मेनू बंद

मुळा खाण्याचे अप्रतिम फायदे

Health Benefits of Eating Radish in Marathi: आयुर्वेद अनुसार, मुळा चे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. जेवणात बहुतेकांना सॅलड म्हणून मुळा खायला आवडतो. मुळा टाकून अनेक प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात. लांब आणि पांढरा-शुभ्र दिसणारा मुळा लोक खूप आवडीने खातात. खरतरं याचे अनेक प्रकारे सेवन करता येते. जसे- पराठा, सॅलड, लोणचे, ज्यूस इत्यादि. तुम्हाला माहितचं असेल की, मुळा तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. तुम्हाला माहित आहे का की मुळा हे देखील एक औषध आहे. मुळामधील औषधी गुणधर्म अनेक रोगांच्या उपचारात फायदे देतात. या आर्टिकल मध्ये आपण, मुळा खाण्याचे फायदे काय आहेत, हे जाणून घेणार आहोत.

मुळा खाण्याचे अप्रतिम फायदे

मुळा म्हणजे काय

मुळा ही जमिनीत निर्माण होणारी भाजी आहे. याची चव किंचित तुरट व तिखट असते. याचे शास्त्रीय नाव Raphanus sativus आहे. मुळा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात मुळ्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत होते, सर्दी-खोकला सारखे आजार टाळता येतात. मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. मुळा हिवाळ्यात बाजारात उपलब्ध असतो. मुळा मध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

हे सुद्धा वाचा- ताक पिण्याचे फायदे व तोटे

मुळा खाण्याची योग्य वेळ कोणती

मुळा कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. रात्रीच्या जेवणातही मुळ्याचे सेवन करू नये. सलादच्या स्वरूपात मुळा खाणे हा उत्तम उपाय आहे. हे खाताना तुम्ही मुळासोबत टोमॅटो, गाजर, काकडी, कांदा इत्यादी कच्च्या भाज्यांचाही समावेश करू शकता. हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. मुळा खरेदी करताना जास्त पिकलेला मुळा घेऊ नका, त्याऐवजी फ्रेश मुळा निवडा.

हे सुद्धा वाचा- चिकू खाण्याचे फायदे व तोटे

Health Benefits of Eating Radishes in Marathi

मुळा खाण्याचे फायदे

1. चेहऱ्यावरील मुरुमांसाठी फायदेशीर (Beneficial for Facial Acne)

मुळा मध्ये व्हिटॅमिन सी, झिंक, बी कॉम्प्लेक्स आणि फॉस्फरस (Vitamin C, Zinc, B Complex and Phosphorus) आढळतो. मुरुमांसाठी मुळ्याचा गोल तुकडा कापून मुरुमांवर लावा आणि कोरडे होईपर्यंत ठेवा. थोड्या वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा. काही दिवसात चेहऱ्यावर सुधार दिसेल.

हे सुद्धा वाचा – मुलतानी मातीचे फायदे आणि साइड इफेक्ट्स

2. पायरियापासून आराम (Relief from Pyorrhea)

पायरियाचा (Pyrea) त्रास असलेल्यांनी दिवसातून 2-3 वेळा मुळ्याच्या रसाने कुल्ला करावा आणि याचा रस प्यायलाने खूप फायदा होतो. मुळ्याच्या रसाच्या गुळण्या करणे, हिरड्या आणि दातांवर चोळून प्यायल्याने दातांसाठी खूप फायदा होतो. मुळा चावून खाल्ल्याने दात आणि हिरड्यांचे आजार दूर होतात.

3. मुळव्याधमध्ये फायदेशीर (Beneficial in Piles)

मुळव्याधमध्ये (Piles) कच्चा मुळा किंवा मुळ्याच्या पानांची भाजी खाणे फायदेशीर ठरते. रोज सकाळी उठल्याबरोबर कच्चा मुळा खाल्ल्याने कावीळमध्ये आराम मिळतो. अर्धा ग्लास मुळ्याचा रस प्यायल्याने लघवीशी संबंधित जळजळ आणि वेदना दूर होतात. आंबट ढेकर येत असल्यास एक कप मुळ्याच्या रसात मिश्री मिसळून प्यायल्यास फायदा होतो.

4. मधुमेहापासून बचाव (Prevention of Diabetes)

मधुमेहाच्या (Diabetes) स्थितीत मुळ्याचे सेवन खूप चांगले मानले जाते. मुळा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होते. परंतु ज्यांना रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे त्यांनी मुळ्याचे सेवन करू नये. मुळा त्याच्या कमी ग्लायसेमिक इंडेक्ससाठी (Glycemic index) ओळखला जातो. म्हणजेच हे खाल्ल्याने रक्तातील साखरेवर परिणाम होत नाही. रोज सकाळी मुळा खाल्ल्यास मधुमेहापासून लवकर सुटका मिळते.

5. सर्दी आणि फ्लू पासून आराम (Relief from Colds and Flu)

जर तुम्ही हिवाळ्यात रोज मुळा खाल्ल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत होईल आणि तुम्ही सर्दी-खोकला यासारख्या समस्या टाळू शकाल. मुळा खाल्ल्यानेही सर्दी होत नाही. बाकी काही नाही तर मुळा किमान सॅलडमध्ये तरी खावा. मुळा खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. कारण मुळा मध्ये अँथोसायनिन (Anthocyanin) आढळते जे हृदयविकाराची पातळी कमी करण्यास मदत करते.

हे सुद्धा वाचा- नाक बंद झाल्यावर करा हे 7 प्रभावी घरगुती उपाय

6. पचन क्रिया मजबूत होते (Digestion is Strengthened)

हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचनही चांगले होते. शारीरिक थकवा जाणवत असेल तर मुळ्याचा रस प्या. मुळ्याच्या नियमित सेवनाने किडनी (Kidney) आणि यकृत (Liver) निरोगी राहते. यासोबतच हे खाल्ल्याने भूकही वाढते.

हे सुद्धा वाचा- गुलकंद खाण्याचे अप्रतिम फायदे

Related Posts