुद्धा वाचा – डॉ. प्रकाश आमटे यांची संपूर्ण माहिती
Dr. Mandakini Amte Information in Marathi
Dr. Prakash व Mandakini Amte यांच्या लग्न करण्याबाबतच्या निर्णयाची गोष्ट बाबा आमटे यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी प्रकाश यांना एकच प्रश्न विचारला, ‘ तू काय काम करणार आहेस, याची हिला माहिती आहे का ?? कारण प्रकाश यांनी बाबांच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्णय अगोदरच घेतला होता. बाबांच्या प्रश्नावर प्रकाश यांनी उत्तर दिले की, मी तिला सर्व काही सांगितले आहे आणि तिच्या मनाचीही तयारी आहे . त्यावर बाबांनी लगेच लग्नाला समती दिली आणि लगेच लग्न करण्यास सांगितले.
प्रकाश व मंदाकिनी यांचा विवाह २४ डिसेंबर, १९७२ रोजी आनंदवनातच पार पडला. विवाह आनंदवनात झाल्याने तो अत्यंत साध्या पद्धतीने झाला, हे उघडच होते. लग्नात देण्या – घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. लग्नासाठी भटजी बोलविण्यात आला नव्हता. गोडधोड, जेवणावळी यांना फाटा देण्यात आला होता. लग्नाला निमंत्रित पाहुण्यांच्या बरोबर आनंदवनातील सर्व कुष्ठरोग्यांचीही उपस्थिती होती. यावरून हे स्पष्ट होते की, विवाहानंतर आपणास कशा प्रकारचे जीवन जगावे लागणार आहे याची मंदाकिनी यांना पूर्ण कल्पना होती आणि त्याचा त्यांनी मनापासून स्वीकार केला होता. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या आई – वडिलांचीही संमती होती.
मंदाकिनी यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ नागपूरच्या गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजात नोकरी केली. अर्थात, आपण फार काळ नोकरीच्या बंधनात अडकून राहायचे नाही, हे त्यांनी अगोदरच ठरविले होते. लवकरच म्हणजे सन १९७४ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पावर त्या दाखल झाल्या.
हे सुद्धा वाचा – डॉ. बाबा आमटे – संपूर्ण माहिती
Dr. Mandakini Amte यांचे कार्य
सुरुवातीच्या काळात हेमलकसाच्या जागेवर सगळ्या गैरसोयीच होत्या . प्रकाश व मंदाकिनी दोघेही डॉक्टर होते, पण त्यांच्या सांसारिक जीवनाची सुरुवात एका छोट्याशा झोपडीत झाली. त्यांना आंघोळीसाठीदेखील नदीवरच जावे लागत होते. मग बाकीच्या सोयी – सुविधांचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. पावसाळ्याच्या चार महिन्यांत प्रकल्पावरील या भागाचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटत असे.
अशा प्रतिकूल परिस्थितीत मंदाकिनी यांनी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून लोकबिरादरी प्रकल्पाचा दवाखाना चालवून त्या परिसरातील माडिया गोंड आदिवासींना वैद्यकीय सोयी – सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्या लोकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांकडे आपुलकीने व आस्थेवाईकपणे लक्ष पुरविले.
आदिवासींच्या आरोग्यविषयक समस्यांची सोडवणूक करण्याचे मर्यादित उद्दिष्ट आमटे पतीपत्नींनी कधीच ठेवले नव्हते. लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून माडिया – गोंड आदिवासींच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी डॉ . प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांनी विविध उपक्रम राबविले. त्यात त्यांना यशही मिळत गेले.
हे सुद्धा वाचा – बाबा आढाव – संपूर्ण माहिती
त्या संदर्भात प्रकाश आमटे यांनी असे लिहिले आहे की, “ १९७३ मध्ये आम्ही हेमलकसा परिसरात काम सुरू केलं तेव्हा इथले माडिया – गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडलेले होते. पण आम्ही एकेक काम उभारत गेलो आणि त्यातून इथलं जीवन बदलत गेलं. आता इथे आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे. मुलं शाळेत शिकून शहाणी होताहेत, बाहेर जाऊन नोकऱ्या करताहेत. इथे आता शेती पिकू लागलीय. हेमलकशाचा प्रवास असा अंधारातून उजेडाकडे ‘ होतोय.”
मोनॅकोच्या प्रिन्सिपॅलिटीने 1995 मध्ये प्रकाश मंदाकिनी यांच्या जीवन आणि कार्याच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट काढले – जसे त्यांनी 1955 मध्ये अल्बर्ट श्वेट्झरसाठी केले होते. मोनॅकोच्या राज्याने परदेशी व्यक्तीला त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी सन्मानित करण्यासाठी स्टॅम्प काढण्याची ही दुसरी वेळ होती.
एक फ्रेंच जोडपे, गाय आणि ग्रीट बार्थेलेमी, ज्यांनी पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला श्वेट्झरसोबत काम केले होते, त्यांनी 1992 मध्ये या प्रकल्पाला भेट दिली. हेमलकसा आणि आफ्रिकेतील जिथे श्वेत्झर काम करत होते तेथील परिस्थितीची समानता पाहून ते प्रेरित झाले. या फ्रेंच जोडप्याने परत जाऊन मोनॅकोचा प्रिन्स रेनियर तिसरा यांना आमटेसचा सन्मान करण्यासाठी पोस्टल स्टॅम्प प्रकाशित करण्याचे आवाहन केले, जे 1995 मध्ये करण्यात आले होते.
हे सुद्धा वाचा – सिंधुताई सपकाळ – संपूर्ण माहिती