आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक लक्ष्मण माने यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Laxman Mane यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

लक्ष्मण माने कोण आहेत
लक्ष्मण बापू माने हे महाराष्ट्रातील एक मराठी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. 1980 मध्ये उपरा हे आत्मचरित्र प्रकाशित केल्यानंतर माने यांना अचानक प्रसिद्धी मिळाली. उपरा हा मराठी दलित साहित्यातील मैलाचा दगड मानला गेला आणि त्यांना 1981 मध्ये साहित्य अकादमी आणि 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. तसेच काही काळ त्यांनी ‘ बंद दरवाजा ‘ या नियतकालिकाचे संपादनही केले होते.
लक्ष्मण माने यांचा जन्म १ जून, १९४९ रोजी झाला. त्यांचे शिक्षण फलटण, कोल्हापूर अशा निरनिराळ्या ठिकाणी झाले. कैकाडी या भटक्या जमातीत त्यांचा जन्म झाला असल्याने परिस्थितीचे टक्केटोणपे खातच त्यांचे बालपण गेले. कोणतेही एक निश्चित गाव नाही, कसलीही स्थावर मालमत्ता नाही, जीवनाला कसलेही स्थैर्य नाही, पोटासाठी सतत चालू राहिलेली गावोगावची भटकंती अशी भटक्या जमातीतील सर्वच लोकांच्या जीवनाची तऱ्हा.
Laxman Mane Information in Marathi
विपरीत परिस्थितीतदेखील Laxman Mane हे शिक्षणाकडे वळले आणि मोठ्या जिद्दीने त्यांनी ते चालू ठेवले हे विशेष. अर्थात, शिक्षण घेण्यासाठी त्यांना खूपच झगडावे लागले. घरच्या गरिबीमुळे अडचणी तर पाचवीलाच पुजलेल्या होत्या ; पण लक्ष्मण मानेंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपले शिक्षण पूर्ण केले. कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाह कॉलेजच्या ‘ कमवा व शिका ‘ योजनेत काम करून त्यांनी बी. ए. पर्यंत शिक्षण घेतले.
Laxman Mane हे त्यांच्या ‘ उपरा ‘ या पुस्तकाने विशेष प्रसिद्धीस आले. आपल्या या पुस्तकात त्यांनी स्वतःच्या जीवनातील बरे – वाईट अनुभव शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्या या अनुभवांतून भटक्या व विमुक्त जातिजमातींच्या लोकांची सुखदुःखे , त्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातना, त्यांच्यातील रीतिरिवाज, प्रगत समाजाकडून त्यांची केली जाणारी अवहेलना इत्यादी गोष्टींचे अतिशय परिणामकारक चित्रण झाले आहे.
भटक्या जातिजमातींच्या एकंदर जीवनपद्धतीवर व त्यांच्या समस्यांवर प्रकाश टांकण्याचे काम माने यांनी या पुस्तकाद्वारे केले आहे. म्हणूनच ‘ उपरा ‘ हे एका व्यक्तीचे आत्मकथन न राहता त्याला व्यापक सामाजिक संदर्भ प्राप्त झाला आहे. लक्ष्मण माने यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्यही उल्लेखनीय असे आहे. भटक्या व विमुक्त जातिजमातींच्या न्याय्य हक्कांसाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष जारी ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्या दृष्टीने भटक्या विमुक्तांची संघटना बांधण्याच्या कामावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.
अशी संघटना उभी करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत बरेच परिश्रम घेतले आहेत. भटके – विमुक्त आणि दलित यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आतापर्यंत झालेल्या निरनिराळ्या चळवळींत त्यांनी स भाग घेतला आहे . येथील परिवर्तनवादी चळवळींशी त्यांनी निकटचा संबंध आहे.
Laxman Mane यांना त्यांच्या ‘ उपरा ‘ या पुस्तकाबद्दल साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले आहे. फोर्ड फौंडेशनचा पुरस्कार व शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.
हे सुद्धा वाचा –