आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक मंगेश पाडगावकर यांची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला Mangesh Padgaonkar यांच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर नक्की हे आर्टिकल पूर्ण वाचा.

मंगेश पाडगावकर कोण होते
मंगेश केशव पाडगावकर हे महाराष्ट्रातील एक दिग्गज मराठी कवी होते. स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी कवितेला वेगळे वळण प्राप्त करून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पाडगावकर यांचा जन्म 10 मार्च 1929 रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृतमध्ये मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत ते तर्खडकर सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. १९५८ मध्ये मराठी व संस्कृत हे विषय घेऊन ते एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
या परीक्षेत देखील त्यांना मुंबई विद्यापीठाचे न. चिं. केळकर सुवर्णपदक मिळाले होते. पाडगावकर यांनी मुंबईतील मातुश्री मिठीबाई महाविद्यालयात अनेक वर्षे मराठी शिकवली आणि त्यानंतर १९७०-१९९० या काळात मुंबईत ‘यूएस इन्फॉर्मेशन सर्व्हिस’ (यूएसआयएस) येथे संपादक म्हणून काम केले. त्यांनी काही काळ साधना (साप्ताहिक) मध्ये सहाय्यक संपादक म्हणूनही काम केले.
Mangesh Padgaonkar Information in Marathi
शिक्षण पूर्ण झाल्यावर Mangesh Padgaonkar यांनी काही काळ मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. ‘ साधना ‘ साप्ताहिकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी थोडे दिवस काम केले . पुढे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर निर्माते म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मुंबईच्या सोमय्या कॉलेज व मिठीबाई कॉलेज या ठिकाणी मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी ‘ युनायटेड स्टेट्स इन्फॉर्मेशन सर्व्हिस ‘ मध्ये मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली.
Mangesh Padgaonkar यांचा ‘ धारानृत्य ‘ हा पहिला कवितासंग्रह १९५० मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. पाडगावकरांच्या कवितेमधून त्यांच्या ठिकाणी असलेल्या सामाजिक जाणिवेचे दर्शन होते. निसर्ग आणि प्रेमभावना यांनाही त्यांच्या कवितेत प्रधान स्थान लाभले आहे. काव्याच्या प्रांतात नवनवे प्रयोग करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो.
‘ वात्रटिका ‘ हा काव्यप्रकार मराठीत त्यांनीच रूढ केला. उपहासात्मक पद्धतीची कविता लोकप्रिय करण्याचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते. बालगीते हा काव्यप्रकारही त्यांनी यशस्वीरीत्या हाताळला आहे पाडगावकरांना ललितलेखक म्हणूनही मान्यता मिळाली. मीराबाईंच्या काही हिंदी गीतांचा त्यांनी मराठीत पद्यानुवाद केला. मंगेश पाडगावकर यांच्या काही काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले. त्यांच्या ‘ सलाम ‘ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. मंगेश पाडगावकर यांचा मृत्यू ३० डिसेंबर, २०१५ रोजी झाला.
मंगेश पाडगावकर यांचे पुस्तक, ग्रंथ व साहित्य
कवितासंग्रह
- धारानृत्य
- जिप्सी
- छोरी
- उत्सव
- विदूषक
- सलाम
लेखसंग्रह
- चांदण्यात
हे सुद्धा वाचा –