मेनू बंद

महर्षी धोंडो केशव कर्वे – संपूर्ण माहिती मराठी

आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे (1858–1962) यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Maharshi Dhondo Keshav Karve यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

महर्षी धोंडो केशव कर्वे -  Maharshi Dhondo Keshav Karve

महर्षी धोंडो केशव कर्वे कोण होते

धोंडो केशव कर्वे हे भारतातील महिला कल्याण क्षेत्रातील समाजसुधारक होते. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला आणि स्वतः विधवेशी विवाह केला. त्यांच्या सन्मानार्थ, पुण्यातील कर्वेनगरचे नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात आले आणि मुंबईतील क्वीन्स रोडचे नामकरण महर्षी कर्वे रोड असे करण्यात आले.

कर्वे विधवांच्या शिक्षणाचा प्रसार करण्यात अग्रेसर होते. त्यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली – SNDT महिला विद्यापीठ. भारत सरकारने त्यांना 1958 मध्ये त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले.

प्रारंभीक जीवन

महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतातील स्त्रियांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणाऱ्या महापुरुषांपैकी एक होते. त्यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली गावात झाला. कोकणातील मुरुड हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना खूप अभ्यास करावा लागला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. तेथे अध्यापन करून त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले.

शिक्षण:

१८८१ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. उच्च शिक्षणासाठी त्यांनी प्रथम मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला; पण नंतर ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गेले. याच महाविद्यालयातून १८८४ मध्ये त्यांनी गणित विषय घेतला आणि बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाली.

करियर:

शिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्वे यांनी मुंबईतील मुलींच्या हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. पुढे 15 नोव्हेंबर 1891 रोजी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या निमंत्रणावरून ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

सन १८९२ मध्ये ते पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य बनले. यापुढील काळात त्यांनी पुणे हीच आपली कर्मभूमी बनविली. फर्गसन कॉलेजात त्यांनी १५ नोव्हेंबर, १८९१ ते १९१४ अशी सुमारे तेवीस वर्षे सेवा केली.

महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य सर्वपरिचित आहे. स्त्री – शिक्षणासाठी त्यांनी अत्यंत परिश्रम घेतले होते. आपल्या समाजातील स्त्रियांची दुःस्थिती पाहून समाजाच्या या घटकासाठी काहीतरी के पाहिजे, असे विचार त्यांच्या मनात आले आणि त्या वेळेपासून त्यांच्या जीवनाचे तेच एकमेव उद्दिष्ट बनले.

समाजातील विधवा स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून क्रव्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या आणि त्या संस्था वाढीस लावण्यासाठी आपले तन-मन -धन खर्ची घातले.

मृत्यू:

महर्षी कर्वे यांच्या या कार्यामुळे त्यांचे नाव स्त्री – उद्धाराच्या कार्याशी कायमचे निगडित झाले आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा वयाच्या 105 व्या वर्षी ९ नोव्हेंबर, १९६२ रोजी पुणे येथे मृत्यू झाला.

व्यक्तिगत जीवन

कव्यांच्या काळात, विशेषतः एकोणिसाव्या शतकात येथील समाजात विधवा स्त्रियांची संख्या बरीच मोठी होती. बालविवाहाची सर्रास रूढ असलेली प्रथा आणि बालमृत्यूचे मोठे प्रमाण ही त्याची प्रमुख कारणे होती. या दुर्दैवी स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय बनली होती. समाजात तर त्यांना काही स्थान नव्हतेच; पण त्यांच्या घरची माणसेदेखील त्यांना अत्यंत वाईट वागणूक देत असत.

संसार म्हणजे काय, याची पुरती जाणीवही ज्यांना झालेली नाही अशा अजाण बालिकांवरही विधवेचे जीवन जगण्याचा दुर्धर प्रसंग ओढवल्याचे चित्र समाजात त्या काळी कंठावे लागत असे. नेहमीच दृष्टीस पडत असे, त्यांना आपले उभे आयुष्य अतिशय दुःखात व सर्व प्रकारच्या हालअपेष्टांना तोंड देत कंठावे लागत असे.

विधवा विवाहोत्तेजक मंडळी संस्थेची स्थापना:

समाजातील विधवा स्त्रियांचे दुःख दूर करणे गरजेचे आहे, असे महर्षी कर्वे यांना वाटले. त्यासाठी त्यांनी विधवाविवाहाचा आग्रहाने पुरस्कार केला. विधवाविवाहाला चालना मिळावी म्हणून ३१ डिसेंबर, १८९३ रोजी त्यांनी ‘ विधवा विवाहोत्तेजक मंडळी ‘ या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून या प्रश्नावर समाजात जागृती घडवून आणण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले.

कालांतराने २० ऑगस्ट, १८९५ रोजी या संस्थेच्या विधवा केले गेले. विवाहोत्तेजक मंडळी ‘ या नावात बदल करण्यात येऊन ‘ विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी ‘ असे नवे नामकरण केले गेले.

