मेनू बंद

डॉ. प्रकाश आमटे यांची संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक डॉ. प्रकाश आमटे यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Dr. Prakash Amte यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash Amte) यांची माहिती

प्रकाश आमटे हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांना 2008 मध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड आणि शेजारील तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लोक बिरादरी प्रकल्पाच्या रूपात परोपकारी कार्य केल्याबद्दल ‘कम्युनिटी लीडरशिप’साठी मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांना बिल गेट्स यांच्या हस्ते ICMR जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रकाश आमटे हे मॅगसेसे पुरस्कार विजेते बाबा आमटे यांचे दुसरे पुत्र आहेत. त्यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (Government Medical College) वैद्यकीय पदवी प्राप्त केली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC), नागपूर येथे पदव्युत्तर शिक्षणादरम्यान त्यांची पत्नी मंदाकिनी यांची भेट झाली. प्रकाश आणि मंदाकिनी बाबा आमटे यांच्यात सामील झाले आणि तिच्या वडिलांना आणि इतरांना कुष्ठरोगाच्या निषिद्ध आणि भीतीवर मात करण्यास मदत केली.

हे सुद्धा वाचा – डॉ. मंदाकिनी आमटे

डॉ. प्रकाश आमटे यांची माहिती मराठी

आई – वडिलांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा Dr. Prakash Amte यांनी लहानपणीच केलेला निर्धार आणि तो वसा कधीही न टाकण्याविषयी त्यांनी दाखविलेली जिद्द व मनाचा कणखरपणा यातच त्यांच्या कर्तृत्वाचे सार सामावलेले आहे. प्रकाश आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर, १९४८ रोजी वरोडा येथे झाला. प्रकाशजींच्या आईचे नाव साधनाताई. त्यांनीदेखील आपल्या पतीच्या कार्यास समर्थपणे साथ दिली होती. बाबांच्या बरोबरीने त्यांनी आनंदवनात महारोग्यांच्या सेवाकार्याला वाहून घेतले होते.

त्यांचे संपूर्ण बालपण बाबांनी महारोग्यांच्या सेवेसाठी स्थापन केलेल्या ‘ आनंदवन ‘ या वसाहतीत व्यतीत झाले; कारण बाबा आमटे सहकुटुंब त्या वसाहतीतच वास्तव्यास होते. त्यांनी बाबांचे महारोग्यांच्या सेवेचे कार्य बालपणापासून प्रत्यक्ष पाहिले आणि त्या कार्याचे त्यांच्यावर नकळत संस्कार होत गेले. त्यांनी स्वतःच त्यासंबंधी असे म्हटले आहे की, बाबा कुष्ठरोग्यांवर स्वतः उपचार करायचे, त्यांच्या जखमा बांधायचे, हे सतत बघत आल्याने आमच्या मनात त्याबद्दल किळस निर्माण होऊ शकली नाही.

सन २०१४ मध्ये ‘ डॉ . प्रकाश बाबा आमटे ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला . या चित्रपटात प्रकाश आमटे यांची भूमिका नाना पाटेकर यांनी तर डॉ . मंदाकिनी यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी केली होती.

हे सुद्धा वाचा – सिंधुताई सपकाळ – संपूर्ण माहिती मराठी

Dr. Prakash Amte Information in Marathi

Dr. Prakash Amte यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, ” कुष्ठरोगाबाबत सर्वसामान्य लोकांच्याच नव्हे तर डॉक्टरांच्या मनातही प्रचंड गैरसमज होते, त्यामुळे आनंदवनात काम करण्यासाठी जाहिरात देऊनही कोणी डॉक्टर यायचे नाहीत. ” या अनुभवावरून आपण डॉक्टर व्हावे असे मला सातवी – आठवीत असतानाच वाटू लागले होते.

म्हणजे त्यांनी डॉक्टर होण्याची इच्छा स्वत: च्या उज्वल भवितव्यासाठी नव्हे, तर दीनांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून बाळगली होती. त्यानुसार सन १९७७ मध्ये त्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस.ची. पदवी संपादन केली. त्यांनी आपली इंटर्नशिपही आनंदवनातच सुरू केली. पुढे त्यांनी नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एम. एस. साठी प्रवेश घेतला.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडचा परिसर हा प्रामुख्याने आदिवासी जमातीच्या वास्तव्याचा प्रदेश होय. या भागात माडिया – गोंड जमातीची वस्ती आहे. अत्यंत प्रतिकूल व मागासलेल्या अवस्थेत जीवन जगत असलेल्या या आदिवासींसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असे बाबा आमटे यांना वाटले. त्याकरिता त्यांनी भामरागड परिसरात

आपणास काही जमीन मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली. बाबांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने भामरागडजवळील हेमलकसा येथील जमीन बाबांच्या नियोजित प्रकल्पासाठी दिली. ती जमीन ताब्यात मिळताच बाबांनी त्या परिसरातील आदिवासींसाठी ‘ लोकबिरादरी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली.

