मेनू बंद

जगन्नाथ शंकरशेठ – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक जगन्नाथ शंकरशेठ (१८०३-१८६५) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Jagannath Shankarsheth यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

जगन्नाथ शंकरशेठ संपूर्ण माहिती मराठी -Jagannath Shankarsheth

जगन्नाथ शंकरशेठ कोण होते

जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे (Jagannath Shankarsheth Murkute) हे भारतीय समाजसेवी आणि शिक्षणतज्ञ होते. त्याचे श्रेय इतके उच्च होते की अरब, अफगाण आणि इतर परदेशी व्यापार्यांनी आपला खजिना बँकांकडे ठेवण्याऐवजी त्याच्या ताब्यात ठेवणे पसंत केले. त्याने लवकरच मोठी संपत्ती मिळवली, ज्यापैकी बरेच काही त्याने लोकांसाठी दान केले.

जगन्नाथ शंकर मुरकुटे यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी मुरबाड येथे झाला. ते जगन्नाथ शंकरशेठ या नावाने प्रसिद्ध आहेत. वडील शंकर मुरकुटे यांचा दागिने आणि हिऱ्यांचा व्यवसाय होता. त्यांच्या वडिलांनी या व्यवसायात भरपूर पैसा कमावला, त्यामुळे त्यांना शंकर शेठ या नावाने ओळखले जात असे. नानांचे घराणे दैवज्ञ ब्राह्मण किंवा सोनार होते. जगन्नाथ शंकरशेठ हे पिढीजात अतिशय श्रीमंत होते व त्यांच्या वडिलांनी व्यापारात अमाप संपत्ती कमावली होती; त्यामुळे त्यांचे बालपण अतिशय सुखात गेले. पुढे त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षीच वडिलांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत घरच्या व्यापारधद्याची जबाबदारी नानांवर येऊन पडली.

कुटुंबाची संपत्ती आणि त्यांच्या व्यवसायाची विशालता पाहता त्यांना इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची संधी मिळाली नसती. मात्र, नानांना सार्वजनिक कामाची खूप आवड होती; त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सार्वजनिक सेवेसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार सार्वजनिक जीवनातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला.

जगन्नाथ शंकरशेठ यांनी एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई परिसरातील सार्वजनिक जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. त्यावेळच्या अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. यातील अनेक संस्था त्यांच्याच प्रयत्नातून आणि पुढाकारातून स्थापन झाल्या.

नानांना सरकार दरबारीदेखील चांगलाच मान होता. तत्कालीन परिस्थितीत राज्यकर्त्यांच्या साहाय्याखेरीज येथील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे साध्य करणे शक्य नाही, अशी त्यांची धारणा होती. म्हणून सरकारने जनकल्याणाची विविध कामे हाती घ्यावीत यासाठी त्यांनी आपले वजन खर्ची घातले आणि अशा प्रकारच्या कामांचा सातत्याने पाठपुरावा केला. जगन्नाथ शंकरशेठ यांचा मृत्यू ३१ जुलै, १८६५ रोजी झाला.

जगन्नाथ शंकरशेठ यांचे सामाजिक कार्य (Social work of Jagannath Shankarsheth)

मुंबई शहरातील अनेक सामाजिक संस्थांच्या उभारणीस नानांनी हातभार लावला होता. बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, एलफिन्स्टन कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी इत्यादी संस्थांच्या स्थापनेत त्यांचाच पुढाकार होता. अनेक सार्वजनिक संस्थांना त्यांनी भरीव स्वरूपाची आर्थिक मदत केली होती. त्या काळातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी प्रोत्साहन व मदतीचा हात दिला होता.

समाजसुधारणेच्या प्रश्नाबाबत नानांचे विचार अत्यंत पुरोगामी होते. भारतीय समाजातील स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले . ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्या काळातील सनातनी लोकांचा प्रखर विरोध पत्करून १८४८ मध्ये त्यांनी मुंबई येथे स्वतःच्या घरात मुलींची शाळा सुरू केली. लॉर्ड विल्यम बेंटिंक या १८२९ मध्ये सतीची चाल बंद करणारा कायदा केला. या कायद्याला भारतातील सनातनी विचाराच्या मंडळींनी जोरदार विरोध केला; त्यामुळे देशात त्याविरुद्ध बराच असंतोष निर्माण झाला.

अशा वेळी नानांनी या कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले आणि सतीची चाल कशी अमानुष आ , हे जनतेला पटवून दिले. सामान्य जनतेच्या विविध प्रश्नांची सरकार दरबारी दाद लावून घेण्यासाठी नाना सदैव तत्पर असत. मुंबईतील सामान्य जनतेची अनेक गाऱ्हाणी त्यांनी सरकार दरबारी मांडली होती आणि त्यांची यशस्वीपणे तड लावली होती ; त्यामुळे स्वकीय जनतेला, विशेषतः गोरगरिबांना ते आपला महत्त्वाचा आधार वाटत असत.

