आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक महाराजा सयाजीराव गायकवाड यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Maharaja Sayajirao Gaekwad यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

महाराजा सयाजीराव गायकवाड कोण होते
महाराजा सयाजीराव गायकवाड हे 1875 ते 1939 पर्यंत बडोदा राज्याचे महाराज होते आणि त्यांच्या राजवटीत त्यांच्या राज्याच्या बहुतांश सुधारणांसाठी त्यांना स्मरणात ठेवले जाते. गोपाळरावांना इंग्रजांनी उत्तराधिकारी म्हणून निवडले आणि त्यानुसार महाराणी जमनाबाई यांनी 27 मे 1875 रोजी दत्तक घेतले. नंतर त्यांना सयाजीराव हे नवीन नाव देण्यात आले. 16 जून 1875 रोजी त्यांनी बडोदा येथील सिंहासनावर त्यांना आरोहण केले. आपले अधिकार व सत्ता यांचा वापर राज्यातील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी करणारे जे काही मोजकेच संस्थानिक या देशात होऊन गेले अशा संस्थानिकांमध्ये सयाजीराव गायकवाडांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
महाराजा सयाजीराव गायकवाड हे गुजरातमधील बडोद्याचे राजे होते. आपल्या लोककल्याणकारी भूमिकेतून त्यांनी सामाजिक सुधारणा चळवळीला मोठी गती दिली. त्यांच्या एकूण कार्याचा महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीला खूप फायदा झाला. सयाजीरावांनी महाराष्ट्रात समाजसुधारणेसाठी काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना सक्रिय मदत केली होती; त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या कामाचा आढावा घेणे आवश्यक आहे.
सयाजीरावांचा जन्म 11 मार्च 1863 रोजी झाला. नाशिक जिल्ह्यातील कवळाणे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील काशीराव गायकवाड हे कवळाणे या गावात शेती करत होते. काशीरावांना आनंदराव, गोपाळराव आणि संपतराव असे तीन पुत्र होते. बडोद्याच्या गायकवाड घराण्याशी त्यांचे घराणे जवळचे होते. बडोदा संस्थानचे राजा खंडेराव गायकवाड यांचे 1870 मध्ये निधन झाले. त्यांना दुसरा मुलगा नसल्याने त्यांचा भाऊ मल्हारराव गायकवाड बडोद्याच्या गादीवर बसला; पण मल्हारराव आणि बडोद्याचे तत्कालीन रेसिडेंट कर्नल फ्रेरे यांच्यात मतभेद निर्माण झाले.
लवकरच इंग्रजांनी मल्हाररावांना दुर्वर्तनाच्या आरोपावरून गादीवरून काढून टाकले आणि बडोदा संस्थानचा कारभार काही काळासाठी आपल्या हाती घेतला. पुढे खंडेराव गायकवाडांच्या विधवा पत्नी जमनाबाई यांनी हिंदुस्थानच्या सरकारकडून दत्तक घेण्याचा अधिकार मिळविला. त्यानुसार जमनाबाईं सयाजीराव असे ठेवले.
अशा प्रकारे Sayajirao Gaekwad बडोदा संस्थानचे राजे बनले. कवळाणेचे काशीराव गायकवाड यांचा मुलगा गोपाळराव यास 27 मे, 1875 रोजी दत्तक घेतले आणि त्याचे नाव सयाजीरावांचे सर्व बालपण खेडेगावात गेले होते. तेथील वातावरणामुळे आणि घरच्या गरिबीमुळे त्यांना लहान वयात शिक्षणाची संधी मिळाली नव्हती, तेव्हा बडोद्यात आल्यावर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली.