विवाह:

महर्षी कर्वे यांनी विधवाविवाहाचा पुरस्कार तर केलाच; पण स्वतःच्या उदाहरणानेच त्यासंबंधीचा आदर्श समाजाला घालून दिला. ते पंधरा वर्षांचे असतानाच त्यांचा प्रथम विवाह झाला होता. पण त्यांची प्रथम पत्नी त्यांच्या वयाच्या एकतिसाव्या वर्षी मृत्यू पावली. त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे या वयातही त्यांना एखाद्या कुमारिकेशी वि करता आला असता; पण कर्त्यांची विधवांच्या समस्या सोडविण्याबाबतची तळमळ अंतःकरणापासूनची होती.

विधवेशी विवाह:

आपल्या मतांशी ते प्रामाणिक व एकनिष्ठ होते. म्हणूनच दुसऱ्या विवाहाचा विचार करण्याचा प्रसंग जेव्हा त्यांच्यावर आला तेव्हा एका विधवेशी विवाह करण्याचे धैर्य त्यांनी प्रकट केले. ११ मार्च, १८९३ रोजी त्यांनी मनोरमाबाई व बाळकृष्ण या जोशी दाम्पत्याच्या गोदुताई नावाच्या विधवा कन्येशी विवाह केला.

पंडिता रमाबाईंच्या ‘ शारदा सदन ‘ मधील ही पहिली विधवा विद्यार्थिनी म्हणजेच पुढे प्रसिद्धीस आलेल्या आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे होत. या विवाहामुळे कर्त्यांना समाजाकडून खूप त्रास सहन करावा लागला. सर्वांनी त्यांची अवहेलना केली. अगदी जवळच्या नातेवाइकांनीदेखील त्यांच्याशी असलेले आपले संबंध तोडून टाकले; पण कर्व्यांनी मात्र आपल्या मनाचा तोल कधी ढळू दिला नाही.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे कार्य

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे शैक्षणिक कार्य असंख्य आहे. स्त्रियांसाठी एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, अशी कर्व्यांची इच्छा होती. त्यानुसार ३ जून, १९१६ रोजी त्यांनी हिंगणे येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र अशा महिला विद्यापीठा’ची स्थापना केली.

स्त्रियांच्या शिक्षणात त्या काळी इंग्रजी माध्यमाचा विशेष अडसर येत होता. म्हणून महिला विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे असे ठरविण्यात आले. तथापि, इंग्रजी भाषेला असलेले महत्त्व विचारात घेऊन इंग्रजीच्या अध्यापनाचीही सोय करण्यात आली होती.

स्त्री जीवनाला उपयुक्त ठरतील आणि स्त्रियांच्या भावी विकासाला पोषक होतील अशा गृहज्जीवनशास्त्र, आरोग्यशास्त्र इत्यादी विषयांचा आवश्यक विषय म्हणून या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्यात आला होता. तसेच ललित कलांना ऐच्छिक विषय म्हणून अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले होते.

महिला विद्यापीठात पदवी परीक्षेशिवाय माध्यमिक प्रशिक्षण पदवी, गृहविज्ञान पदवी, परिचारिका पदवी यांसारखे खास अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले होते.

SNDT ची स्थापना:

सन १९२० मध्ये शेठ विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ १५ लाख रुपयांची देणगी या विद्यापीठाला दिली; त्यामुळे विद्यापीठाला चांगलेच आर्थिक स्थैर्य लाभले.

पुढे या विद्यापीठाचे ‘ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठा’त (SNDT) रूपांतर झाले. सन १९४९ मध्ये श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ कायदा संमत झाला आणि १९५१ मध्ये या विद्यापीठास विद्यापीठ म्हणून मान्यता प्राप्त झाली.

समाजात विधवा स्त्रियांना जी दुःखे भोगावी लागत होती, ती दूर करण्याच्या उद्देशाने महर्षी कर्वे यांनी १४ जून, १८९६ रोजी पुणे येथे ‘ अनाथ बालिकाश्रम मंडळी ‘ नावाची संस्था स्थापन केली.

तथापि, आश्रमाच्या कार्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली ती १ जानेवारी, १८९९ पासून. पुढच्याच वर्षी म्हणजे जून, १९०० मध्ये ही संस्था पुण्याहून जवळच्याच हिंगणे या गावी स्थलांतरित करण्यात आली. विधवा स्त्रियांना स्वावलंबी बनवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, हा या संस्थेचा उद्देश होता.

