मेनू बंद

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 1

मराठी व्याकरणा मध्ये ‘ मराठी म्हणी संग्रह व अर्थ ‘चे स्थान अतिशय महत्वाचे आहे. प्राथमिक शाळेपासून तर अगदी नोकरीसाठी द्यायच्या परीक्षेपर्यंत ‘ मराठी म्हणी व वाक्प्रचार ‘ हे प्रकरण येतेच. सामान्य जीवनातही आपण अनेक तऱ्हेच्या ‘ मराठी म्हणी व त्याचे अर्थ ‘ यांचा वापर करतो. आम्ही येथे संपूर्ण Marathi Mhani List उपलब्ध केलेली आहे; ज्यामध्ये 8 भाग आहेत त्यापैकी हा भाग 1 आहे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार | मराठी म्हणी संग्रह व अर्थ - Marathi Mhani List भाग 1

मराठी म्हणी संग्रह व अर्थ – भाग 1

 • तट्टाला टुमणी, तेजीला इशारत – जी गोष्ट मुर्खाला शिक्षेनेही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते.
 • ताकापुरते रामायण– एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.
 • तीन दगडात त्रिभुवन आठवते – संसार केल्यावरच खरे मर्म कळते.
 • उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे – येते वेळी ताठ मानेने यावे आणि जाते वेळी खाली मान घालून जाणे.
 • लाज नाही मना कोणी काही म्हणा – निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही.
 • लेकी बोले सुने लागे – एकाला उद्देशून ; पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
 • लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण – लोकांना उपदेश करायचा; पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही.
 • वळणाचे पाणी वळणावरच जाणे – निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडावयाच्या त्या घडतच राहणार.
 • वरातीमागून घोडे – योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे.
 • वारा पाहून पाठ फिरवणे – परिस्थिती पाहून वर्तन करणे.
 • वाहत्या गंगेत हात धुणे किंवा तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे – सर्व साधने अनुकूल असली , की होईल तो फायदा करून घेणे.
 • वासरांत लंगडी गाय शहाणी – मूर्ख माणसांत अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो.
 • वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच – वाईट व्यक्तीला चांगले म्हटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच .
 • विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर – गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे.
 • उसाच्या पोटी कापुस – सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती.
 • ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये– कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
 • एका माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.
 • एका हाताने टाळी वाजत नाही– दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही.
 • तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही– चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत.
 • तुकारामबुवाची मेख – न सुटणारी गोष्ट.
 • शितावरुन भाताची परीक्षा – वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होते.
 • सुंभ जळाला तरी पीळ जात नाही – वैभव गेले तरी ताठा जात नाही.
 • स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे – वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही.
 • हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते – आजार , संकटे येतात ती लवकर मोठ्या प्रमाणावर येतात; पण कमी होताना हळूहळू कमी होतात.
 • हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांचा पावसाळा – खोटे अश्रू ढाळणे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 1

 • हत्तीच्या दाढेमध्ये मिऱ्याचा दाणा – मोठ्या उपायाची गरज असताना अतिशय छोटा उपाय करणे.
 • शेरास सव्वाशेर / चोरावर मोर – एकाला दुसरा वरचढ भेटणे.
 • हाजीर तो वजीर– जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो.
 • हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे – जे आपल्या हातात आहे, ते सोडून, दुसरे मिळेल या आशेने हातातले सोडण्याची पाळी येणे.
 • हिरा तो हिरा, गार तो गार – गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत.
 • इन मिन साडेतीन – एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.
 • ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो – जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच.
 • काकडीची चोरी फाशीची शिक्षा – अपराध खूप लहान; पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.
 • काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही – जे काम भरपूर पैशाने होत नाही, ते थोड्याशा अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते.
 • कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते – पूर्वग्रह दूषीत दृष्टी असणे.
 • काशीत मल्हारी माहात्म्य – नको तेथे नको ती गोष्ट करणे.
 • कानामागून आली अन् तिखट झाली – श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.
 • कामापुरता मामा – आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.
 • उथळ पाण्याला खळखळाट फार – अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
 • उंदराला मांजर साक्ष – ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे.
 • उचलली जीभ लावली टाळ्याला – दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे.
 • उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे.
 • हिऱ्यापोटी गारगोटी – चांगल्याच्या पोटी नाठाळ.
 • होळी जळाली आणि थंडी पळाली – होळीनंतर थंडी कमी होते.
 • ‘ श्री ‘ च्या मागोमाग ‘ ग ‘ येतो – संपत्तीबरोबर गर्व येतो.
 • मांजरीचे दात तिच्या पिलास लागत नाहीत – आईवडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते.
 • मानेवर गळू आणि पायाला जळू – रोग एकीकडे उपाय भलतीकडे.
 • मारुतीचे शेपूट – लांबत जाणारे काम .
 • मुंगीला मिळाला गहू, कुठे नेऊ अन् कुठे ठेवू ? – छोट्याशा गोष्टीनेही हुरळून जाणे.
 • मुंगीला मुताचा पूर – लहान लोकांना लहान संकटही डोंगराएवढे वाटते.

पुढील यादी बघा:

Related Posts