मेनू बंद

हरित क्रांती म्हणजे काय?

Green Revolution in Marathi: हरित क्रांती मुळे भारतात शेती व्यवसायाचा किती विकास झाला, हा एक विवादस्पद विषय हे, पण एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, यामुळे शेतमालाची उत्पादन पातळी कायमची उंचावण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान व तंत्र भारतात आता उपलब्ध झाले आहे. या शास्त्रीय व तांत्रिक ज्ञानाचा पूर्ण वापर करून खरीखुरी हरित क्रांती घडवून आणता येणे शक्य झाले आहे. या आर्टिकल मध्ये आपण, हरित क्रांती म्हणजे काय, सविस्तर जाणून घेणार आहोत.

हरित क्रांती म्हणजे काय

हरित क्रांती म्हणजे काय

हरित क्रांती 1940-60 दरम्यान कृषी क्षेत्रातील संशोधन विकास, तांत्रिक बदल आणि इतर पायऱ्यांच्या मालिकेचा संदर्भ देते, ज्यामुळे जगभरातील कृषी उत्पादनात अभूतपूर्व वाढ झाली. भारतातील अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे योजनाकारांची अशी धारणा झाली की, भारताने शेतीव्यवसायात प्रगती घडवून आणली असून आता ‘हरित क्रांती’ दृष्टिपथात आली आहे.

ही हरित क्रांती ज्यामुळे शक्य झाली त्या नव्या शेतकी डावपेचाचे (शेतीव्यवसायातील नव्या ज्ञान-विज्ञानाचे व तंत्राचे) विश्लेषण करणे आणि हरित क्रांतीचे स्वरूप समजावून घेणे उद्बोधक ठरेल तसेच हरित क्रांतीमुळे निर्माण झालेल्या समस्याही समजावून घेणे उद्बोधक ठरेल.

भारतात अन्नधान्याची नेहमीच टंचाई भासत असे. अन्नधान्याची टंचाई ही भारताच्या शेतीव्यवसायाच्या अंगभूत वैशिष्ट्यांमधून निर्माण झालेली आढळते. 1943 साली बंगालमध्ये जो दुष्काळ पडला त्यामधून ही गोष्ट स्पष्ट होते. बंगालच्या त्या दुष्काळात 30 लक्ष लोक मृत्युमुखी पडले. भारताच्या फाळणीनंतर भारतातील अन्नसमस्येने अधिकच गंभीर स्वरूप धारण केले.

भारताच्या फाळणीमुळे सुमारे 30 टक्के सिंचित क्षेत्र भारताला गमवावे लागले. त्यामुळे अन्नधान्याची टंचाई अधिक तीव्रतेने भासू लागली. 1950 ते 1960 या काळात शेतीव्यवसायाच्या विकासाचे सर्वसाधारण कार्यक्रम आखण्यात आले आणि त्याद्वारे शेतीचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सिंचनसोई, मृद्संधारण, भूमिउद्धरण (Irrigation Ease, Soil Conservation and Land Reclamation)

सिंचनसोई, मृद्संधारण, भूमिउद्धरण यांसारख्या योजना हाती घेण्यात आल्या. तसेच सुधारित बी-बियाणे, रासायनिक खते यांसारख्या शेतकी आदानांचे योग्य रीतीने वाटप घडवून आणण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या. अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे शेतमालाचे उत्पादन वाढले असले तरी त्या काळात शेतीव्यवसायाने विशेष उल्लेखनीय प्रगती केली गेली नाही.

शेतीव्यवसायाच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याच्या उत्पादनातील वाढीचा वेग वाढविण्यासाठी, तसेच खतांच्या व जंतुनाशक द्रव्यांच्या अत्यंत मर्यादित पुरवठ्याचा पर्याप्त वापर करून अपेक्षित परिणाम घडवून आणण्यासाठी सन 1950 च्या शेवटी असे ठरविण्यात आले की, ज्या क्षेत्रात निश्चित स्वरूपाचा पाणी पुरवठा उपलब्ध आहे. म्हणजेच ज्या भागात पुरेशा सिंचनसोई उपलब्ध आहेत किंवा ज्या भागात पाऊस समाधानकारक असतो. अशा भागात शास्त्रीय पद्धतीने प्रकर्षित रीतीने शेतीव्यवसायाचा विकास घडवून आणावा.