जगन्नाथ शंकरशेठ यांचे शैक्षणिक कार्य (Educational work of Jagannath Shankarsheth)

नानांनी शिक्षणक्षेत्रातही अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती. मुंबई इलाख्यात नव्या शिक्षणाचा पाया घालण्याचे कार्य मुंबईचे त्या वेळचे गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या जोडीने नाना शंकरशेठ यांनी केले. २१ ऑगस्ट , १८२२ रोजी त्यांनी मुंबई येथे ‘ हैदशाळा आणि शाळा पुस्तक मंडळी ‘ या संस्थेची स्थापना केली. तिचेचे नामांतर पुढे १८२७ मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी असे केले गेले.

या संस्थेच्या विद्यमाने त्यांनी मुंबई शहरात व मुंबईबाहेरही अनेक शाळा सुरू केल्या. या कामी नानांना सदाशिवपंत छत्रे, बाळशास्त्री जांभेकर इत्यादींचे सहकार्य लाभले. अशा प्रकारे इंग्रजी शिक्षणाच्या सुरुवातीच्या कालखंडात नानांनी महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच अव्वल इंग्रजी अमदानीत पाश्चात्त्य शिक्षण घेतलेल्या तरुणांची पहिली पिढी उदयास आली. यांपैकी अनेक तरुणांनी महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या कार्यात पुढे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

याचे श्रेय अर्थातच जगन्नाथ शंकरशेठ यांच्याकडे जाते. भारतीय समाजात विद्येचा व ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि येथील युवकांमध्ये सार्वजनिक कार्याची आवड उत्पन्न व्हावी या उद्देशाने दादाभाई नौरोजी, डॉ. भाऊ दाजी लाड आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी १३ जून, १८४८ रोजी मुंबईत ‘ स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ‘ ही संस्था स्थापन केली. नानांनी या संस्थेला सर्वतोपरी मदत केली. मुंबई इलाख्याचा गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने या ठिकाणी शिक्षणप्रसाराचे फार मोठे कार्य केले होते.

एल्फिन्स्टन कॉलेज ची स्थापना (Establishment of Elphinstone College)

म्हणून त्याचे स्मारक उभारण्यासाठी नानांनी एक फंड जमविला. या फंडातून १८३४ मध्ये मुंबईत ‘ एल्फिन्स्टन कॉलेज ‘ ची स्थापना केली. मुंबई इलाख्याचा आणखी एक गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांच्या स्मरणार्थ १८४५ मध्ये मुंबईत ‘ ग्रँट मेडिकल कॉलेज’ची उभारणी करण्यातही नानांनीच पुढाकार घेतला होता. भारतीयांना कायदेशिक्षण मिळाले पाहिजे म्हणून नानांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर ३ जुलै , १८५४ मध्ये सरकारला त्यासाठी खास वर्ग सुरू करणे भाग पडले.

यावरून अव्वल इंग्रजी अमदानीच्या सुरुवातीच्या कालखंडात मुंबईत शिक्षणप्रसाराच्या कार्याचा पाया रचण्यात नाना शंकरशेठ यांनी किती मोलाची कामगिरी केली होती, याची कल्पना येऊ शकते. त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याचा गौरव करताना दादाभाई नौरोजी यांनी असे म्हटले आहे की, “ जगन्नाथ शंकरशेठ यांनी या ठिकाणी शिक्षणाचे बीजारोपण करून आणि त्याच्या निकोप वाढीसाठी कष्ट घेऊन आम्हा भारतीयांवर मोठे उपकार करून ठेवले आहेत. ‘

जगन्नाथ शंकरशेठ राजकीय कार्य (Jagannath Shankarsheth Political Work)

जगन्नाथ शंकरशेठ यांच्या काळात राजकीय स्वरूपाचे कार्य करणाऱ्या संस्थांचा देशात अभावच होता. राजकीय प्रश्नांबाबत नानांचे मत होते की, इंग्रज राज्यकर्त्यांच्या सहकार्यानेच आपल्या लोकांच्या गाण्यांची व अडीअडचणींची दाद लावून घेता येईल; म्हणून त्यांनी याबाबत राज्यकर्त्यांशी सहकार्य करण्याच्या गरजेवर विशेष भर दिला.

वरील उद्देशाने जगन्नाथ शंकरशेठ व दादाभाई नौरोजी यांनी २६ ऑगस्ट , १८५२ रोजी मुंबई येथे ‘ बॉम्बे असोसिएशन ‘ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून येथील जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनास आणून द्यावीत आणि जनतेच्या सुखाकरिता सरकारला प्रत्येक गोष्टीत साहाय्य करावे यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.

‘ बॉम्बे असोसिएशन ‘ ही आधुनिक काळातील महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील देखील राजकीय स्वरूपाची पहिलीच संस्था होय, ” या देशातील रयतेचे कल्याण करावे, अशी इंग्रज सरकारची इच्छा आहे हे खरे. पण आमची अशी काही दुःखे आहेत की, ती सरकारच्या नजरेस येत नाहीत. म्हणून ती सरकारच्या नजरेस आणून द्यावीत आणि रयतेच्या सुखाकरिता सरकारला हरएक गोष्टीत साहाय्य करावे म्हणून ही संस्था काढली आहे. ” बॉम्बे असोसिएशनची स्थापना ही भारतातील सनदशीर राजकारणाची सुरुवातच मानता येईल.

