मेनू बंद

मधुकरराव देवल

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक मधुकरराव देवल (१९१८-१९९०) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Madhukarrao Deval यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

मधुकरराव देवल - Madhukarrao Deval

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ हे गाव काही दशकांपूर्वी मधुकरराव देवल यांच्या ‘एकात्म समाज केंद्रा’च्या अनोख्या प्रकल्पामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. सहकारी शेतीच्या माध्यमातून भूमिहीन आणि अल्पसंख्याक दलित शेतकऱ्यांचे आर्थिक पुनर्वसन करून सामाजिक सुसंवाद साधणे हे देवांच्या कार्याचे उद्दिष्ट होते.

मधुकरराव देवल कोण होते

मधुकरराव देवल हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते होते. मधुकरराव देवल यांचे पूर्ण नाव त्र्यंबक महादेव देवल होते. मात्र, त्यांना मधुकरराव देवल या नावाने विशेष ओळखले जाते. जन्म १२ ऑक्टोबर १९१८. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे शिक्षण महिसाळ, सांगली आणि पुणे येथे झाले. मधुकररावांनी पदवी पूर्ण केल्यानंतरच सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यात पूर्णवेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक म्हणून काही काळ काम केले. 1953 च्या दुष्काळात देवल यांनी प्रख्यात अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी स्थापन केलेल्या दुष्काळ निवारण समितीचे सदस्य म्हणून काम केले.

कार्य

सन १९५८ पासून मधुकरराव देवलांनी म्हैसाळ या आपल्या जन्मगावी तेथील दलित व अन्य मागासवर्गीय यांच्यासाठी काम करावयास सुरुवात केली. त्यांना अस्पृश्योद्धाराच्या कार्यात रस होता. पण अस्पृश्योद्धाराचा प्रश्न केवळ मंदिरप्रवेश किंवा पाणवठ्यावरील वावर यांपुरता मर्यादित न ठेवता अथवा केवळ संघर्षाच्या मार्गाचा अवलंब न करता तो अनेक स्तरांवर विधायक मागनि सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याकरिता दलितांना स्वतःच्या पायावर उभे करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असा विचार त्यांनी केला आणि त्या दृष्टीने आपल्या कार्याची दिशा निश्चित केली.

मधुकरराव देवलांनी प्रथम म्हैसाळ भागातील काही हरिजनांच्या ज्या जमिनी सावकारांकडे गहाण पडल्या होत्या त्या सोडविण्याची योजना आखली. त्याकरिता त्यांनी आपल्या परिचयाच्या काही व्यक्तींकडून पैसा गोळा केला. या जमिनी सावकारांकडून सोडवून घेतल्यानंतर देवलांनी दलितांसाठी ‘ श्रीविठ्ठल संयुक्त सहकारी शेती सोसायटी ‘ या नावाची संस्था स्थापन केली.

वरील संस्थेच्या माध्यमातून मधुकररावांनी दलित बांधवांना एकत्र आणले आणि त्यांच्यासाठी सहकारी तत्त्वावरील शेतीचा प्रयोग सुरू केला. दलित समाजाचा विचार करता त्यातील प्रत्येकाकडे व्यक्तिगत मा जमिनीचे क्षेत्र अगदीच मर्यादित होते; त्यामुळे व्यक्तिगत मालकीची शेती दलितांना किफायतशीर ठरणार नाही, गोष्ट देवलांनी ओळखली होती . म्हणून त्यांनी दलितांना सहकारी तत्त्वावर शेती पिकविण्याची आवश्यकता प दिली आणि त्यासाठी त्यांना राजी केले.

श्रीविठ्ठल संयुक्त सहकारी शेती सोसायटीने सुरू केलेल्या सहकारी शेतीच्या प्रकल्पात सुमारे शंभर दलित कुटुंबांची १२५ एकर शेतजमीन समाविष्ट करून घेण्यात आली आहे. या सर्व दलित कुटुंबांतील माणसे प्रकल्पाची जमीन ही आपल्याच मालकीची आहे या भावनेतून शेती पिकवितात. शेतीला नियमित पाणीपुरवठा व्हावा याकरिता पाणीपुरवठ्याच्या योजना आखून त्या अमलात आणण्यात आल्या.

त्यामुळे या जमिनीवर बागायती शेती करणेही शक्य झाले. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे लक्ष पुरविण्यात आले. त्यासाठी गरजू दलित कुटुंबांना दुभती जनावरे देण्याची व्यवस्था केली. अशा प्रकारे दलितांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यास देवलांनी मोठाच हातभार लावला.

दलितांच्या मागासलेपणाचे एक प्रमुख कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव हे होते. साहजिकच दलितोद्धाराच्या कोणत्याही कार्यक्रमात शिक्षणप्रसाराचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे, याची देवल यांना चांगलीच जाणीव होती. म्हणून त्यांनी दलित समाजातील मुलांच्या शिक्षणास चालना देण्याचे ठरविले आणि ती गोष्ट अग्रक्रमाने घडवून आणली.

म्हैसाळच्या श्रीविठ्ठल सहकारी शेती सोसायटीखेरीज दलित व मागासवर्गीय यांच्या उत्कर्षासाठी मधु देवल यांनी आणखीही काही संस्था स्थापन केल्या होत्या. यांमध्ये सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती संस्था, कोकळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती संस्था आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उदाजीराव चव्हाण शेती संस्था या सहकारी तत्त्वावर स्थापन करण्यात आलेल्या शेती संस्थांचा अंतर्भाव होतो.

शेत व्यवसायाशिवाय दलितांना इतर व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही देवलांनी केला होता. त्या दृष्टीने दलितांना शेळीपालन, पशुपालन, लाख उद्योग, चर्मोद्योग, भाजीपाला खरेदी – विक्री यांसारखे उद्योग सुरू करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.

निवासाची सोय करण्यासाठी श्रीगुरू गोविंदसिंग सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हैसाळ व विजय सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हैसाळ या गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या होत्या. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील मिणचे या गावी त्यांनी रामोशी या मागासलेल्या समाजाच्या लोकांची सहकारी दूध संस्थाही स्थापन केली होती.

‘ दलितमित्र ‘ पुरस्कार महाराष्ट्र शासनाने देवलांना ‘ दलितमित्र ‘ हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला. प्रसिद्ध साहित्यिक पु. भा. भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेला ‘ भावे सामाजिक पुरस्कार ‘ ही त्यांना प्राप्त झाला होता. मधुकरराव देवल यांचा मृत्यू १८ जानेवारी, १९९० ला झाला.

हे सुद्धा वाचा –

Related Posts