आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक माधव जूलियन यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Madhav Julian यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

माधव जूलियन
माधव जूलियन यांचे पूर्ण नाव माधव त्र्यंबक पटवर्धन असे होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी, १८९४ रोजी गुजरातमधील वडोदरा (बडोदे) येथे झाला. त्यांचे शिक्षण आवळस, बडोदे, अहमदाबाद व मुंबई येथे झाले. बडोदा कॉलेजमधून १९१६ मध्ये ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
पुढे मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून इंग्रजी व फारसी हे विषय घेऊन ते एम. ए. झाले. त्यानंतर पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून आणि फर्गसन कॉलेजमध्ये इंग्रजी व फारसी या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते आजीव सदस्य होते. ‘ रविकिरण मंडळा’चे एक संस्थापक सदस्य म्हणून त्यांचा निर्देश करावा लागेल.
Madhav Julian Information in Marathi
Madhav Julian हे भाषाशुद्धीचे प्रखर पुरस्कर्ते म्हणूनही ते ओळखले जातात. रविकिरण मंडळाच्या प्रभावकाळातील मराठी कविता प्रामुख्याने व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची होती. व्यक्तिजीवना तील अनुभव, भावनात्मक प्रतिक्रिया हे सामान्यतः या कवितेचे केंद्र होते. तत्कालीन इतर अनेक कवींच्या कवितां प्रमाणेच माधव जूलियन यांची कविताही त्यास अपवाद नव्हती. व्यक्तिनिष्ठा हीच तिची मुख्य प्रेरणा होती. साहजिकच, ती काहीशी आत्मकेंद्रितही होती. आत्मप्रकटीकरण आणि आत्मरंजन हाच त्यांच्या काव्याचा प्रधान हेतू होता.
प्रेमाविष्कार, प्रेमनिष्ठा, प्रेमवैफल्य हेच मुख्यत्वे त्यांच्या कवितांचे विषय होते. साहजिकच, ‘ प्रणय पंढरीचे वारकरी ‘ या शब्दांतच त्यांच्यावर टीका झाली. अर्थात, माधवरावांनी ते भूषणच मानले. त्यांच्या काव्यात त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित झाले असल्याचे दिसून येते. अर्थात, त्यांच्या काही कवितांमधून अन्यायाची विलक्षण चीड, मायबोलीचा अभिमान, देशबांधवांविषयीची अपार तळमळ इत्यादी गोष्टींचेही दर्शन होते. माधव जूलियन यांचा मृत्यू २९ नोव्हेंबर, १९३९ ला झाला.
काव्यसंग्रह
विहंगतरंग, सुधाकर, नकुलालंकार, तुटलेले दिवे ही खंडकाव्ये; स्वप्नरंजन, मधुलहरी इत्यादी काव्यसंग्रह. याशिवाय ‘ द्राक्षकन्या ‘ हा उमरखय्यामच्या रुबायांचा अनुवाद, भाषाशुद्धिविवेक, पद्यप्रकाश हे ग्रंथ आणि फार्सी मराठी शब्दकोश.
हे सुद्धा वाचा –