मेनू बंद

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 3

मराठी व्याकरणा मध्ये ‘ मराठी म्हणी संग्रह व अर्थ ‘चे स्थान अतिशय महत्वाचे आहे. प्राथमिक शाळेपासून तर अगदी नोकरीसाठी द्यायच्या परीक्षेपर्यंत ‘ मराठी म्हणी व वाक्प्रचार ‘ हे प्रकरण येतेच. सामान्य जीवनातही आपण अनेक तऱ्हेच्या ‘ मराठी म्हणी व त्याचे अर्थ ‘ यांचा वापर करतो. आम्ही येथे संपूर्ण Marathi Mhani List उपलब्ध केलेली आहे; ज्यामध्ये 8 भाग आहेत त्यापैकी हा भाग 3 आहे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार | मराठी म्हणी संग्रह व अर्थ - Marathi Mhani List भाग 3

मराठी म्हणी संग्रह व अर्थ – भाग 3

 • आधी पोटोबा मग विठोबा – प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देवधर्म करणे.
 • हत्ती गेला ; पण शेपूट राहिले – कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला.
 • हलवायाच्या घरावर तुळशीपत्र – परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे, स्वतः ला झीज लागू न देणे.
 • हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते – जेथे भले – भले हात टेकतात तेथे लहान बडेजाव दाखवितात.
 • हात ओला तर मित्र भला – म्हणजेच तुमच्यापासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात.
 • हात फिरे तिथे लक्ष्मी वसे – उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते.
 • शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी – चांगल्याच्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात.
 • सगळेच मुसळ केरात – मुख्य व महत्त्वाच्या गोष्टींकडेच दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे.
 • सरड्याची धाव कुंपणापर्यंतच – प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते.
 • समर्थाघरचे श्वान, त्याला सर्व देती मान – मोठ्याच्या घरच्या शूद्रालाही मान द्यावा लागतो.
 • संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरवात – एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे संग तसा रंग संगतीप्रमाणे वर्तन असणे.
 • हातच्या काकणाला आरसा कशाला ? – स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.
 • ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार – मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात.
 • ओळखीचा चोर जिवे न सोडी – ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
 • ओठ फुटो (तुटो) किंवा खोकाळ फुटो / शेंडी तुटो की तारंबी तुटो – कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे.
 • ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे ? – सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे.
 • औटघटकेचे राज्य – अल्पकाळ टिकणारी गोष्ट.
 • आपलेच दात आपलेच ओठ – आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
 • आयत्या बिळावर नागोबा – एखाद्याने स्वतः करिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.
 • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
 • आत्याबाईला जर मिशा असत्या तर – नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे.
 • आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन – दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे.
 • आधीच तारे, त्यात गेले वारे – विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे.
 • उठता लाथ बसता बुक्की – प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
 • उडत्या पाखराची पिसे मोजणे – अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे.

मराठी म्हणी व वाक्प्रचार – भाग 3

 • आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वत : चाच तेवढा फायदा साधून घेणे.
 • एका खांबावर द्वारका – एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.
 • एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला – एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.
 • एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी – बाहेर बडेजाव ; पण घरी दारिद्र्य.
 • एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत – दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत.
 • ऐंशी तेथे पंचाऐंशी – अतिशय उधळेपणाची कृती.
 • आलिया भोगासी असावे सादर – तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
 • आवळा देऊन कोहळा काढणे – आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
 • आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही – अनुभवाशिवाय शहाणपण नसते.
 • आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला – ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो , तो दोष आपल्या अंगी असणे.
 • आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास – मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे.
 • आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं – एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
 • आंधळ्या बहिऱ्यांची गाठ – एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे.
 • अगं अगं म्हशी, मला कोठे नेशी ? – चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही, उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे .
 • अडली गाय फटके खाय – एखादा माणूस अडचणीत सापडला, की त्याला हैराण केले जाते.
 • आपला हात जगन्नाथ – आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते.
 • उतावळी बावरी (नवरी) म्हाताऱ्याची नवरी – अति उतावळेपणा नुकसानकारक असतो.
 • उद्योगाचे घरी रिद्धि सिद्धी पाणी भरी – जेथे उद्योग असतो तेथें संपत्ती येते.
 • उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले – फायद्याची वेळ येणे; पण लाभ न घेता येणे.
 • विशी विद्या तिशी धन – योग्य वेळेत योग्य कामे केली, की त्यावरून कर्तृत्वाचा अंदाज बांधता येतो.
 • विचाराची तूट तेथे भाषणाला ऊत – मुखच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते.
 • विश्वासाने ठेवला घरी, चारी सुना गरवार करी – विश्वासघात करणे.
 • व्याप तितका संताप – कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असते.
 • शहाण्याला शब्दाचा मार – शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते.
 • उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे – अतिशय हालाखीची स्थिती.

पुढील यादी बघा:

Related Posts