‘Line Hazir‘ हा शब्द ब्रिटीश काळापासूनचा आहे, याचा वापर सहसा पोलिस अधिकार्यांसाठी केला जातो. या लेखात आपण लाइन हाजिर म्हणजे काय सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पोलिसांच्या चुकीने किंवा जाणून-बुझुण एखादी अशी अनिष्ट घटना घडली की ज्यात पोलिसांवर सौम्य कार्यवाही करण्याची गरज असेल, अश्या वेळी पोलिसांना ‘लाईन हाजिर’ करण्याचे काम संबंधित वरिष्ठ अधिकारी करतात.

वरील परिस्थितित जेव्हा अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची वेळ येते तेव्हा लाइन हाजिर करून संबंधित अधिकाऱ्याला किंवा शिपायाला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली, असे जनतेला वाटते. तसेच अधिकारीही थोडे नियमात राहतील अशी अपेक्षा केली जाते. परंतु, ‘लाइन हाजिर’ पोलिस नियमावलीत कोणतीही कारवाई नाही हे सत्य आहे.
लाइन हाजिर म्हणजे काय
लाइन हाजिर म्हणजे पोलिस लाईनमध्ये बदली होय. बस त्यापेक्षा काहीच जास्त नाही. एका पोलिस ठाण्यातून दुसऱ्या पोलिस ठाण्यात बदली होणे, एका पदावरून दुसऱ्या पदावर बदली होणे किंवा एका जबाबदारीवरून दुसऱ्या जबाबदारीवर बदली होणे म्हणजे लाईन हाजिर.
पोलिस नियमावलीत निलंबनापूर्वी कोणत्याही कारवाईचा विचार केला जात नाही. निलंबनानंतरच चौकशी होते. चौकशी अहवालावर शिक्कामोर्तब होतो आणि ठरते की निलंबनाचा आधार काय होता? तसेच यावर संबंधित अधिकाऱ्याला अपील देखील करता येते.
जर एखाद्या पोलीस अधिकारी किंवा शिपायाला निलंबित केले जात असेल, तर अपील ऐकण्याचे अधिकार डीआयजीला, डीआयजी नंतर आईजी ला आहे. तेथून नकार मिळाल्यास पोलिसांसमोर कोर्टात जाण्याचा एकमेव पर्याय उरतो. विशेष म्हणजे या कारवाईची नोंद संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या कॅरेक्टर रजिस्टरमध्ये असते. म्हणजेच, सीआर खराब होण्याचा धोका देखील आहे.
लाइन हाजिर मध्ये कोणतीही कारवाई होत नाही, तेव्हा चौकशीचा प्रश्नच नाही तसेच त्याविरोधात न्यायालयात जाण्याचाही विषय समोर येत नाही. तर अश्या कारवाईला शिक्षा किंवा कोणतीही एक्शन काशी म्हणता येईल? ही एक सामान्य प्रक्रिया आहे ज्याला पोलीस लाईनमध्ये ड्युटी देणे म्हणतात.
संबंधित अधिकारी जर सत्तेच्या जवळचा असेल, पैशाने धडधाकड असेल किंवा उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या जवळचा असेल, तर त्याच्यावर लेखी कारवाई (निलंबन) करण्याऐवजी, लाइन हाजिर हे एक मोठे शस्त्र आहे. अगदी वाईट परिस्थितीतही ‘फलाना ढिमकाना’ लाईनमधून काढून टाकण्यात आल्याची घोषणा केली जाते आणि प्रकरण थंड झाल्यावर ते पुन्हा लाईनवरून पोलीस ठाण्यात वर्ग केले जाते.
हे सुद्धा वाचा-