Green House Effect in Marathi: ग्रीन हाऊस गॅस हवामानातील बदलांसाठी आणि शेवटी ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार आहे. संपूर्ण जगाच्या सरासरी तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हे मानवाने तयार केलेल्या अतिरिक्त ग्रीन हाऊस गॅसमुळे होते असे मानले जाते. या आर्टिकल मध्ये आपण, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय जाणून घेणार आहोत.

ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय
पृथ्वीच्या वातावरणात उष्णता साचून किंवा अडकून राहण्याची प्रक्रिया म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीनहाऊस इफेक्ट ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याद्वारे ग्रह किंवा उपग्रहाच्या वातावरणातील काही वायू वातावरणाला उबदार करण्यास मदत करतात. या हरितगृह वायूंमध्ये कार्बन डायऑक्साइड, पाण्याची वाफ, मिथेन इ. समाविष्ट आहेत. जर ग्रीनहाऊस इफेक्ट नसता तर पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात नसती.
ग्रीन हाऊस गॅसमुळे ही प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते-
- सूर्याचा प्रकाश वातावरणातून प्रवेश करतो.
- पृथ्वीकडे आलेली एक तृतीयांश सौर ऊर्जा तत्काळ अवकाशात परत जाते.
- उर्वरित सौर ऊर्जा पृथ्वीचा पृष्ठभाग शोषून घेतो आणि त्यामुळे संपूर्ण पृथ्वीला ऊब मिळते.
- पृथ्वी जेव्हा थंड होते तेव्हा ती शोषून घेतलेली उष्णता पुन्हा वातावरणात फेकते.
- पृथ्वीने फेकलेली काही उष्णता वातावरण भेदून अवकाशात परत जाते.
- पृथ्वीची सर्वच उष्णता अवकाशात परत जात नाही. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन आणि पाण्याची वाफ हे घटक ही उष्णता अवकाशात जाण्यापासून रोखतात.
- उष्णता पृथ्वीच्या वातावरणात अडकून पडते आणि परिणामी तापमान वाढते.