Apple Health Benefits in Marathi: सफरचंद हे जगातील सर्वाधिक सेवन केले जाणारे फळ आहे. सकाळी नाश्त्यात सफरचंद खाण्याचे डॉक्टर नेहमी सांगतात. कारण सफरचंदात लोह, प्रथिने, जीवनसत्त्वे आढळतात. याशिवाय सफरचंदात कार्बोहायड्रेट्सही आढळतात. सकाळी सफरचंद खाल्ल्याने शरीरात दिवसभर एनर्जी राहते. यात पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि रोगांशी लढणारे घटक असतात. सफरचंदात असे काही घटक देखील आढळतात जे शरीरात नवीन पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात. या लेखात आपण, सफरचंद खाण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेणार आहोत.

सफरचंद खाण्याचे फायदे
1. पोषक तत्वांनी भरपूर (Nutrients)
सफरचंद फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी समृध्द आहे. सफरचंद रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीर सफरचंदात असलेले हे सर्व पोषक तत्व सहजपणे शोषून घेते. शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते, मध्यम आकाराच्या सफरचंदात पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी देखील असतात. तर सकाळी सफरचंदाचा नाश्ता तुमच्यासाठी एक हेल्थ बेनिफिट ठरू शकतो.
2. रोग प्रतिकारशक्ती वाढविते (Immunity)
विविध रोगांशी लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. सफरचंदात व्हिटॅमिन सी, प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. जर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर तुम्ही सफरचंदाचे सेवन नक्कीच करावे.
3. एनर्जी बूस्टर (Energy booster)
जर तुम्हाला तुमचा सकाळचा वर्कआउट पूर्ण करायचा असेल, तर तुम्हाला नाश्त्याच्या मेनूमध्ये नक्कीच सफरचंद घ्यायचे असेल. कारण व्यायामापूर्वी सफरचंद खाल्ल्याने तुमचा स्टॅमिना वाढण्यास मदत होते आणि ऊर्जा देखील टिकून राहते. त्यासोबतच दिवसाच्या सामान्य धावपळीत एनर्जेटिक राहण्यासाठी सफरचंद सर्वोत्तम फळ आहे.
4. निरोगी हृदय (Healthy Heart)
सफरचंद तुमच्या रक्तवाहिन्यांना प्लाक पकडण्यापासून रोखतात, जे कोरोनरी धमनी रोगाचे प्रमुख कारण आहे. सफरचंदाच्या सालीमध्ये फेनोलिक कंपाऊंड आढळते, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल रक्तात जमा होत नाही आणि तुम्ही हृदयविकारापासून वाचता. याशिवाय सफरचंदात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम देखील असते, हे घटक हृदयविकाराचा धोका बर्याच प्रमाणात कमी करतात.
5. वजन कमी करण्यात फायदेशीर (Weight Loss)
वजन वाढणे ही एक मोठी समस्या आहे किंवा मोटापा (Obesity) हे अनेक आजारांचे मूळ आहे. जर तुम्हाला वजन मेंटेन करायचे असेल तर सफरचंद जरूर नाश्त्यात खा, कारण या फळामध्ये फॅटचे प्रमाण नगण्य असते आणि फायबरचे प्रमाण वजन कमी करण्यास मदत करते.
हे सुद्धा वाचा-