Health Benefits Of Eating Roasted Chana: फुटाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, ते खाल्ल्याचे अनेक हेल्थ बेनिफिट्स आहेत. फुटाणे खाल्ल्याने शरीराला कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन आणि विटामीन पुरेशा प्रमाणात मिळतात. हे खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. फुटाण्याला रोस्टेड ग्राम (Roasted Gram) देखील म्हटल्या जाते. या लेखात आपण, फुटाणे खाण्याचे फायदे (Futane Khanyache Fayde) कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.

फुटाणे खाण्याचे फायदे
1. फुटाणे पचनशक्ती वाढविते (Improve Digestion Power)
निरोगी राहण्यासाठी, योग्य पचन खूप महत्वाचे आहे. कमकुवत पचनशक्तीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही तुमच्या सकाळच्या आहारात फुटाणे समाविष्ट करू शकता. फुटण्याचे सेवन पचनशक्ती संतुलित करते आणि मेंदूची शक्ती देखील वाढवते.
2. वजन नियंत्रणात ठेवते (Weight Loss)
सकाळी रिकाम्या पोटी मूठभर फुटाणे खाल्ल्याने तुम्ही तुमचे वजनही नियंत्रणात ठेवू शकता. जर तुम्ही तुमच्या लठ्ठपणामुळे हैराण असाल तर सकाळी नाश्त्यात फुटाणे खाऊ शकता. फुटाणे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, लवकर भूक लागत नाही. यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळता आणि वजन नियंत्रणात राहते.
3. फुटाणे खाण्याचे बद्धकोष्ठतेत फायदे (Relieves Constipation)
बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठीही फुटाणे फायदेशीर आहे. तुम्ही थोडे फुटाणे भाजून घ्या, सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येवर बऱ्याच अंशी आराम मिळतो. जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर तुम्ही सतत काही दिवस फुटाणे खाऊ शकता, यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल.
4. मूत्र आजारात फायदेशीर (Beneficial In Urinary Diseases)
फुटाण्याच्या सेवनाने मूत्र संबंधित आजार दूर होतात. ज्यांना वारंवार लघवी येण्याची समस्या असते त्यांनी रोज फुटाणे गुळासोबत खावे. याच्या सेवनाने तुम्हाला दिसेल की काही दिवसात आराम मिळण्यास सुरुवात होईल. तसेच सकाळी उपाशी पोटी फुटाण्याचे सेवन मूत्र संबंधित आजारासाठी उत्तम मानले जाते.
5. इम्युनिटी वाढविते (Increase Immunity)
जर तुम्ही रोज 50 ग्रॅम फुटाणे नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणापूर्वी खाल्ले तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारशक्ती वाढवून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहताच, पण बदलत्या हवामानामुळे तुम्हाला अनेकदा शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. तसेच याच्या सेवनाने शारीरिक तंदुरुस्ती येण्यास मदत होते.
हे सुद्धा वाचा-