बाबा आमटेंनी लोकबिरादरी प्रकल्पाची घोषणा केली तरी त्यांच्यावर आनंदवनची जबाबदारी असल्यामुळे त्यांना हेमलकसा येथे थांबून प्रकल्पाचे काम पाहणे शक्य नव्हते. हेमलकसाची जमीन प्रकल्पासाठी मिळाली, तेव्हा प्रकाश आमटे नागपूरला एम. एस. चा अभ्यास करीत होते ; पण जमीन मिळाल्याचे समजल्यावर आपले व् शिक्षण मध्येच सोडून मार्च, १९७४ मध्ये ते थेट हेमलकसा येथे दाखल झाले. प्रतिकूल परिस्थितीशी सामना हेमलकसा हा अतिशय दाट जंगलाचा भाग होता.

प्रकाश आमटेंनी तेथे कामाला सुरुवात केली तेव्हा परिस्थि सर्वच बाजूंनी अडचणीची होती. प्रकल्पाच्या जागेवरही सगळे जंगलच होते. बाह्य जगापासून पूर्णपणे तुटलेल्या आणि दळणवळणाच्या साधनांचा अभाव असलेल्या अशा ठिकाणी प्रकल्प उभा करणे हे फार मोठे आव्हान होते. सुरुवातीच्या काळात तर तेथे राहण्याचीही काही व्यवस्था नव्हती. प्रकाश व त्यांचे सहकारी यांना झाडाखाली मुक्काम करूनच कामाचा श्रीगणेशा करावा लागला होता. तथापि, आलेल्या संकटांना न जुमानता व निर्माण झालेल्या अडचणींपुढे न डगमगता त्या सर्वांनी मोठ्या जिद्दीने प्रकल्प उभारणीचे कठीण आव्हान यशस्वीरीत्या पेलले.

हेमलकसामध्ये लोकबिरादरी प्रकल्पाअंतर्गत प्रकाश आमटेंनी सर्वप्रथम आदिवासींसाठी मोफत दवाखाना सुरू केला. हा दवाखाना चालवितानाही प्रकाश व त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. हेमलकसात रस्ते, वीज, पाणी, टेलिफोन यांसारख्या कसल्याही सुविधा नव्हत्या. दवाखान्यासाठी साधार उपलब्ध नव्हती. त्यामुळे सुरुवातीला साध्या झोपडीतच दवाखाना चालवावा लागला. शहरी भागाशी किंवा मोठ्या गावांशी संपर्क ठेवता येत नसल्याने वेळेवर औषधे उपलब्ध होणे कठीण होत असे.

निवासाच्या चांगल्या सोयी नसल्याने आणि आजूबाजूला घनदाट जंगलच असल्याने जंगली प्राणी, विषारी साप, विंचू – इंगळी यांचा धोका नेहमीच जाणवत असे. हेमलकसा परिसरात वस्ती करून असलेले माडिया – गोंड आदिवासी जमातीचे लोक खूपच मागासलेले होते. आत्यंतिक दारिद्र्य, कमालीचे अज्ञान, अंधश्रद्धा व भोळ्या समजुती यांचा जबरदस्त पगडा आणि प्रगत समाजापासून अलिप्तता ही त्यांच्या जीवनाची काही ठळक वैशिष्ट्ये.

बाहेरून आलेल्या लोकांविषयी त्यांच्या मनात असलेली भीतीची भावना व अंधश्रद्धांचा पगडा या कारणांमुळे दवाखाना मोफत असला तरी माडिया – गोंड दवाखान्याकडे फिरकत नसत. पुन्हा भाषेची अडचण होतीच. आदिवासींना माडिया भाषेशिवाय अन्य कोणतीही भाषा बोलता येत नसल्याने त्यांच्याशी संवाद साधणे शक्य होत नसे. तथापि, अशा प्रतिकूल परिस्थितीतही प्रकाश आमटेंनी आदिवासींशी समरस होऊन त्यांचा विश्वास संपादन केला. मग मात्र आदिवासी दवाखान्याचा लाभ घेण्यासाठी येऊ लागले. कुपोषण ही आदिवासींची प्रमुख समस्या होती.

साहजिकच अनेक प्रकारच्या आजारांचे ते शिकार होत असत. त्यांच्यावर उपचार करताना वेळेचे कसलेही बंधन प्रकाश यांनी स्वतःवर घातले नाही. दवाखान्यात कसलीही आधुनिक साधने हाताशी नसताना रात्रीच्या वेळी आलेल्या रोग्यांची अवघड शस्त्रक्रिया व तीदेखील कंदिलाच्या उजेडात करण्याच्या दिव्यातून जाण्याची वेळ त्यांच्यावर अनेकदा आली आहे. अशा कठीण दिव्यातून यशस्वीरीत्या पार पडण्याचा पराक्रम प्रकाशजकडून घडला आहे. आज वर्षाकाठी चाळीस हजारांहून अधिक लोकांच्या आरोग्याची काळजी लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत दवाखान्याच्या माध्यमातून ते घेत आहेत.

