आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीतील एक आघाडीचे कार्यकर्ते विठ्ठलराव विखे पाटील (१८९७-१९८०) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Dr. Vithalrao Vikhe Patil यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

विठ्ठलराव विखे पाटील हे महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक (ता. श्रीरामपूर) येथील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे केवळ चौथीपर्यंतचे शिक्षण लोणी खुर्द येथील प्राथमिक शाळेत झाले. पुढे त्यांनी लहान वयातच शेती करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या ताब्यात गेल्या. 1923 मध्ये लोणी बुद्रुक सहकारी पतसंस्था स्थापन करून सार्वजनिक जीवनात ते सहकार क्षेत्राकडे वळले. त्यांनी जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले, तसेच गावातील पाथरवट-वडार मंडळांना एकत्र आणून ‘मजूर सहकारी सोसायटी’ स्थापन केली.
विठ्ठलराव विखे पाटील माहिती मराठी
विठ्ठलराव विखे पाटील हे महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीतील एक आघाडीचे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचे संपूर्ण नाव विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील असे होते. आज महाराष्ट्रात सहकारी चळवळीचा बराच प्रसार झाला आहे. साहजिकच, सहकारमहर्षी म्हणून मिरविणारे अनेक पुढारी जागोजागी आढळून येत आहेत ; परंतु ‘ सहकारमहर्षी ‘ या किताबाचे महाराष्ट्रातील खरेखुरे मानकरी कोण असतील तर ते विठ्ठलराव विखे पाटील हेच होत. येथील सहकारी चळवळीच्या पायाभरणीच्या कार्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
सहकारी क्षेत्रातील त्यांची कामगिरी अत्यंत मोलाची समजली जाते. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक या गावी १ जुलै, १८९७ रोजी झाला. ते ग्रामीण भागातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आले होते आणि त्या काळात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा फारसा प्रसार झाला नव्हता.
साहजिकच, विठ्ठलरावांना शिक्षणाचा विशेष लाभ झाला नव्हता; परंतु त्यांची जिद्द एवढी दांडगी होती की, शिक्षणाचा अभाव हा त्यांनी त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडसर बनू दिला नाही. ते स्वतःच शेतकरी कुटुंबातील असल्याने सामान्य शेतकऱ्यांच्या दुःखाची व हलाखीची त्यांना चांगली जाणीव होती. त्यातूनच या शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी करून दाखविण्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली.
Dr. Vithalrao Vikhe Patil यांचे कार्य
विखे पाटलांनी २३ जानेवारी, १९२३ रोजी आपले जन्मगाव लोणी बुद्रुक या ठिकाणी पहिली ‘ लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी ‘ स्थापन केली. ही पतपेढी केवळ भारतातीलच नव्हे तर, आशियातील सहकारी तत्त्वावर स्थापन होणारी पहिलीच पतपेढी ठरली. त्यानंतर त्यांनी गावोगावी सहकारी पतपेढ्या स्थापन करण्याची मोहीमच हाती घेतली . या सहकारी पतपेढ्यांच्या माध्यमातून गरीब व गरजू शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
१० डिसेंबर, १९२९ रोजी राजुरी या गावी विठ्ठलरावांनी आदिवासी समाजासाठीही ‘ सहकारी सोसायटी ‘ ची स्थापना केली. सन १९३२ मध्ये ‘ गोदावरी – प्रवरा कॅनॉल खरेदी – विक्री संघा’ची स्थापना झाली. त्याच्या स्थापनेत विखे पाटलांनीच पुढाकार घेतला होता. १९४४ मध्ये त्यांनी सहकारी तत्त्वावरील शेतीसंस्था स्थापन केली. विठ्ठलराव विखे पाटील यांचा काही काळासाठी राजकारणाशीही संबंध आला होता.
अहमदनगर जिल्हा लोकल बोर्डाचे ते काही काळ सदस्य होते. ‘ ब्राह्मणेतर चळवळ ‘ व ‘ सत्यशोधक चळवळ ‘ या चळवळींत त्यांनी भाग घेतला होता. या चळवळींतून येथील बहुजन समाजाच्या उत्कर्षाचा मार्ग निघू शकेल, असे त्यांना वाटत होते . तथापि , पुढील काळात मात्र त्यांनी राजकारणापेक्षा सहकारी क्षेत्रावरच आपले लक्ष केंद्रित केले.
