मेनू बंद

जी. ए. कुलकर्णी – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला G. A. Kulkarni यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

जी. ए. कुलकर्णी

जी. ए. कुलकर्णी कोण होते

जी. ए. कुलकर्णी हे एक दिग्गज साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लघुकथा लेखक होते. त्यांचे पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी असे होते. त्यांचा जन्म बेळगाव येथे १० जुलै, १९२३ रोजी झाला. त्यांचे शिक्षणही बेळगाव येथेच झाले. एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेत आपणास विषय, मांडणी, निवेदनपद्धती इत्यादी अनेक बाबतींत वेगळेपण जाणवते.

G. A. Kulkarni Information in Marathi

अर्थात, या नावीन्यामुळे सामान्य वाचकांच्या दृष्टीने G. A. Kulkarni यांची कथा काही वेळा दुर्बोधही बनते. निरनिराळ्या प्रतीकांचा वापर करून आपल्या कथेची मांडणी करण्याचा प्रयत्न ते करताना दिसतात. मानवी जीवनाच्या अंतिम वास्तवासंबंधीचे चिंतन हा जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांचा एक महत्त्वाचा विशेष सांगता येईल. त्यांच्या कथेमधून माणसामाणसांमधील भावबंधनाचे , त्यातील गुंतागुंतीचे दर्शन होते.

त्याचप्रमाणे मानवाला अगतिक व नगण्य बनविणाऱ्या नियतीला आणि तिच्या असीम शक्तीला G. A. Kulkarni यांनी आपल्या कथांमधून बरेच प्राधान्य दिले असल्याचेही आपणास पाहावयास मिळते; त्यामुळे जाणकार वाचक व समीक्षक यांच्यासाठी कुलकणींची कथा प्रशंसेचा विषय बनली आहे. कुलकर्णी यांनी नवकथेत काही नवे प्रयोग केले होते.

१९४५ नंतर उदयास आलेल्या मराठी नवकथेचा पुढचा विकसित टप्पा , अशा शब्दांत जी. ए. च्या कथेचे वर्णन केले जाते. जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘ निळासावळा ‘ व ‘ रक्तचंदन ‘ या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे साहित्यविषयक पुरस्कार मिळाले होते . त्यांच्या ‘ काजळमाया ‘ या कथासंग्रहाला १९७३ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता; पण त्यांनी तो परत केला. जी. ए. कुलकर्णी यांचा मृत्यू ११ डिसेंबर, १९८७ ला झाला.

शंकर पाटील यांचे पुस्तक, ग्रंथ व साहित्य

कथासंग्रह

  • निळासावळा
  • पारवा
  • हिरवे रावे
  • काजळमाया
  • रक्तचंदन

हे सुद्धा वाचा –

Related Posts