अल्पावधीतच त्यांनी मराठी, इंग्रजी, गुजराती व उर्दू भाषांचे शिक्षण पूर्ण केले. तसेच अश्वारोहण , राजघराण्याती दिवाण राजा सर टी. माधवराव यांच्याकडून त्यांना राजकारणाचे शिक्षण मिळाले. रीतिरिवाज, राज्यकारभारातील बारकावे इत्यादी गोष्टीही त्यांनी आत्मसात केल्या. बडोदा संस्थानचे त्या वेळचे सयाजीराव गायकवाड यांचा राज्यारोहण समारंभ 28 डिसेंबर, 1881 रोजी झाला. त्यांनी एकंदर चौसष्ट वर्षे राज्य केले. पण आपल्या हाती आलेल्या सत्तेचा वापर त्यांनी सदैव प्रजेच्या कल्याणासाठीच केला.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी बडोदा संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्या. अनेक लोकोपयोगी कामे केली. गरजू व लायक व्यक्तींना अनेक प्रकारे साहाय्य केले . आपल्या राज्यातील गोरगरीब प्रजेच्या हिताकडे लक्ष देऊन एक ‘ प्रजाहितदक्ष राजा ‘ असा लौकिक त्यांनी संपादन केला. 6 फेब्रुवारी, 1939 रोजी मुंबई येथे सयाजीरावांचे निधन झाले.
Maharaja Sayajirao Gaekwad यांचे बडोदा संस्थानचे सचिव सर टी. माधवराव यांच्या मदतीने Maharaja Sayajirao Gaekwad यांनी प्रथम राज्ययंत्रणेत सुरळीतपणा आणला. त्याकरिता प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू केले. आपल्या राज्याची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून अनेक उपाययोजना केल्या. राज्याच्या न्यायव्यवस्थेतही त्यांनी सुधारणा घडवून आणल्या. अर्थात, एवढ्यावरच संतुष्ट न राहता सयाजीरावांनी लोककल्याणाच्या विविध योजना हाती घेतल्या व त्या यशस्वीरीत्या पार पाडल्या.
सयाजीराव गायकवाड यांचे शैक्षणिक कार्य
आपल्या संस्थानात शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्यासाठी सयाजीराव गायकवाड सतत प्रयत्नशील राहिले. विशेषतः बहुजन समाज व मागासलेले वर्ग यांच्यात शिक्षणाचा प्रसार करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्याकरिता 1893 मध्ये त्यांनी बडोदा संस्थानात सक्तीच्या प्राथमिक शिक्षण योजनेची सुरुवात केली आणि क्रमाक्रमाने या योजनेची व्याप्ती वाढवीत नेऊन 1906 मध्ये संपूर्ण संस्थानात ती अमलात आणली.
प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे बडोदा हे भारतातील पहिले राज्य होय. या एकाच गोष्टीवरून सयाजीराव महाराजांच्या या कार्याचे महत्त्व व त्यांचे द्रष्टेपण स्पष्ट होते. स्त्रिया व मागासवर्गीयांच्या शिक्षणाकडेही सयाजीरावांनी विशेष लक्ष पुरविले आणि त्यासाठी स्वतंत्र उपलब्ध करून दिल्या. मागासवर्गीयांसाठी त्यांनी खास शाळा सुरू केल्या. सन 1890 मध्ये त्यांनी ‘ कलाभुवन ‘ ही संस्था स्थापन करून तंत्रशिक्षणाला चालना दिली.
राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी वसतिगृहे चालविण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. याशिवाय संगीत, नृत्य, नाट्य यांसारख्या कलांचे शिक्षण देणारी शाळाही राज्यात उघडण्यात आली. शैक्षणिक संस्था स्थापन करण्याबरोबरच लोकांमध्ये इतर मार्गांनीही ज्ञानाचा प्रसार व्हावा याची काळजी सयाजीरावांनी घेतली होती. त्याकरिता संस्थानात त्यांनी गावोगावी वाचनालये उघडली. त्याच्या जोडीला काही फिरती वाचनालयेही सुरू केली.
ग्रंथप्रकाशनाच्या कार्याला चालना देण्यातही ते आघाडीवर राहिले. याशिवाय आपल्या राज्यातील, इतकेच काय पण राज्याबाहेरीलदेखील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या देण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यांच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी घेतला होता . त्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. आंबेडकर यांसारख्या मान्यवर व्यक्तींचा समावेश होता.
सामाजिक कार्य
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनीही सामाजिक क्षेत्रात काही क्रांतिकारी सुधारणा केल्या होत्या. ते समाजसुधारणेचे कट्टर समर्थक होते. त्यांनी आपल्या राज्यात घटस्फोटाचा कायदा लागू केला. असा कायदा करणारे बडोदा संस्थान हे भारतातील पहिले राज्य होते.