१७ डिसेंबर, १९४५ रोजी विठ्ठलराव विखे पाटील आणि त्यांचे इतर सहकारी यांनी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढील अडीअडचणींचे निवारण कसे करता येईल यावर विचार करण्यासाठी बेलापूर (आताचे श्रीरामपूर) येथे एक बागाईतदार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत शेतकऱ्यांसाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखाना सुरू करण्याची कल्पना पुढे आली. विखे पाटलांनी ही कल्पना लगेच उचलून धरली. शेतकरी सहकारी कारखान्याची उभारणी हा ध्यासच जणू त्यांनी घेतला होता. आपले हे स्वप्न साकार व्हावे म्हणून ते एखाद्या झपाटलेल्या माणसाप्रमाणे कामाला लागले.
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना
बेलापूर रोड (श्रीरामपूर) येथे 1945 मध्ये प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डेक्कन कॅनल्स फलोत्पादन परिषदेत विखे-पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी पद्धतीने साखर कारखाना उभारण्याचा ठराव मांडला.
या परिषदेचे अध्यक्ष डॉ.धनंजयराव गाडगीळ असून, उपस्थित शेतकऱ्यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक विखे-पाटील यांच्यावर ठपका ठेवला. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी 1945 ते 1950 या काळात अथक परिश्रम घेतले, गावोगावी फिरून, भागभांडवल उभे केले आणि कारखान्याला शासनाकडून मान्यता मिळवून दिली. कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी स्वतः पैसा खर्च केला. साखर कारखाना काढण्याची विखे पाटील यांची कल्पना त्यावेळी हास्यास्पद मानली जात होती.
शेतकऱ्यांपर्यंत जाऊन ते त्यांना सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्याचे महत्त्व पटवून देणे, शेतकऱ्यांकडून आवश्यक ते सहकार्य मिळवून कारखान्याच्या भागभांडवलाची उभारणी करणे, कारखान्याच्या मंजुरीसाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करणे, कारखान्याच्या स्थापनेसाठी अन्य प्रकारची प्राथमिक तयारी करणे, त्या संदर्भात इतर कार्यकर्त्यांनी हाती घेतलेल्या कामांचा पाठपुरावा करणे इत्यादी कार्यांत विठ्ठलरावांनी स्वतः पूर्णपणे गुंतवून घेतले होते.
अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत विखे-पाटील यांनी 31 डिसेंबर 1950 रोजी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांचा पहिला ‘प्रवरा सहकारी कारखाना’ उभारला आणि या कारखान्यातून साखरेचे उत्पादन सुरू झाले. मुंबई राज्याचे तत्कालीन अर्थ व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी शासनाची मान्यता मिळवून कारखान्याला सहकार्य केले. या कारखान्याचे औपचारिक उद्घाटन मात्र तब्बल दहा वर्षांनी म्हणजे १५ मे, १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. हा कारखाना भारतातीलच नव्हे तर , आशिया खंडातीलही सहकारी तत्त्वावरील पहिलाच साखर कारखाना होय.
विठ्ठलराव विखे पाटलांनी शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषतः बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणाला चालना मिळावी, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचे हेच उद्दिष्ट असल्याने त्यांना कर्मवीरांच्या कार्याविषयी आस्था वाटत होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते.
अहमदनगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांची स्थापना करण्यात, तसेच या शाखांना आर्थिक मदत मिळवून देण्यात विठ्ठलरावांनी कर्मवीरांना खूपच सहकार्य केले होते. रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. विठ्ठलराव विखे पाटलांना सामाजिक कार्यातही रस होता. त्यांच्या नेतृत्वाखालील प्रवरानगरच्या सहकारी साखर कारखान्याने सामाजिक कार्यासाठी अनेक धर्मादाय संस्था स्थापन केल्या होत्या.
त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट., तर राहुरी येथील कृषी विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली. 26 जानेवारी 1960 रोजी भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. 27 एप्रिल 1980 रोजी विठ्ठलराव विखे पाटील यांचे निधन झाले.
हे सुद्धा वाचा –