या दृष्टिकोनानुसार देशातील निरनिराळ्या भागांतील 16 निवडक जिल्ह्यांत सन 1960-61 पासून ‘प्रकर्षित शेतकी जिल्हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. हा कार्यक्रम ‘एकसंघ योजना’ दृष्टिकोनावर (Package Programme Approach) आधारलेला होता.

सुधारित बी-बियाणे, रासायनिक खते आणि रोपट्यांचे संरक्षण (Improved Seeds, Chemical Fertilizers and Plant Protection)

सुधारित बी-बियाणे, पुरेशी रासायनिक खते यांचा वापर, रोपट्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना – अशा प्रकारच्या विविध उपाययोजना केल्यास ज्या क्षेत्रात लवकरात लवकर अपेक्षित अनुकूल परिणाम घडून येणे शक्य आहे. अशा क्षेत्रात त्या सर्व शेतकी आदानांचा एकसमयावच्छेदेकरून वापर करणे आणि त्याचबरोबर अन्य आवश्यक उपाययोजना करणे नवीन शेतकी डावपेचात अभिप्रेत होते.

शेतमालाच्या उत्पादनातील पुनःपुन्हा उद्भवणारी घट व पीछेहाट थांबविण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी, तसेच वाढत्या औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या औद्योगिक कच्चा मालाच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी शेतीव्यवसायात अवलंबिण्यात आलेला हा नवा डावपेच म्हणजे भारताच्या शेतीव्यवसायाच्या विकासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरतो.

नवीन शेतीविषयक धोरणामुळे शेती उत्पादन आणि अन्नधान्य उत्पादनात जो क्रांतिकारक बदल घडून आला त्यालाच हरित क्रांती असे म्हटले जाते. वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी व उद्योगांना लागणाऱ्या औद्योगिक कच्च्या मालाचा पुरवठा व्हावा म्हणून शेतीविषयक नवीन धोरणास महत्त्व प्राप्त झाले आहे.

भारतातील हरित क्रांती उपाययोजनेचे घटक (Factors of Green Revolution Initiative in India)

1. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी व मका यांसारख्या महत्त्वाच्या अन्नधान्याच्या बाबतीत उच्च पैदास बी-बियाणांचे उत्पादन व त्या बी-बियाणांचा वाढता वापर करणे.

2. बहुपीक पद्धतीचा विकास (म्हणजेच वर्षातून केवळ एकदाच पीक काढण्याऐवजी ज्या प्रकारच्या बी-बियाणांमुळे पीक लवकरात लवकर तयार होते, अशा बी-बियाणांचा वापर करून वर्षातून दोन किंवा तीन वेळा पिके काढण्याच्या पद्धतीचा विकास व अवलंब) करणे.

3. सिंचनसोईंचा विकास आणि त्या सोईंच्या उपलब्धतेत वाढ करणे.

4. जमीन आणि पाणी यांच्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे.

5. शेतकी आदानांच्या व लागवडीच्या पद्धतींच्या एकत्रित किंवा एकसंघ कार्यक्रमाची कार्यवाही उच्च पैदास बी-बियाणांच्या वापराबरोबरच खते, जंतुनाशक द्रव्ये, पुरेसे पाणी वगैरेंचा एकसमयावच्छेदेकरून वापर ही सर्व शेतकी आदाने पुरेशा संख्येने एकमेळ योजनेच्या स्वरूपात वापर करणे.

6. शेतीव्यवसायातील संशोधनावर अधिक भर आणि अशा संशोधनाचा प्रत्यक्षात वापर करण्यावर अधिक भर देणे.

7. नव्या शेतकी तंत्रांच्या व ज्ञानाच्या वापराबाबत शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रशिक्षणाच्या सोई करणे.

8. शेतीव्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक असणारा कर्जपुरवठा, शेतमालाची विक्रीव्यवस्था, शेतकी आदानांच्या वाटपासाठी योग्य स्वरूपाची वाटप पद्धती इत्यादी सोईंचा विकास आणि त्या सर्व सोईंची उपलब्धता करणे.

हे सुद्धा वाचा-

Related Posts