मेनू बंद

दुर्गा भागवत – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये भारतीय समाजवादी लेखिका दुर्गा भागवत यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Durga Bhagwat यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

दुर्गा भागवत संपूर्ण माहिती मराठी - Durga Bhagwat Information in Marathi

दुर्गा भागवत

दुर्गा नारायण भागवत, भारतीय विद्वान, समाजवादी लेखिका होत्या. त्यांनी संस्कृत आणि बौद्ध साहित्याचा अभ्यास केला आणि आदिवासी जीवनाचा अभ्यास करण्यासाठी मध्य प्रदेशातील जंगलात वेळ घालवला. नंतर त्या संशोधक म्हणून मुंबईत परतल्या आणि मराठीत पुस्तके लिहिली. मराठीतील त्या अग्रगण्य महिला दलित लेखिका आहेत. आणीबाणीला विरोध करणाऱ्या प्रमुख लेखकांपैकी त्या एक होत्या. पद्मश्री आणि ज्ञानपीठ यांसारखे संस्थात्मक आणि नागरी सन्मान स्वीकारण्यापासूनही त्यांनी स्वतःला दूर ठेवले.

दुर्गा भागवत ह्या लोकसंस्कृती आणि लोककलेचे संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुरेख लेखनही केले आहे. त्यांना बौद्ध अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ म्हणूनही ओळखले जाते. दुर्गा भागवत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1910 रोजी इंदूर येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई, अहमदनगर, नाशिक, पुणे अशा विविध ठिकाणी झाले.

त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून १९३२ मध्ये B.A. परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे 1935 मध्ये त्यांनी M.A. ची पदवी संपादन केली. शिक्षण घेत असतानाच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर दुर्गाबाईंनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्समध्ये समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून दोन वर्षे काम केले. काही दिवसांनी त्यांनी ‘साहित्य सहकार’ या मासिकाचे संपादनही केले.

Durga Bhagwat Information in Marathi

Durga Bhagwat यांनी भागवतांनी लोकसाहित्य, मानववंशशास्त्र या विषयांवर विपुल प्रमाणात संशोधनात्मक लेखन केले आहे. या विषयांवरील त्यांचे बरेचसे ग्रंथ इंग्रजीमध्ये आहेत. त्यांनी वैचारिक व समीक्षात्मक लेखनही केले आहे. साने गुरुजींच्या प्रेरणेतून त्या ललित लेखनाकडे वळल्या आणि आपल्या ललित लेखनाद्वारे त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

अभिजात रसिकता, सौंदर्यासक्ती, जीवनोत्सुक आशाप्रवण वृत्ती, तीव्र संवेदनशीलता, काव्यात्मकता व मर्मग्राही कुतूहल यांचे अपूर्व रसायन त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असून त्यांच्या साहित्यातही त्याचे प्रतिबिंब पडले आहे. या सर्वांना त्यांचा सखोल व्यासंग व मार्मिक विश्लेषण यांची जोड मिळाली आहे; त्यामुळे त्यांच्या लेखनाला एक आगळा आशय व प्रगल्भता प्राप्त झाली आहे.

दुर्गा भागवत लेखनस्व याच्या कट्टर पुरस्कर्त्या आहेत. त्यासाठी त्यांनी आणीबाणीच्या काळात (१९७५ – ७७) कारावासही भोगला होता. साहित्यिक व विचारवंत यांनी शासकीय पुरस्कार स्वीकारून शासनाचा मिंधेपणा पत्करू नये, असे त्यांचे मत होते. अनेक सामाजिक चळवळींतही त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या ‘ पैस ‘ या ग्रंथाला ‘ साहित्य अकादमी ‘ पुरस्कार लाभला आहे. सन १९७५ मध्ये कराड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. दुर्गा भागवत यांचा मृत्यू मृत्यू – ८ मे, २००२ ला झाला.

दुर्गा भागवत यांची पुस्तके

  1. ॲन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर
  2. रिडल इन इंडियन लाईफ
  3. लोअर अँड लिटरेचर
  4. ए डायजेस्ट ऑफ कंपरेटिव्ह फिलॉलॉजी
  5. रोमान्स इन सॅक्रिड लोअर
  6. ए प्रायमर ऑफ अँथ्रॉपॉलॉजी
  7. अर्लि बुद्धिस्ट ज्युरिस्प्रुडन्स इत्यादी इंग्रजी ग्रंथ
  8. हेन्री डेव्हिड थोरो यांच्या ग्रंथांचे मराठी अनुवाद ; पैस
  9. व्यासपर्व
  10. डूब
  11. ऋतुचक्र
  12. महानदीच्या तीरावर
  13. पूर्वा
  14. रूपरंग
  15. लोकसाहित्याची रूपरेखा
  16. धर्म व लोकसाहित्य
  17. भावमुद्रा
  18. केतकरी कादंबरी
  19. प्रासंगिका
  20. जनतेचा सवाल

हे सुद्धा वाचा –

Related Posts