मेनू बंद

गोदावरी परुळेकर – सम्पूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक गोदावरी परुळेकर (१९०७-१९९६) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Godavari Parulekar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

गोदावरी परुळेकर - Godavari Parulekar

गोदावरी परुळेकर या स्वातंत्र्यसैनिक, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. ती मार्क्सवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होती आणि तिने आपले आयुष्य शेतकरी आणि कामगार वर्गासाठी लढण्यात घालवले. त्याच विचारसरणीचे दुसरे स्वातंत्र्यसैनिक आणि कार्यकर्ते शामराव परुळेकर यांच्याशी तिचा विवाह झाला.

गोदावरी परुळेकर यांची माहिती मराठी

गोदावरी परुळेकर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९०७ रोजी पुण्यात झाला. तिचे वडील लक्ष्मणराव गोखले हे प्रसिद्ध वकील होते. एका चांगल्या कुटुंबात तिचा जन्म झाल्यामुळे तिला चांगले शिक्षण मिळाले. तिने फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर कायद्याचा अभ्यास केला, ती महाराष्ट्रातील पहिली महिला कायदा पदवीधर बनली.

सुप्रसिद्ध साम्यवादी नेते श्यामराव परुळेकर यांच्याशी त्या २४ मे, १९३९ रोजी विवाहबद्ध झाल्या; मात्र , त्या स्वतःदेखील एक साम्यवादी नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनच प्रसिद्ध होत्या. त्यांच्यावर असलेल्या साम्यवादी तत्त्वज्ञानाच्या प्रभावातूनच त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे आकर्षित झाल्या. परुळेकर पती – पत्नींनी अनेक वर्षे कम्युनिस्ट पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम केले. सन १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन झाल्यावर त्या दोघांनीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

Godavari Parulekar Information in Marathi

श्यामराव परुळेकर व Godavari Parulekar यांनी प्रामुख्याने आदिवासी समाजात कम्युनिस्ट पक्षाची पाळेमुळे रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच पालघर जिल्ह्यातील वारली या आदिवासी जमाती प्रश्न सोडविण्यासाठी अत्यंत चिकाटीने काम केले. भारतातील इतर आदिवासी जमातींप्रमाणे वारली जमात अतिशय मागासलेली होती.

प्रगत समाजातील जमीनदार, व्यापारी, सावकार, ठेकेदार, सरकारी नोकर या घटकांकडून अज्ञानी वारल्यांचे अमानुष शोषण केले जात होते; त्यामुळे वारली जमात अतिशय दारिद्र्यात जीवन जगत होती. त्यांना कोणीही वाली राहिला नव्हता. वेठबिगारीच्या पद्धतीने त्यांना राबवून घेतले जात होते. आयुष्यभर काबाडकष्ट करूनही त्यांच्यावर अर्धपोटी राहण्याचीच पाळी येत होती.

वारल्यांच्या या स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी गोदावरी परुळेकर स्वतः वारली समाजात जाऊन राहिल्या. स्वतःच्या हक्कांची कसलीही जाणीव नसलेल्या व शिक्षणाचा जराही गंध नसलेल्या वारली लोकांना संघटित करण्याचे आणि त्यांच्यात जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न गोदावरीताईंनी चालविले. त्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले.

सर्वप्रथम त्यांनी आपल्या कार्याद्वारे या अडाणी व गरीब लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांची अस्मिता जागी केली. त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. त्यांना संघशक्तीचे महत्त्व पटवून दिले आणि संघटनेच्या जोरावर आपल्या न्याय्य हक्कांसाठी शोषक वर्गाविरुद्ध संघर्ष करण्याची त्यांना शिकवण दिली. हे सर्व घडवून आणण्यासाठी त्या वारल्यांपैकीच एक बनून राहिल्या. वारल्यांप्रमाणेच कष्टमय जीवन जगल्या.

वारल्यांच्या प्रत्येक पाड्याला भेट देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला; त्यामुळे वारली स्त्री – पुरुषांच्या त्या लाडक्या ‘ गोदूताई ‘ बनल्या . त्यांच्या या कार्यातून आदिवासी व दलित समाजाच्या उद्धाराविषयी त्यांना वाटत असलेली तळमळ आपल्या प्रत्ययास येते.

आदिवासी समाजात कार्य करीत असताना Godavari Parulekar यांना जे अनुभव आले त्यांच्या ‘ जेव्हा आधारे माणूस जागा होतो ‘ हा आत्मकथनपर ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. वारल्यांचे कष्टमय जीवन, त्यांच्यातील भीषण दारिद्र्य, त्यांची कमालीची सहनशीलता, अज्ञान व गतानुगतिक वृत्ती एका बाजूला; तर त्यांच्या श्रमावर मनमानी, मौजमजा करणारे सावकार – जमीनदार व त्यांचे सुखलोलुप जीवन दुसऱ्या बाजूला या दोन्हींचे विदारक चित्रण या ग्रंथात केले आहे. तसेच अडाणी, अशिक्षित वारल्यांना संघटित व जागृत करण्यासाठी त्यांना घ्यावे लागलेले कष्ट व त्यातील अडचणी यांचा तपशीलही त्यांनी या ग्रंथात दिला आहे.

गोदावरी परुळेकरांनी कामगार व शेतकरी चळवळींतही भाग घेतला. औद्योगिक कामगारांचे अनेक लढे त्यांनी लढविले आहेत. या कामगारांच्या संघटना बांधण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. श्रमजीवी जनतेच्या विविध लढ्यांत भाग घेतल्याबद्दल त्यांना अनेकदा कारावासाची शिक्षा झाली. १९७५ ते ७७ या आणीबाणीच्या काळात श्रीमती इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीविरुद्धही त्यांनी संघर्ष केला. भारताच्या साम्यवादी चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जात. गोदावरी परुळेकर यांचा मृत्यू ८ ऑक्टोबर १९९६ ला झाला.

सन्मान व पुरस्कार

  1. 1972 – साहित्य अकादमी पुरस्कार
  2. 1984 – लोकमान्य टिळक पुरस्कार
  3. 1984 – सोव्हिएत पुरस्काराच्या
  4. 1986 – आदिवासी सेवक पुरस्कार

हे सुद्धा वाचा –

Related Posts