पुढील काळात हीच उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रीय पातळीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. यावरून ‘ बॉम्बे असोसिएशन ‘ या संघटनेच्या स्थापनेमागील तिच्या संस्थापकांची दूरदृष्टी स्पष्ट होते. भारतातील इंग्रजी राजवटीच्या काळात सरकारकडून वर्णभेदाच्या धोरणाचा कमी – अधिक प्रमाणात अवलंब केला जात होता.

प्रारंभीच्या काळात तर सरकारी नोकऱ्यांत इंग्रज व भारतीय यांच्यात खूपच पक्षपात करण्यात आला होता . प्रशासनातील सर्व महत्त्वाची पदे इंग्रज किंवा गोऱ्या लोकांसाठीच राखीव ठेवली जात होती. सरकारच्या या पक्षपाती नीतीविरुद्ध सुरुवातीला ज्या भारतीय नेत्यांनी आवाज उठविला त्यांपैकी जगन्नाथ शंकरशेठ हे एक होत. हिंदी लोकांना प्रत्येक क्षेत्रात गोऱ्या लोकांच्या बरोबरीने अधिकार मिळावेत यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.

त्या काळात खुनासारखे महत्त्वाचे खटले सुप्रीम कोर्टाच्या सेशनपुढे चालविले जात असत . त्यामध्ये काम करणाऱ्या पंचांना ‘ ग्रँड ज्युरी ‘ असे म्हणत व हा मान फक्त गोऱ्या लोकांनाच दिला जाई. नानांनी ग्रँड ज्युरींमध्ये हिंदी लोकांचाही समावेश केला जावा म्हणून प्रयत्न केले ; त्यामुळे सरकारने १८३६ मध्ये हिंदी लोकांचा ग्रँड ज्युरींमध्ये बसण्याचा हक्क मान्य केला.

जगन्नाथ शंकरशेठ हे त्यांच्या परोपकारासाठी तसेच त्यांच्या समाजसेवेसाठी प्रसिद्ध होते. ते परोपकारी म्हणून प्रसिद्ध झाले. शाळा, रुग्णालये, धर्मशाळा, ग्रंथालये, मंदिरे इत्यादी अनेक सार्वजनिक संस्थांना उदार देणगी देण्यात आली आणि त्या संस्थांच्या वाढीसाठी मोठा हातभार लावला.

जगन्नाथ शंकरशेठ यांच्या या अजोड कार्याचा त्या वेळच्या परकीय सरकारनेही गौरव केला होता. अनेक समित्या व पदे यांवर त्यांची नियुक्ती करून सरकारने त्यांना सन्मानित केले होते. मुंबई इलाख्यातील शिक्षणव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने १८४० मध्ये ‘ बोर्ड ऑफ एज्युकेशन’ची स्थापना केली होती. हे बोर्ड अस्तित्वात असेपर्यंत म्हणजे १८४० पासून ते १८५६ पर्यंत नाना त्याचे सभासद राहिले होते. १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यावर या विद्यापीठाचे फेलो म्हणून नानांची नियुक्ती करण्यात आली.

मुंबईच्या म्युनिसिपल कमिशन त्यांची नियुक्ती झाली होती. याशिवाय १८३५ मध्ये त्यांना ‘ जस्टिस ऑफ दी पीस ‘ चा बहुमान प्राप्त झाला होता. त्यांना लाभलेले हे सन्मान त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की, इंग्रजी अमदानीच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनाचा पाया रचण्याचे कठीण व महत्त्वपूर्ण कार्य नानांनी केले होते. आधुनिक मुंबई शहराच्या उभारणीत त्यांनी फार मोठा वाटा उचलला होता.

नानांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे मुंबईच्या प्रगतीचा आलेख. जसे सरकारी दरबारी त्यांचे वजन होते. तशाच प्रकारे, त्यांना सामान्य लोकांकडून आदर मिळण्याचे भाग्य लाभले. त्यांनी आपल्या हक्काचा आणि मालमत्तेचा वापर नेहमी लोकांच्या कल्याणासाठी केला. मुंबईतील अनेक सार्वजनिक संस्थांचे ते संरक्षक होते.

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय (Dr. Bhau Daji Lad Museum)

मुंबईतील भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय, ज्याची रचना लंडनच्या एका प्रसिद्ध वास्तुविशारदाने केली होती, हे जगन्नाथ, डेव्हिड ससून आणि सर जमशेटजी जीजीभॉय यांसारख्या अनेक श्रीमंत भारतीय व्यावसायिक आणि परोपकारी व्यक्तींच्या संरक्षणाने बांधले गेले. भवानी-शंकर मंदिर आणि नाना चौकाजवळील राम मंदिर हे शंकरशेठ बाबुलशेठ यांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीला बांधले होते आणि सध्या ते शंकरशेठ कुटुंबाच्या ताब्यात आहेत.

हे सुद्धा वाचा –

Related Posts