आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक इंदुमती पटवर्धन (१९२६ – २००४) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Indumati Patwardhan यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

इंदुमती पटवर्धन कोण होत्या
समाजाने दूर अंध:कारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या, महाराष्ट्रातील डुडुळगाव येथील आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म १४ मे, १९२६ रोजी झाला. सेंट कोलंबोमध्ये शिक्षिका म्हणून इंदुमतीजींनी आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली.
सन १९४३-४७ या काळात त्यांनी ब्रिटिश रेडक्रॉस संघटनेच्या माध्यमातून दुसऱ्या महायुद्धातील जखमी जवानांची सेवा – शुश्रूषा करण्याचे कार्य केले. सन १९४७ मध्ये फाळणी होऊन दुभंगलेला देश स्वतंत्र झाला. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांत निर्वासितांचे लोंढे उसळले. अशा वेळी १९४७-५४ या कालावधीत त्यांनी फिरोजपूर येथील निर्वासितांच्या छावण्यांमध्येही इंडियन रेडक्रॉसच्या माध्यमातून सेवाकार्य केले.
पुणे जिल्ह्यातील आळंदीनजिकच्या डुडुळगाव येथे कुष्ठरोग्यांच्या उपचार व पुनर्वसनार्थ ‘ आनंदग्राम ‘ उभे करण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. इंदुमतीजींनी उभारलेल्या या आनंदग्रामात आज अडीचशेहून अधिक कुष्ठरोगी नव्याने आपले जीवन जगत आहेत . आनंदग्रामातील कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी इंदुमतीजींनी सातवीपर्यंतची शाळाही चालविली होती.
सन १९७६ मध्ये ‘ दलितमित्र ‘ ही पदवी देऊन महाराष्ट्र शासनाने इंदुमती ताईंच्या कार्याचा गौरव केला. सन १९७९ मध्ये कर्नाटक होमिओपथी बोर्डानेही ताईंना ताम्रपत्र प्रदान करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आनंदग्रामच्या माध्यमातून कुष्ठरोग्यांच्या सेवेचे कार्य करतानाच ‘ नॅशनल वुमेन्स कौन्सिल ऑफ इंडिया, इंडियन कौन्सिल ऑफ चाईल्ड वेलफेअर ‘ यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून महिला व बालकल्याणाच्या कार्यासही त्यांनी हातभार लावला होता.
हे सुद्धा वाचा –