मेनू बंद

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 2

मराठी व्याकरणा मध्ये ‘ मराठी म्हणी संग्रह व अर्थ ‘चे स्थान अतिशय महत्वाचे आहे. प्राथमिक शाळेपासून तर अगदी नोकरीसाठी द्यायच्या परीक्षेपर्यंत ‘ मराठी म्हणी व वाक्प्रचार ‘ हे प्रकरण येतेच. सामान्य जीवनातही आपण अनेक तऱ्हेच्या ‘ मराठी म्हणी व त्याचे अर्थ ‘ यांचा वापर करतो. आम्ही येथे संपूर्ण Marathi Mhani List उपलब्ध केलेली आहे; ज्यामध्ये 8 भाग आहेत त्यापैकी हा भाग 2 आहे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार | मराठी म्हणी संग्रह व अर्थ - Marathi Mhani List भाग 2

मराठी म्हणी संग्रह व अर्थ – भाग 2

 • शेजी देईल काय आणि मन धायेल काय ? – शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरी मनाची तृप्ती होऊ शकत नाही.
 • शेजीबाईची कढी, धाव धाव वाढी – एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे .असतील शिते तर जमतील भूते – एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला, की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात.
 • असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – दुर्जन माणसांशी संगत केल्यास प्रसंगी जिवालाही धोका निर्माण होतो.
 • देखल्या देवा दंडवत – एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे.
 • दैव देते आणि कर्म नेते – नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते.
 • दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी – नशिबात नसल्यास जवळ आलेली संधीसुद्धा दूर जाते.
 • दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला – नशिबाने मिळणे; परंतु घेता न येणे.
 • दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई – नशीबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात.
 • अडला हरी गाढवाचे पाय धरी – एखाद्या बुद्धिमान माणसालादेखील अडचणीच्या वेळी मूर्ख , दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते.
 • अति शहाणा त्याचा बैल रिकामा – जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो, त्याचे मुळीच काम होत नाही.
 • अति तिथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो.
 • पी हळद नि हो गोरी – कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे.
 • पुत्र मागण्यास गेली, भ्रतार (नवरा) घालवून आली – फायदा होईल म्हणून जाणे; परंतु नुकसान होणे.
 • पुढच्यास ठेच मागचा शहाणा – दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो.
 • पुढे तिखट मागे पोचट – दिसायला फार मोठे ; पण प्रत्यक्षात तसे नसणारे.
 • ‘ पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा ‘ – पैसा कमी काम जास्त पोटी कस्तुरी, वासासाठी फिरे भिरीभिरी स्वत : जवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे.
 • अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे – दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.
 • अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज – गरजवंताला अक्कल नसते.
 • अंगावरचे लेणे, जन्मभर देणे – दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे.
 • अंतकाळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण – मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.
 • अंधारात केले, पण उजेडात आले – कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच.
 • अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे – नाव मोठे लक्षण खोटे.
 • अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था – अशक्य कोटीतील गोष्ट.
 • आधीच मर्कट तशातही मद्य प्याला – आधीच करामती व त्यात मद्य प्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते.
 • अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा – मुख्य गोष्टीपेक्षा आनुषांगिक गोष्टीचाच खर्च जास्त असणे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 2

 • आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी– रोग एकीकडे, उपाय भलतीकडे.
 • आयजीच्या जीवावर बायजी – उदार दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे .
 • आग खाईल तो कोळसे ओकेल – जशी करणी तसे फळ आठ पुरभय्ये नऊ चौबे – खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धीमान पुरेसे.
 • आधणातले रडतात व सुपातले हसतात – संकटतात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते.
 • इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.
 • इच्छी परा ते येई घरा – आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.
 • इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते – इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते.
 • दुधाने तोंड भाजले, की ताकपण फुंकून प्यावे लागते – एखाद्या बाबतीत अद्दल घडली, की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.
 • दे माय धरणी ठाय – पुरे पुरे होणे.
 • देश तसा वेश – परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन.
 • देव तारी त्याला कोण मारी ? – देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही.
 • देखल्या देवा दंडवत – सहज दिसले म्हणून चौकशी करणे.
 • देणे कुसळांचे घेणे मुसळाचे – पैसे कमी आणि काम जास्त.
 • अति झाले अन् आसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला, की ती दुःखदायी ठरते.
 • अति परिचयात अवाज्ञा – जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो.
 • अती झाले गावचे अन् पोट फुगले देवाचे – कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच.
 • अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास – अन्न न खाणे; पण त्यात मन असणे.
 • अपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.
 • अर्थी दान महापुण्य – गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.
 • आईची माया अन् पोर जाईल वाया – फार लाड केले तर मुले बिघडतात.
 • एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.
 • ऐकावे जनाचे करावे मनाचे – लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे.
 • एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी – दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.
 • एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये – दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.
 • एका पिसाने मोर (होत नाही) – थोड्याशा यशाने हुरळून जाणे.

पुढील यादी बघा:

Related Posts