सुद्धा वाचा – बाबा आढाव – संपूर्ण माहिती मराठी

डॉ. प्रकाश आमटे यांचे कार्य

माडिया – गोंड जमातीच्या मागासलेपणाचे एक कारण त्या लोकांचे अज्ञान हे होते. त्यांच्या अज्ञानामुळे ते प्रगत समाजातील काही घटकांकडून होणाऱ्या शोषणाचे बळी ठरत होते. हेमलकसा परिसरातील आदिवासी आपल्या मुलांना शाळेत पाठवत नव्हते. याचे एक कारण, आदिवासींना शिक्षणाचे महत्त्वच समजत नव्हते. त्यांच्या दारिद्र्यामुळे लहान मुलासह कुटुंबातील प्रत्येकाला श्रम केल्याशिवाय जगणे शक्य होत नसे. त्या भागात जिल्हा परिषदेच्या काही एकशिक्षकी शाळा होत्या ; पण त्यांचे अस्तित्व फक्त कागदोपत्री होते. त्या शाळांत मुले कधीच जात नसत.

आदिवासी मुलांना शिक्षण मिळाल्याखेरीज त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होणार नाही हे लक्षात घेऊन प्रकाश आमटेंनी लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत तेथील मुलांसाठी शाळा सुरू केली. घरचे खाऊन शाळा शिकणे माडिया मुलांसाठी मुळीच शक्य नव्हते. म्हणून प्रकाश यांनी त्या मुलांच्या राहण्या – जेवणाची व्यवस्थाही आपल्या प्रकल्पाच्या जागेवरच केली. अशा प्रकारे त्या शाळेचे आश्रमशाळेत रूपांतर झाले.

त्या शाळेत शिकलेली काही आदिवासी मुले पुढे डॉक्टर झाली. काही जणांनी उच्च शिक्षण घेऊन निरनिराळ्या क्षेत्रांत नोकऱ्या मिळविल्या. आदिवासींच्या जीवनात घडलेले हे मोठे परिवर्तन होय. प्रकाश आमटे यांच्या अथक प्रयत्नातून हा चमत्कार शक्य झाला. लोकबिरादरी प्रकल्पात प्रकाश आमटेंनी केलेला आणखी एक अनोखा प्रयोग ‘ प्राण्यांचे गोकुळ ‘ हा होय. आदिवासी आपल्या उपजीविकेसाठी जंगलातील प्राण्यांची शिकार करीत असत.

अशा प्रकारे मारल्या गेलेल्या काही प्राण्यांची पिले अनाथ होत असत. जंगलातील अशा अनाथ पिल्लांना गोळा करून प्रकाश आमटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकल्पाच्या जागेवर एक प्राणीसंग्रहालय बनविले. हे प्राण्यांचे अनाथालय सर्वांच्या कौतुकाचा विषय बनले नसते, तरच नवल ! लोकबिरादरी प्रकल्पाला भेट द्यायला आलेल्या एका अमेरिकन बाईने या प्राणी अनाथालयाचे ‘ आमटेज अॅनिमल आर्क ‘ असे नामकरण केले.

आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास घेतलेल्या प्रकाशजींनी त्यासाठी आणखीही काही उपक्रम राबविले. आदिवासींना चांगल्या पद्धतीची शेती करण्यास शिकविणे, शेतीसाठी त्यांना बी – बियाणे पुरविणे, फळांची रोपे देणे, आदिवासींमधील वाद, भांडणतटे यांत मध्यस्थी करणे, बाहेरच्या लोकांकडून आदिवासींची केली जाणारी फसवणूक थांबविणे हे त्यापैकी काही उपक्रम होत. गेली चाळीसहून अधिक वर्षे प्रकाश आमटे व त्यांचे सहकारी लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून हेमलकसा परिसरातील आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सातत्याने झटत आहेत.

पुरस्कार व सन्मान

डॉ . प्रकाश मुरलीधर आमटे यांनी आदिवासी विभागात चालविलेल्या मानवतावादी कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे .

  1. सन १९९२ : कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिककडून गोदावरी गौरव पुरस्कार
  2. सन १९९५ : मोनॅको देशाच्या सरकारने प्रकाश व मंदाकिनी आमटे यांच्या सन्मानार्थ त्यांच्यावर टपाल तिकीट काढले
  3. सन २००२ : भारत सरकारकडून ‘ पद्मश्री ‘ पदवी प्रदान
  4. सन २००८ : डॉ . मंदाकिनी आमटेंसह सामाजिक नेतृत्वासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार
  5. सन २००९ : गॉडफ्रे फिलीप्स लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड
  6. सन २०१२ : लोकमान्य टिळक पुरस्कार
  7. सन २०१४ : मदर टेरेसा पुरस्कार

हे सुद्धा वाचा – इंदुमती पटवर्धन यांची माहिती

Related Posts