आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक कृष्णशास्त्री चिपळूणकर (१८२४-१८७८) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Krushnashastri Chiplunkar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. संस्कृत आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी अलंकार, न्याय आणि धर्म यांचा अभ्यास केला. अर्थशास्त्र, मानसशास्त्र या विषयांतही त्यांचे विशेष कौशल्य होते. कृष्णशास्त्री चिपळूणकर 1852 मध्ये अनुवादक म्हणून सरकारी सेवेत दाखल झाले. पुढे त्यांनी पुण्याच्या शाळेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. काही काळ ते ‘ दक्षिणा प्राइझ कमिटीचे ‘चे सचिव होते. पूना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची माहिती मराठी
कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म सन १८२४ मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावचे ; पण पुढे कृष्णशास्त्रींचे पूर्वज पुण्यास येऊन स्थायिक झाले. त्यांचे वडील पेशव्यांकडे शागीर्द होते. पेशवाई संपुष्टात आल्यावर चिपळूणकर कुटुंबास गरिबीत दिवस काढावे लागले. कृष्णशास्त्री लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. पुण्याच्या पाठशाळेत मोरशास्त्री साठे यांच्याकडे त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची हुशारी पाहून त्यांचे गुरुजन त्यांना ‘ बृहस्पती ’ म्हणून संबोधत. पुढे आपल्या गुरूंच्या उपदेशानुसार कृष्णशास्त्रींनी पूना कॉलेजात इंग्रजीचा अभ्यास केला.
कृष्णशास्त्री हिंदू धर्माचे कट्टर अभिमानी होते. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला आणि त्यांनी हिंदू धर्माविरुद्ध चालविलेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी चिपळूणकरांनी ‘ विचार लहरी ‘ नावाचे वृत्तपत्र काही काळ चालविले होते; परंतु पुढे या पत्रावर ब्रिटिश सरकारची इतराजी ओढवली. त्यातून निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना हे पत्र फार काळ चालविता आले नाही. पूना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य असताना चिपळूणकर यांनी ‘ शालापत्रक ‘ हे नियतकालिक १८६५ मध्ये सुरु केले.
Krushnashastri Chiplunkar Information in Marathi
मराठी ग्रंथकार व रसिक विद्वान म्हणून Krushnashastri Chiplunkar यांना मान्यता मिळविली होती. अलौकिक बुद्धिमत्ता, संस्कृत व इंग्रजी या भाषांवरील प्रभुत्व आणि प्रभावी वक्तृत्व यांमुळे त्यांना जनमानसात लौकिक प्राप्त झाला होता. त्यांच्या ठिकाणी पौर्वात्य व पश्चिमी ज्ञानप्रवाहांचा समन्वय झाला होता. पाश्चिमात्य साहित्याच्या अभ्यासामुळे त्यांच्या विचारांत नावीन्य आले होते.
Krushnashastri Chiplunkar मराठी भाषेतील एक उत्कृष्ट गद्यलेखक होते. त्यांचे बहुतेक लिखाण भाषांतरित किंवा आधारित असले तरी श्रेष्ठ साहित्यिकाचे सर्व गुण त्यांच्या ठिकाणी होते. त्यांनी कालिदासाच्या ‘ मेघदूता’चा केलेला मराठी अनुवाद अतिशय गाजला. त्यांचे इतर भाषांतरित साहित्यही असेच दर्जेदार आहे. साधी व शुद्ध मराठी भाषा हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा मृत्यू २० मे, १८७८ ला झाला.
कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे साहित्य व लेखन:
- अनेकविद्या मूलतत्त्वसंग्रह
- अर्थशास्त्र परिभाषा
- अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी
- पद्यरत्नावली
- साक्रेतिसाचे चरित्र
- रासेलस
- मराठी व्याकरणावरील निबंध
हे सुद्धा वाचा –