मेनू बंद

गोरोचन म्हणजे काय? गोरोचनाच्या शुद्धतेची ओळख

हिंदू धार्मिक अनुष्ठानात किंवा पूजेत गोरोचन (Gorochan) हे वापरले जाते. तुमच्यापैकी फार कमी लोकांना माहीती असेल की गोरोचनाचे काय फायदे आणि उपयोग आहेत. असे मानतात की याचा मुख्य वापर पूजे व्यतरिक्त वशिकरणासाठी केला जातो. या लेखात आपण गोरोचन म्हणजे काय आणि गोरोचनाची शुद्धतेची ओळख कशी करावी, हे जाणून घेणार आहोत.

गोरोचन म्हणजे काय? गोरोचनाच्या शुद्धतेची ओळख

गोरोचन म्हणजे काय

गोरोचन हा एक पिवळ्या रंगाचा सुगंधी पदार्थ आहे ज्याला किंचित लालसरपणा येतो. हे दिसायला मेणासारखे आहे पण कोरडे झाल्यावर कडक येते. गाईच्या पित्तामध्ये तयार झालेला हा दगड असल्याने त्याला गौ पित्त असेही म्हणतात. गोराचन सर्व गायींमध्ये आढळत नाही. हे गायींच्या पित्तामध्ये विशिष्ट परिस्थितीतच तयार होते. ते कोणत्या गायीमध्ये तयार होते, हे केवळ जाणकार सांगू शकतात. बाजारातील पूजेच्या साहित्याच्या दुकानात हे उपलब्ध आहे. परंतु, हे मिळविण्यासाठी गायीला मारणे पाप मानले जाते.

गोरोचन हा गायीच्या पोटात तयार झालेला एक प्रकारचा दगड आहे, जो गायीच्या मृत्यूनंतर प्राप्त होतो. यामुळे ही थोडे किंचित महागही आहे. आजकाल लोक पैशाच्या लोभापोटी गायींना मारतात आणि गोरोचन काढतात, जे पूर्णपणे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. जीव मारून जे औषध किंवा संपत्ती मिळते ते सुख नाही तर दु:ख देणारे असते.

साधारणपणे प्रत्येक गायीमध्ये हे आढळत नाही, हा काही विशिष्ट गायीमध्ये तयार होतो. सध्या बाजारात गोरोचनच्या नावावर फसवणूक वाढत आहे. पूजेसाठी किराणा दुकानात मिळणाऱ्या गोरोचनाचा या गोरोचनाशी काहीही संबंध नाही. बाजारात उपलब्ध असलेले गोरोचन हे गायीच्या पित्तामध्ये कॅल्शियम आणि रंग टाकून तयार केले जाते. खरतरं बाजारात नकली गोरोचन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला गोरोचनची शुद्धतेची ओळख करून घेणे आवश्यक आहे.

गोरोचनाची शुद्धतेची ओळख (Purity identification of Gorochan)

गाईमध्ये पित्त जमा झाल्यामुळे गोरोचन निर्माण होते. म्हणूनच जेव्हा तुम्हाला गोरोचनाच्या शुद्धतेची ओळख करायची असेल, तेव्हा ते तोडून पहा, त्याच्या आत गोलाकार आकार (Circle) दिसतील. ही वर्तुळे डोळ्याने सहज पाहता येतात. पण जर गोरोचन कृत्रिम असेल तर ते तोडल्यावर ही वर्तुळे त्यात सापडणार नाहीत. कृत्रिम गोरोचन रेषांशिवाय आत सपाट असते.

आणखी हे तपासण्यासाठी, गोरोचन पाण्यात विरघळण्याचा प्रयत्न करा, जर ते पाण्यात सहज विरघळत असेल तर ते कृत्रिम गोरोचन आहे. कारण शुद्ध गोरोचन पाण्यात विरघळत नाही. मूळ गोरोचन पाण्याने घासल्यावर त्याचा रंग बदलत नाही. गोरोचन नकली असल्यास चुन्याच्या पाण्याने चोळल्यास त्याचा रंग जातो.

हे सुद्धा वाचा-

Related Posts