अनाथ बालिकाश्रमासंबंधी स्वतः कर्वे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे, “आश्रमापासून झालेला सर्वांत मोठा फायदा म्हटला म्हणजे खुद्द विधवांच्या अंतःकरणात त्याने जो आशेचा अंकुर उत्पन्न केला तो होय. हिंदूंच्या ज्या जातींत विधवाविवाह रूढ नाही, त्या जातींतील अल्पवयस्क विधवांना शिक्षण देऊन, त्यांची मने सुशिक्षित करून, त्यांना स्वावलंबी होता येईल असे साधन त्यांना हस्तगत करून देणे व आपले जीवित उपयोगी असून ते कोणत्या तरी कार्याला लावता येईल असा विश्वास त्यांच्यामध्ये उत्पन्न करणे, हे आश्रमाचे उद्देश आहेत व ते चांगल्या रीतीने तडीला जात आहेत.”

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था:

पुढे सन १९४६ मध्ये ‘ अनाथ बालिकाश्रम मंडळी ‘ या संस्थेचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. याच वर्षी संस्थेचे ‘ हिंगणे स्त्री शिक्षण संस्था ‘ असे नामकरण केले गेले. सध्या ही संस्था ‘ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ‘ म्हणून ओळखली जाते.

स्त्रियांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल आणि त्यांच्या स्वभावाला पोषक ठरेल अशा प्रकारचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने कर्त्यांनी ४ मार्च, १९०७ रोजी पुणे येथे ‘ महिला विद्यालया’ची स्थापना केली. डिसेंबर, १९११ मध्ये महिला विद्यालयाचेही हिंगणे येथे स्थलांतर केले गेले. या विद्यालयात गृहजीवनशास्त्र, आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपनशास्त्र यांसारखे विषय शिकविण्याची सोय करण्यात आली.

पुढे ४ नोव्हेंबर, १९०८ रोजी कर्व्यांनी ‘ निष्काम – कर्म – मठ ‘ ची स्थापना केली. जून, १९१७ मध्ये त्यांनी अध्यापिका विद्यालय सुरू केले, तर एप्रिल, १९१८ मध्ये पुणे येथे कन्याशाळेची स्थापना केली.

निष्काम कर्म मठ

४ नोव्हेंबर, १९०८ रोजी कव्यांनी ‘निष्काम कर्म मठ’ या संस्थेची स्थापना केली. स्त्रियांच्या उद्धाराचे आणि त्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संस्थांचे कार्य निःस्वार्थीपणे व त्यागी वृत्तीने करणारे समाजसेवक तयार करण्याच्या उद्देशाने त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती.

कोणत्याही लाभाची अपेक्षा न धरता, ध्येयवादाने व निःस्वार्थी बुद्धीने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी तयार करूनच समाजसेवेचे, विशेषतः स्त्री समाजाच्या सेवेचे कार्य चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल, असा त्यांचा विश्वास होता.

महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ संस्थेची स्थापना:

महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी १९३६ मध्ये ‘ महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ ‘ या संस्थेची स्थापना केली. भारतीय समाजातील जातिभेद व अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट प्रथांनाही त्यांचा विरोध होता. या प्रथांचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने त्यांनी १९४४ मध्ये ‘ समता संघा’ची स्थापना केली होती.

महर्षी कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या वरील कार्याचा विचार केल्यास महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाच्या प्रसारात त्यांचा वाटा किती महत्त्वपूर्ण होता याची कल्पना येते. प्रारंभ विधवा स्त्रियांपासून केला होता. या स्त्रियांची समाजातील स्थिती सुधारावी व त्यांना चांगल्या प्रकारचे जीवन जगण्याची संधी मिळावी, असा विचार त्यांनी केला होता.

परंतु, स्त्रियांना शिक्षणाचा लाभ मिळून त्या स्वावलंबी बनल्याखेरीज त्यांचा खऱ्या अर्थाने उद्धार होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी स्त्री – शिक्षणाच्या प्रसारावर आपले लक्ष केंद्रित केले.

त्यांच्या या कार्याचे महत्त्व असे की ज्या काळात समाजात स्त्रियांची उपेक्षाच केली जात होती त्या काळात त्यांनी स्त्री – शिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली आणि स्त्रियांना समाजात सन्मानाने जगणे शक्य व्हावे अशी परिस्थिती निर्माण करण्यास आपल्या परीने हातभार लावला. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील स्त्री – शिक्षणाची आणि स्त्रीच्या सर्वांगीण उन्नतीची चळवळ गतिमान झाली याविषयी सर्वांचेच एकमत होईल.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळालेले पुरस्कार

  • बनारस (१९४२) व पुणे (१९५१) या विद्यापीठांनी डी. लिट. ही सन्मानदर्शक पदवी दिली.
  • मुंबई विद्यापीठाने त्यांना एलएल. डी. ची पदवी (१९५७) ही पदवी दिली.
  • १८ एप्रिल, १९५८ रोजी म्हणजे त्यांच्या शंभराव्या वाढदिवशी ‘ भारतरत्न ‘ हा सर्वोच्च सन्मान.

हे सुद्धा वाचा –

Related Posts