त्यांनी आपल्या राज्यात अस्पृश्यता, विधवा आणि व्यभिचार यावर कायदे केले होते. पडदा पद्धती, बालविवाह बंदी, मुलींच्या विक्रीवर बंदी इत्यादी सुधारणाही त्यांनी राबवल्या होत्या. त्या काळातही सयाजीराव महाराजांच्या सामाजिक सुधारणांकडे पाहण्याचा पुरोगामी स्वभाव पाहायला मिळतो.
राजकीय कार्य
सयाजीरावांनी राज्य कारभाराच्या अन्य क्षेत्रांतही अनेक सुधारणा घडवून आणल्या होत्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या . आपल्या राज्यातील जमिनीची योग्य प्रतवारी करण्यासाठी त्यांनी ‘ लँड सर्व्हे ‘ सेटलमेंट ‘ हे खाते सुरू केले. सारावसुलीच्या पूर्वीच्या वेगवेगळ्या पद्धतींत सुधारणा करून सारावसुलीची समान पद्धत राज्यात लागू केली. शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विहीर खोदाईच्या कामास उत्तेजन दिले.
आपल्या राज्याच्या न्यायव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचे कार्यही त्यांनी केले. त्यासाठी त्यांनी सन 1905 मध्ये ‘ हिंदू कायदा ‘ तयार करून तो अमलात आणला. राज्यातील पंचायतींचे पुनरुज्जीवन घडवून आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतींची मुहूर्तमेढ भारतात प्रथम बडोदा संस्थानात रोवली गेली, ती सयाजीरावांच्याच कारकिर्दीत ग्रामपंचायतींच्या जोडीला तालुका पंचायती व नगरपालिका यांचीही स्थापना करण्यात आली.
सयाजीराव महाराजांनी जगभर प्रवास केला. तथापि, या प्रवासातही आपल्या राज्याच्या हिताचा विचार डोळ्यांसमोर ठेवून जगातील निरनिराळ्या देशांत ज्या चांगल्या गोष्टी त्यांना आढळून आल्या त्यांचे अनुकरण आपल्या राज्यात करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राज्यातील व्यापार व उद्योगधंदे यांना उत्तेजन देण्याकडे महाराजांनी विशेष लक्ष पुरविले.
त्यासाठी दळणवळणाच्या सोयी वाढविल्या, बडोदा संस्थानात सयाजीरावांनी अनेक सुंदर वास्तू उभ्या केल्या. लक्ष्मीविलास राजवाडा, मकरपुरा राजवाडा, नजरबाग राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलाभुवन, श्रीसयाजी रुग्णालय, खंडेराव मार्केट वगैरे इमारतींची उभारणी त्यांच्याच कारकिर्दीत झाली.
Maharaja Sayajirao Gaekwad यांनी बडोदा संस्थानचे अधिपती म्हणून आपल्या राज्यात केलेल्या वरील सुधारणा पाहिल्या तर ते एक कर्तृत्ववान, प्रजाहितदक्ष व पुरोगामी विचारांचे राजे होते याविषयी मुळीच शंका उरत नाही. राज्यकर्त्याच्या ठिकाणी आवश्यक असणारा दूरदर्शीपणा त्यांच्याकडे पुरेपूर होता. म्हणूनच समाजसुधारणेच्या क्षेत्रात त्यांच्या संस्थानाने आघाडी मारली होती.
बडोदा संस्थानला अनेक सुधारणा अंमलात आणणारे देशातील पहिले होण्याचा मान मिळाला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 1904 मध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद देऊन गौरविण्यात आले. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला अप्रत्यक्षपणे मदतही केली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी ‘भारताचा शेवटचा आदर्श राजा’ अशा शब्दात त्यांचे कौतुक केले होते. त्यांच्या दूरदृष्टी आणि प्रशासकीय कौशल्यांचे स्मरण करण्यासाठी, बडोदा मॅनेजमेंट असोसिएशनने 2013 मध्ये त्यांच्या नावाने सयाजी रत्न पुरस्काराची स्थापना केली आहे.
हे सुद्धा वाचा –